Maharashtra Mumbai Rains IMD Alert LIVE : येत्या 48 तासात कोकण आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Mumbai Rains IMD Monsoon Alert LIVE : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने राज्यभरात दाणादाण उडवली आहे. त्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातल्याने राज्यातील अनेक भागात नद्या, नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावातही पाणी शिरलं आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांचं स्थलांतर केलं आहे. पावसाने दाणादाण उडवल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. काल तर पावसामुळे मुंबई आणि ठाण्यात चांगलीच दाणादाण उडवली होती. त्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. लोकलसेवा ठप्प झाल्याने चाकरमान्यांचे घरी जाताना चांगलेच हाल झाले होते. आजही सकाळपासून अनेक भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
पुढील चोवीस तास पालघर, रायगड, ठाणे, सातारा आणि पुण्यात रेल अलर्ट
मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसाचे अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले आहे. पर्यटकांनी कोकण आणि घाट परिसरात न जाण्याचे आवाहन करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
-
वसई विरार महापालिकेकडून 300 नागरिकांना करण्यात आले जेवणाचे वाटप
वसईच्या वाघराल पाड्यात वसई विरार महापालिकेकडून 300 नागरिकांना जेवणाचे वाटप करण्यात आले आहे. वाघराल पाड्यात शेकडो नागरिकांना अतिवृष्टी चा फटका बसला आहे. याठिकाणी कामगार, गरीब लोकांची वस्ती आहे. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी या परिसराला भेट देऊन तेथील नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.
-
-
नालासोपारामध्ये साचले सर्वत्र पाणीच पाणी
नालासोपारामध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. आज दुपारी चारच्या दरम्यान नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील गोल्डन टायर दुकानात आलेल्या एक दुचाकीचील सीट खाली हा साप आढळून आला. समोरच असलेल्या अग्निशमन केंद्राच्या जवानांनी त्याला सुरक्षीत दुचाकीच्या बाहेर काढून, सुरक्षीत स्थळी सोडले.
-
घटना अत्यंत दुर्दैवी, मी त्या कुटुंबांसाठी प्रार्थना करतो- अंबादास दानवे
इर्शाळवाडी इथली घटनाही अत्यंत दुर्दैवी आहे आणि आज सकाळपासून मी तिथे होतो. त्या ठिकाणची मी पूर्ण पाहणी केलेली आहे. मला वाटतं की दहा ते वीस फूट खाली हे सगळं कुटुंब त्या ठिकाणी ढिगार्याखाली आहेत. केवळ फक्त एक चमत्कार त्यांना तिथून बाहेर काढू शकतो. अन्यथा त्यांना तिथून बाहेर काढणे अशक्य आहे. आपण केवळ प्रार्थना करू शकतो की ही कुटुंब वाचली पाहिजेत, असेही अंबादास दानवे म्हणाले आहेत.
-
हे पूर्ण रेस्क्यू करण्यासाठी साधारण एक आठवडा जाईल
इर्शाळवाडी गावामध्ये मोठी घटना घडलीये. रेस्क्यू टीम रात्री दीड ते दोनच्यानंतर घटनास्थळी दाखल झालीये. मात्र, चिखलामुळे बचाव कार्य करण्यास अडचणी येत आहेत. काही जणांना बाहेर काढण्यात देखील त्यांना यश आला आहे. ढिकाऱ्याखाली काही मृतदेह देखील अडकले आहेत. हे पूर्ण रेस्क्यू करण्यासाठी साधारण एक आठवडा जाईल, असल्याचे सांगितले जात आहे.
-
-
इर्शाळवाडी येथील बचावकार्य काही काळासाठी थांबवले
इर्शाळवाडी येथील बचाव कार्यात पावसाने पुन्हा खोडा घातला. बचाव कार्यात मोठा अडथळा येत आहे. या गावावर दरड कोसळली. त्यात 12 जणांचा मृत्यू ओढावला आहे. अनेक जणांची सूटका करण्यात येईल. पावसाने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. काही काळासाठी बचाव कार्य थांबविण्यात आले आहे. आता थोड्यावेळाने अंधार होईल. या ठिकाणी वीजेची व्यवस्था नसल्याचा ही फटका बसू शकतो. पाऊस कमी झाला तर बचाव कार्याला वेग येईल.
-
इर्शाळवाडीमध्ये जोरदार पाऊस, बचाव कार्यात अडथळा
इर्शाळवाडीत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. बचाव कार्यात त्यामुळे अडथळा येत आहे. या दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरु आहेत. दरड कोसळून येथे 12 जणांचा मृत्यू ओढावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृताच्या नातेवाईकांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.
-
दूर्घटनाग्रस्त कुटूंबाचे पुनर्वसन करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इर्शाळवाडी जेथे भूस्खलन झाल्यानंतर युध्द पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा सध्या घटनास्थळीच आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच अस्थायी निवासाची व्यवस्था सरकारकडून करण्यात आली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबीयांना पाच लाखाची मदत जाहिर करण्यात आलेली आहे. तसेच सरकारकडून पिडीत कुटूंबाचे पूनर्वसन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
-
अमित शाह यांच्याकडून इर्शाळवाडीतील घटनेची विचारपूस, केंद्राकडून मदत मिळणार- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिड तास पायी प्रवास करून घटनास्थळ गाठले. त्यानंतर संपूर्ण बचावकार्याचा त्यांनी आढावा घेतला. अमित शाह यांच्याकडून इर्शाळवाडीतील घटनेची विचारपूस करण्यातरिता फोन आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्राकडून आवश्यक असलेली सर्व मदत मिळण्याबाबत त्यांनी आश्वस्त केल्याचेही ते म्हणाले. दूर्घटनेट मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबीयांनी सरकारकडून पाच लाख रूपयांची मदत देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगीतले.
-
मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा
इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्यानंतर एनडीआरएफची टिम, अग्नीशामक दल, समाजसेवी संघटना आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरू आहे मात्र पावसामुळे या बचावकार्यात अडथळे येत आहे. जवळपास चाळीस कुटूंब हे दरडीखाली दबल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, आदिती तटकरे हे घटनास्थळी दाखल झालेले आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीतील घटनास्थळी दाखल
इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळली. यामुळे संपूर्ण गावच डोंगराखाली दबले गेले आहे. घटनेनंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा दाखल झाले आहे. या दूर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवीत हानी झाली आहे. सर्वत्र लोकांचा आक्रोष पाहायला मिळत आहे. इर्शाळवाडीत पोलिस कंट्रोल रूमची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी 8108195554 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बचावकार्याचा आढावा घेत आहेत.
-
मंत्री गिरीश महाजन यांची संपूर्ण बचाव कार्यावर नजर
इर्शाळवाडीमध्ये घडलेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर बचाव कार्याचा वेग वाढवण्यात आलेला आहे. मंत्री गिरीश महाजन सकाळी चार वाजतापासून इर्शाळवाडीच्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांचे बचाव कार्यावर लक्ष असल्याचे त्यांनी सांगीतले. सकाळी पाच वाजता एनडीआरएफची टिम घटनास्थळी आल्यानंतर बचावकार्याला वेग आल्याचे त्यांनी सांगीतले.
-
यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय- उपमुख्यमंत्री अजित पवार
रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शालवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
-
मुंबईतही दोन हेलिकॉप्टर्स तयार ठेवले- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
ज्या ठिकाणी रेड अलर्ट आहे तिथे ऑरेंज अलर्ट सांगितला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस जास्त पडत आहे. मुंबईतही दोन हेलिकॉप्टर्स तयार ठेवले आहेत. पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी याठिकाणच्या कलेक्टरसोबत सातत्यानं संपर्कात आहे, असेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.
-
सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, मुंबई याठिकाणी परिस्थितीवर शासन लक्ष ठेवून
सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, मुंबई याठिकाणी परिस्थितीवर शासन लक्ष ठेवून आहे. हवामान खात्याने पुढील 5 दिवसांसाठी ज्या ठिकाणी रेड अलर्ट आहे तिथे ऑरेंज अलर्ट सांगितला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस जास्त पडत आहे. काही ठिकाणी शाळांना सुट्ट्या दिल्या आहेत तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत. मोठ्या क्षमतेचे दोन हेलिकॉप्टर्स पंजाबहून मागवले आहेत. मुसळधार पावसामुळे मशिन उचलून नेणे शक्य नसल्याने हेलिकॉप्टरची व्यवस्था करत असल्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार विधानपरिषदेत म्हणाले.
-
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर
उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत विधान परिषदेत निवेदन सादर केले. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असल्याचे अजितदादांनी सांगितले. इर्शाळवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू आहे. उंच डोंगर, पाऊस आणि चिखल साचल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत असून बचावकार्यासाठी एनडीआरएफ, सिडको, स्थानिक ट्रेकचे तरूण अशी 500 लोकांची टीम बचावकार्यात झटत असल्याची माहिती त्यांनी दिली.
-
MGM रुग्णालयात दुर्घटनाग्रस्तांवर मोफत उपचार केले जाणार
MGM रुग्णालयात 2 जखमी वर उपचार सुरू आहेत. या दोघांची प्रकृती गंभीर आहे. इर्शाळगड दुर्घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये रुग्ण येणार असल्याची सूचना देण्यात आली होती. या नंतर इथे जम्बो ट्रामा सेटंर तयार करण्यात आलाय. एकाच वेळी २०० पेक्षा जास्त जणांवर उपचार करु शकतो याची आम्ही तयारी केलीये. दुर्घटनाग्रस्तांवर मोफत उपचार केले जाणार असून हे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत अशी माहिती MGM हॅास्पिटल डीन सुधीर यांनी दिलीये.
-
इर्शाळवाडी दुर्घटनेतील दोन जखमींवर कामोठेमधल्या एम.जी.एम रुग्णालयात उपचार
रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींपैकी दोन जखमींना कामोठेमधल्या एम.जी.एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रवीण डावरे, यशवंत पारधी अशी जखमींची नावं आहेत. या दोघांवरही एम.जी.एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला…
भाईंदर स्टेशनच्या समोरील बिल्डिंगचा भाग कोसळला आहे. या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती व्यक्त होत आहेत. भाईंदर पूर्व स्थानकासमोरील इमारतीचा काही भाग कोसळल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांनी काहींना बाहेर काढल आहे. बचावकार्य अद्याप सुरू आहे. अग्निशमन, पोलिस दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. अनेक वाहनंही ढिगाऱ्याखाली आहेत. ही घटना आज सकाळी घडली आहे. या इमारतीच्या आत अनेक दुकानं होती.
-
इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत उदय सामंत म्हणाले…
इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. दुर्घटनाग्रस्त ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. TDRF NDRF च्या टीम त्या ठिकाणी पोहचल्या आहेत. जे लोक जखमी झाले आहेत. त्यांना आम्ही तात्काळ उपचार देत आहोत. स्थानिक प्रशासन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सर्व टीम पोहचल्या आहेत. 96 लोकांची या ठिकाणी ओळख पटवण्यात आली आहे. 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. या घटनेसंदर्भात तातडीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली आहे. खराब हवामानामुळे त्या ठिकाणी हॅलीकॉप्टर पाठवता येत नाहीये. पण हवामान ठीक होताच हेलिकॉप्टरने मदत पोहचवू, असं सामंत म्हणालेत.
-
इर्शाळवाडीमध्ये पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात
इर्शाळवाडीमध्ये पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बचावकार्य करताना अनेक अडचणी येत आहेत. पायथ्यापासून गावापर्यंत पोहचण्यासाठी NDRF चे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
-
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त ठिकाणी शिवभोजन थाळीचं वाटप केलं जाणार
रायगडच्या इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीचे पॅकेट वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तशा सुचना दिल्या आहेत. आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरून हे पॅकेट देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर ५ लिटर रॉकेल देण्यात येणार आहे. १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार आहे. जो पर्यंत परिस्थिती पूर्व पदावर येत नाही तो पर्यंत हा पुरवठा सुरू राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश तातडीने दिले आहेत.
-
इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावली तातडीची बैठक
रायगडमधल्या खालापूरच्या इर्शाळवाडी गावामध्ये झालेल्या दुर्घटनेबाबत खालापूरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. स्थानिक प्रशासनाची तातडीची बैठक त्यांनी बोलावली आहे. बैठकीला घटना स्थळी उपस्थित असलेले मंत्री देखील राहणार आहेत. मुख्यमंत्री आणि स्थानिक नेत्यांकडून, अधिकाऱ्यांकडून घटनेचा आढावा घेण्यात येत आहे.
-
विरार पश्चिम आगाशी ते स्टेशन रोड पाण्याखाली; नागरिकांचा संताप
विरार पश्चिम आगाशी ते स्टेशन रोड पाण्याखाली गेला आहे. आगाशी, बोलींज, विराट नगर, पुरा पाडा या परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. घरात पाणी, रस्त्यावर पाणी सर्वत्र पाणीच झाल्याने अनेक नागरिक हे 2 किलोमीटर पायी चालत पाण्यात चालत आले आहेत. मागच्या 10 वर्षांपासून पावसाळ्यात अशीच परिस्थिती असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
-
विरारमध्ये आगाशी ते स्टेशन रोड पाण्याखाली
विरार पश्चिम आगाशी ते स्टेशन रोड पाण्याखाली गेला आहे. आगाशी, बोलींज, विराट नगर, पुरा पाडा या परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. घरात पाणी, रस्त्यावर पाणी सर्वत्र पाणीच झाले आहे. मागच्या 10 वर्षांपासून पावसाळ्यात अशीच परिस्थिती असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
-
इर्शालवाडीत ढिगाऱ्याखालून काढण्याचे प्रयत्न सुरु- अजित पवार
इर्शालवाडी परिसरात घडलेल्या या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही दुर्घटना मन पिळवटून टाकणारी, विषण्ण करणारी असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. बचाव पथकानं अनेकांना ढिगाऱ्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचवला आहे, परंतू काही नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली असून त्यांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
-
धोकादायक पद्धतीने वसलेली गावे शोधून पुनर्वसन करा- सुप्रिया सुळे
रायगड जिल्ह्यातील इरसाल गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावावर दरड कोसळली. पुणे जिल्ह्यातील माळीण आणि आताच्या दुर्घटनेपासून धडा घेऊन अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने वसलेली गावे शोधून पुनर्वसन करण्याचे काम राज्य सरकारने तातडीने हाती घ्यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
-
राज्यात सगळीकडे अलर्ट – फडणवीस
हवामानचा पॅटर्न बदलला आहे. आता कमी दिवसांत जास्त पाऊस पडत आहे. राज्यात सगळीकडे अलर्ट दिला आहे. भूस्खलानाचे स्पॉट सातत्याने बदलत आहे. त्यामुळे इर्शाळवाडीवरील प्रकरणातून धडा घेऊन अधिक चांगले नियोजन करता येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
-
कोल्हापूर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द
मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठाला फटका बसला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयाच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. गुरुवारी होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. आजच्या परीक्षांचे सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाने जाहीर केले आहे.
-
रात्री रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले- फडणवीस
इर्शाळवाडी हे गाव डोंगरावर आहे. या ठिकाणी ४८ घरे आहेत. जवळपास २०० लोक त्या ठिकाणी राहतात. रात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरीश महाजन यांना घटनास्थळी पाठवले. रात्री रेस्क्यू ऑपरेशन करणे शक्य नव्हते. तरी शक्य असतील तितक्या लोकांना बाहेर काढले आहे. या ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
-
वसई, विरारमध्ये जोरदार पाऊस
वसई, विरारसह पालघर जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशीही वसई विरार नालासोपारा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहे. रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे.
-
हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दरडग्रस्त इर्शाळगड गावाला भेट देऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेत दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
-
ग्रामीण भागात जोरदार पावसाची बॅटींग सुरू
अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जोरदार पावसाची बॅटींग सुरू आहे. अशातच तिवसा तालुक्यातील ममदापूर येथे नंदा पुनसे या महिलेच्या घरात पाणी शिरल्याने रात्रीला घराची भिंत कोसळली. त्यात लाखोंचे नुकसान झाले असून घरात झोपलेले पाच जण सुदैवाने बचावले आहेत. मात्र घर कोसळल्याने त्यांचे संसार उघड्यावर आला आहे.
-
पाऊस आणि धुक्यामुळं मोठी अडचण निर्माण झाली आहे – अजित पवार
पाऊस आणि धुक्यामुळं मोठी अडचण निर्माण झाली आहे.
अनेक मंत्री घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सकाळपासून बचावकार्य सुरु आहे,
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२२८ लोकांची वस्ती आहे, त्यामधील ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
खराब हवामानामुळे मदतकार्यात अडचण
-
आज आणि उद्या दुर्गम भागात असलेल्या शाळा आणि या भागातील अंगणवाड्याही बंद ठेवल्या जाणार
– घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज आणि उद्या दुर्गम भागात असलेल्या शाळा आणि या भागातील अंगणवाड्याही बंद ठेवल्या जाणार
– जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांचे आदेश,
– ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि सीडीपीओ यांनी परिसरात असणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहतील.
– हा आदेश अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, सर्व मंडळांशी संलग्न अनुदानित व खाजगी शाळांना लागू आहे.
– इतर सर्व भागातील शाळा आणि अंगणवाड्या सामान्यपणे चालू राहतील, असेही आदेशीत करण्यात आले आहे.
-
दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त, मृत्यु पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
दरम्यान, इर्शालवाडी परिसरात घडलेल्या या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून ही दुर्घटना मन पिळवटून टाकणारी, विषण्ण करणारी असल्याचे म्हटले आहे. बचाव पथकानं अनेकांना ढिगाऱ्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचवला आहे, परंतू काही नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली असून त्यांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आवश्यक वैद्यकीय उपचार केले जात आहेत. सर्व जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या बांधवांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली आहे.
-
धरणात तरुण बुडाला
जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणात मासेमारीसाठी गेलेला शिवेवाडी येथील तरुण 48 तासांपासून बेपत्ता असून कैलास जाधव (वय 45 वर्ष ) असं त्याच नाव आहे. मासेमारीसाठी तो काल दुपारी धरणात गेला असताना ट्यूब पलटुन पाण्यात बुडाला आहे.
-
रायगड दुर्घटनेनंतर सुनील तटकरे तातडीने रवाना
रायगड दुर्घटनेनंतर सुनील तटकरे तातडीने रवाना झाले आहेत. संसदेचे अधिवेशन सोडून सुनील तटकरे रवाना झाले आहेत. शक्यतोपरी जी लागेल ती मदत केली जाईल. रात्रीपासून मी सगळ्या घटनेचा आढावा घेत आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.
-
आदिती तटकरे घटनास्थळी दाखल
आदिती तटकरे घटनास्थळी दाखल
२७ जणांना वाचवण्यात यश आलं आहे
स्थानिक रुग्णालयात लोकांना दाखल केलं जात आहे.
सगळे मंत्री कामाला लागले आहेत.
मदत कार्याला वेग आला आहे.
-
अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले
उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले असून तिथून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूर नजिक इर्शालगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदत कार्याचं नियंत्रण करीत आहेत. जलदगतीने मदत पोहोचावी यासाठी ते स्वतःला आसपासच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांशी बातचीत करत आहेत.
-
पाच जणांचा मृत्यू झाला
खराब हवामान असल्यामुळे हेलिकॉप्टरने मदत करीत असताना अनेक अडचणी येत आहेत. पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
-
खालापूर दरड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
खालापूर येथील दरडग दुर्घटनेत दगावलेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत केली जाणार आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. तसेच मदतकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
-
खालापूर दरड दुर्घटनेत लहान मुले दगावल्याची भीती
खालापूर येथे इर्शालगडाजवळ दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या दुर्घटनेत अनेक लहान मुले दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पॅावर प्लांटचा राखेचा बंधारा फुटला, नापिकीची भीती
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पॅावर प्लांटचा राखेचा बंधारा फुटला आहे. काल मुसळधार पावसामुळे हा बंधारा फुटला. वारेगाव येथील राखेचा बंधारा फुटल्याने परिसरातील जलस्रोतात राख मिश्रीत पाणी आले आहे. राख बंधारा फुटल्याने अनेक शेतकऱ्यांची शेतजमिनीत राख मिश्रीत पाणी आलं आहे. त्यामुळे शेती नापिकी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल, मदतकार्याचा आढावा घेण्यास सुरुवात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे हे खालापूर दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्योग मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्याकडून तसेच अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही करत आहेत.
-
खालापूर येथे दरड कोसळली, 100 लोक दबल्याची भीती; चौघांचा मृत्यू
खालापूरच्या इर्शालगडाजवळ डोंगराजवळील एका गावावर काल रात्री दरड कोसळली. या दरडीखाली 50 ते 60 घरे दबली आहेत. आतापर्यंत या दरडीखालून 34 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
Published On - Jul 20,2023 7:41 AM