त्या महिलेकडे असं काय होतं की 1 कोटी द्यावे लागले, रोहित पवारांचा निशाणा
जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेचा छळ केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तिला १ कोटींची रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले. आता याप्रकरणावरुन शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटींची खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक केली. सातारा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. रोहित पवार यांनी नुकतंच विधानसभेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना जयकुमार गोरे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले.
भाजपच्या ५४ लोकांवर आरोप
जयकुमार गोरे या प्रकरणात वस्तूस्थिती तपासली पाहिजे. ३ कोटी आकडा मोठा आहे, १ कोटी हाही आकडा मोठा आहे. १ कोटी कशाला दिले? का द्यावे लागले? धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात तर योग्य पद्धतीने करता आलं असतं. पैसे का दिले? गोरे साहेब आणि त्या महिलेत करार झाला होता. कोर्टाने काय ताशेरे ओढलेत? आमदार आणि नेते यांच्यावरील गुन्ह्यांचा अभ्यास केला तेव्हा भाजपच्या ५४ लोकांवर आरोप आहेत, असा खुलासा रोहित पवार यांनी केला.
सोमनाथ सुर्यवंशी याच्याबाबतीत अहवाल आला. पोलीस ठाण्यात मारहाण झाली, त्यात त्यांचा मृत्यू झाला. आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत होतो. पण सत्तेत असलेले मंत्री लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. बीडमध्ये पीआय महाजन यांनी गुन्हेगारांना मदत केली. मात्र मंत्री महाजन यांची बाजू घेत आहेत. नागपूरमध्येही हा विरोधाभास जाणवला. मग गुप्तवार्ता विभाग कमी पडतयं का? असा सवालही रोहित पवारांनी केला.
दुसऱ्या व्यक्तीला ती जबाबदारी द्या
“पोलिसांना फक्त व्हीआयपींची काळजी आहे. डीजी रश्मी शुक्ला आजारी असतात. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात ही आशा व्यक्त करतो. त्या आजारी असतील तर त्यांना मेडिकल लिव्ह देऊन, तेवढ्या काळासाठी दुसऱ्या व्यक्तीला ती जबाबदारी दिली तर काम करणं सोईचं होईल. सरकारने यात लक्ष घालावं. कायदा व सुव्यवस्था खालचया पातळीला गेली. मंत्र्यांना चुकीचं ब्रिफिंग होतं. HSRP नंबरप्लेट गुजरातला कमी आणि इथे नंबरप्लेट बसवण्यासाठी गेले, तिथे १२०० रुपये घेतले जातात”, असेही रोहित पवार म्हणाले.