बीड जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचं थैमान, एकट्या अंबाजोगाईत 86 रुग्ण, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातही म्युकरमायकोसिसने थैमान घातलंय. बीड जिल्ह्यातील एकट्या अंबाजोगाई (Ambajogai)मध्ये 86 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

बीड जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचं थैमान, एकट्या अंबाजोगाईत 86 रुग्ण, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू
म्युकरमायकोसिस
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 8:50 PM

बीड : राज्यात म्युकरमायकोसिस (Mucormycosis)चा फैलाव वेगानं होत असल्याचं पाहायला मिळतंय. बीड जिल्ह्यातही म्युकरमायकोसिसने थैमान घातलंय. बीड जिल्ह्यातील एकट्या अंबाजोगाई (Ambajogai)मध्ये 86 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात (Swami Ramanand Teerth Medical Collage) या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. उपचार सुरु असलेल्या 86 रुग्णांपैकी 15 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती बीड जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. (86 patients of Mukarmycosis in Ambajogai taluka of Beed district, 10 deaths so far)

एकट्या अंबाजोगाई तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असलेल्या 86 रुग्णांपैरी 61 रुग्ण अद्याप शस्त्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहेत. आतापर्यंत 15 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर 10 जणांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झालाय. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. बीड जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा वेगान फैलाव होत असल्याचं दिसून येत आहे.

‘म्युकरमायकोसिसची लक्षण आढळल्यानंतर तातडीने उपचार घ्या’

दरम्यान, अंबाजोगाईतील स्वामी रामांनंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयासह आता बीड जिल्हा रुग्णालय, तालुका उपजिल्हा रुग्णालय, त्याचबरोबर खासगी रुग्णालयातही म्युकरमायकोसिसचे रुग्ण दाखल होत आहेत. म्युकरमायकोसिसची लक्षण आढळल्यानंतर तातडीने योग्य उपचार घेतल्यानंतर या आजारातून रुग्ण बरा होता. मात्र, कोरोना रुग्णांनी कोरोनामुक्त झाल्यानंतरही योग्य काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत ‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक वैद्यकीय अधिकारी सिद्धेश्वर बिराजदार यांनी म्हटलंय.

औरंगाबादेत ‘म्युकरमायकोसिस’चा विस्फोट, आतापर्यंत 53 बळी

औरंगाबादेत म्युकरमायकोसिसचा विस्फोट झालाय. म्युकरमायकोसिसने आतापर्यंत 53 जणांचे प्राण गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर म्युकरसायकोसिस रुग्णांची संख्याही तब्बल पावणे सहाशेवर जाऊन पोहोचलीय. खाजगी रुग्णालयांकडून आतापर्यंत रुग्ण आणि मृतांच्या आकड्यांची लपवाछपवी सुरु होती. मात्र आरोग्य यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार म्युकरमायकोसिसने 53 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय. म्युकरमायकोसिसच्या नव्या माहितीने औरंगाबादेत एकच खळबळ उडाली आहे.

उपचारासाठी लागणारी इंजेक्शन अपुरी

औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु आता म्युकरमायकोसिसचा घट्ट विळखा पाहता औरंगाबादमधील नागरिकांच्या पुन्हा चिंता वाढल्या आहेत. त्यात भरीस भर म्हणजे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उचपार करणाऱ्यासाठी लागणारी इंजेक्शनची वाणवा भासू लागली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड हेळसांड आणि मनस्तापाला सामोरे जावं लागतंय.

संबंधित बातम्या :

Mucormycosis : म्युकरमायकोसिसची भीती वाटतेय? मग ICMR ने सुचवलेल्या ‘या’ गोष्टी कराच…

कोरोनामुक्त मधुमेहींना म्युकोरमायकोसिसचा धोका, लक्षणं कोणती? आजार टाळण्याचे उपाय काय?

86 patients of Mukarmycosis in Ambajogai taluka of Beed district, 10 deaths so far

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.