Maharashtra Mumbai Rains IMD Alert LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा, पूरग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी

| Updated on: Jul 24, 2023 | 8:36 PM

Maharashtra Mumbai Rains IMD Monsoon Alert LIVE : राज्यात पहाटेपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

Maharashtra Mumbai Rains IMD Alert LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा, पूरग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी
Mumbai RainsImage Credit source: tv9 marathi

मुंबई | 24 जुलै 2023 : राज्यात काल दिवसभर कोसळल्यानंतर आज पहाटे पासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई, ठाणे , रायगड आणि पालघर जिल्ह्यात तर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. राज्यात तर काही ठिकाणी गावांमध्ये पाणी शिरलं आहे. राज्यात अनेक भागात पूर आला आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घराघरांमध्ये पाणी शिरत असल्याने लोक भयभीत झाले आहेत. वसई, विरार, नालासोपाऱ्यातही कंबरे इतके पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. आजही दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Jul 2023 08:35 PM (IST)

    Ajit Pawar on Flooded Affected People | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा

    मुंबई | राज्यभरात पाऊस सक्रीय झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृष स्थिती आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं. त्यामुळे घरातील अनेक वस्तूंचं नुकसान झालं. या पूरग्रस्तांसाठी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. अजित पवार यांनी पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पूरग्रस्तांना 5 ऐवजी 10 हजार रुपये देण्यात येणार आहे.

    अजित पवार यांची मोठी घोषणा

  • 24 Jul 2023 11:55 AM (IST)

    यवतेश्वर घाटात दरड हटवण्याचे काम

    साताऱ्यातील यवतेश्वर घाटात सांबरवाडी जवळ पावसामुळे दरड कोसळली होती. यातील एक भला मोठा दगड अजूनही यवतेश्वर घाटाच्यावरील बाजूस आहे. हा भला मोठा दगड हटवण्याचे काम हाती घेतले आहे. पोकलेनच्या मदतीने हे सर्व दगड हटवण्यात येत आहेत.

  • 24 Jul 2023 11:44 AM (IST)

    कोकणातील धरणांमध्ये मोठा जलसाठा

    कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे या भागांतील धरणे तुडुंब भरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नातूनगर धरण पूर्ण भरली आहे. यामुळे धरणातून विसर्ग सुरु केला आहे.

  • 24 Jul 2023 11:31 AM (IST)

    बुलढाणा जिल्ह्यात पंचनामे सुरु

    बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे प्रशासनाकडून सुरू केले आहे. मात्र तातडीने मिळणारी पाच हजाराची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही.

  • 24 Jul 2023 11:20 AM (IST)

    नांदेड जिल्ह्यात कुंटूरमध्ये गुडघाभर पाणी

    नांदेड जिल्ह्यातील कुंटूर येथील गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन वस्तीमध्ये पाणीच पाणी झाले आहे. नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. रस्ता अन् नाला नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • 24 Jul 2023 11:09 AM (IST)

    पनवेलमध्ये रस्त्यावर झाड पडले

    पनवेलमध्ये पायनियर सोसायटी येथे रस्त्यावर मोठे झाड पडले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित झाली नाही. झाड रस्त्यावरून बाजूला काढण्याचे काम अग्निशमन दल करत आहेत.

  • 24 Jul 2023 10:57 AM (IST)

    आमचं कायमचं पुनर्वसन करा, सांगलीच्या मिरुखवाडीतील नागरिकांची मागणी

    सांगलीतील शिराळा तालुक्यातील मिरुखवाडी या ठिकाणी ही परिस्थिती ही माळीण, इशालवाडी सारखीच आहे. याठिकाणी जमीन खचण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. या तालुक्यात 4 महिने सतत प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी भूस्खलनासारखे प्रकार घडत असतात.  त्यामुळे  जिल्हा प्रशासनवर स्थानिक नाराज आहेत.  जिल्हा प्रशासनाने आमची तात्पुरती सोय न करता आमचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावं, अशी मागणी स्थानिक करत आहेत.  मिरुखवाडी येथील ग्रामस्थ बाळासाहेब मिरुखे,मणदूर ग्रामपंचायत सरपंच शोभा माने जिल्हा परिषद सदस्य हणमंत बापू पाटील यांनी याबाबतती माहिती दिली आहे.

  • 24 Jul 2023 10:50 AM (IST)

    लोणावळा धरण परिसरात २४ तासात १५६ मीमी पावसाची नोंद

    लोणावळा धरण परिसरात गेल्या २४ तासात १५६ मीमी पावसाची नोंद झाली असून या कालावधीत २.१२ दलघमी आवकाची नोंद झाली आहे. पर्ज्यन्याचा कल असाच राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून इंद्रायणी नदी पात्रात विसर्ग सूरू होण्याची दाट शक्यता आहे. तरी नदी पात्रालगत आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क रहावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

  • 24 Jul 2023 10:45 AM (IST)

    चंद्रपूर शहरात पूरस्थिती कायम

    चंद्रपूर शहरात पूरस्थिती जैसे थे आहे. शहराला वळसा घालणारी इरई नदी पात्र सोडून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.  चंद्रपूर शहरातील सखल भागात पाणीच झालं आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने पोलीस बचाव पथकाच्या सहकार्याने आतापर्यंत 400 हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. सध्या पाण्याची पातळी जैसे थेच असली तरी पूर ओसरण्याची गती मात्र धीमी आहे.

  • 24 Jul 2023 10:30 AM (IST)

    गडचिरोलीत 24 तासात 5.5 मिमी पावसाची नोंद

    गडचिरोली जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. तर गेल्या 24 तासात 5.5 मिली मीटर पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्राणहिता वैनगंगा गोदावरी इंद्रावती पर्लाकोटा दिना पामुला गौतम या सर्व नद्या १००% भरभरून वाहत आहेत. सध्या पूर परिस्थिती नियंत्रणात आहे.  मध्यप्रदेश छत्तीसगड तेलंगाना किंवा गोसीखुर्द धरणातून पाणी सोडल्यास पूर परिस्थिती पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात कायम राहणार आहे.

  • 24 Jul 2023 10:15 AM (IST)

    पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल

    कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे.  पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट 5 इंचावर गेली आहे. कोल्हापूर शहर परिसरात पावसाची उघडझाप सुरु आहे. तर धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू आहे.  पालकमंत्री दीपक केसरकर आज कोल्हापुरात येणार आहेत.  कोल्हापुरातील संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. आढाव्यानंतर साडेसहा वाजता दीपक केसरकर यांचे पत्रकार परिषद घेऊन परिस्थितीची माहिती देणार आहेत.

  • 24 Jul 2023 10:10 AM (IST)

    कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल

    कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल. पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट 5 इंचावर. शहर परिसरात पावसाची उघडझाप तर धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू. पालकमंत्री दीपक केसरकर आज कोल्हापुरात येणार. कोल्हापुरातील संभाव्य पूरस्थितीचा घेणार आढावा. आढाव्यानंतर साडेसहा वाजता दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद.

  • 24 Jul 2023 08:35 AM (IST)

    रायगडमधील शाळांना आज सुट्टी

    रायगडमधील प्राथमिक माध्यमिक शाळांना आज सुट्टी आहे. रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट आहे. पावसाचा अतिधोका असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी आदेश काढले आहेत.

  • 24 Jul 2023 08:28 AM (IST)

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक विस्कळीत

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अद्याप ही वाहतूक विस्कळीत आहे. आडोशी बोगदा आणि लोणावळा जवळ दरड कोसळल्यानं गेल्या अनेक तासांपासून हीच परिस्थिती आहे. आडोशी बोगद्याजवळ एक लेन बंद असल्याने आत्ता बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा आहेत. वाहतूक धीम्या गतीने असल्याने मुंबईकडे जाणाऱ्यांना अधिकचा वेळ वाया घालवावा लागतोय

  • 24 Jul 2023 08:17 AM (IST)

    वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांना सर्तकतेचा इशारा

    सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरण व वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे वारणा नदी पात्राच्या बाहेर पडली आहे. त्यामुळे शेतामध्ये पाणी शिरले आहे. शिराळा तालुक्यातील मांगले सावर्डे वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • 24 Jul 2023 08:05 AM (IST)

    पावसाची वसई-विरारमध्ये आता काय स्थिती?

    वसई विरारमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. शहराच्या मुख्य रस्त्यावरील पाणी।पूर्ण ओसारले आहे. मात्र सकल भागातील सोसायटीमध्ये पाणी साचलेले आहे.

  • 24 Jul 2023 07:59 AM (IST)

    चंद्रपुरातील पूर परिस्थिती अजूनही कायम, हजारो घरांना पुराचा फटका

    वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर शहरात परवा रात्रीपासून पाणी शिरलं आहे. चंद्रपूर शहरातल्या रहमतनगर, सिस्टर कॉलनी, तिमांडे ले-आउट मधल्या हजारो घरांना पुराच्या पाण्याचा विळखा पडला आहे. चंद्रपूर शहर हे इरई आणि झरपट नद्यांच्या किनाऱ्यावर आहे आणि या नद्यांचं पाणी हे वर्धा नदीला जाऊन मिळतं. मात्र वर्धा नदीचं पात्र फुगल्याने इरई आणि झरपट नद्यांचं पाणी वर्धा नदीत जात नसल्याने ते चंद्रपूर शहरात शिरलं आहे.

  • 24 Jul 2023 07:50 AM (IST)

    वसईत आता रोगराईची भीती, आरोग्य विभाग जाणार घरोघरी

    वसईत पूरपरिस्थिती नंतर रोगराई टाळण्यासाठी वसई-विरार महापालिकेचा आरोग्य विभाग आता घरोघरी जात आहे. साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू नये म्हणून घरोघरी, औषध फवारणी, नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधं दिल्या जात आहेत. मागच्या 5 दिवसापासून वसई, विरार, नालासोपाऱ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरात, सोसायटीमध्ये, रस्त्यावर पाणी साचले होते. रस्त्यावरील पाणी ओसरले, पण अनेकांच्या घरात पाणी आहे. रोगराईवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या आदेशावरून आरोग्य विभागाचे कर्मचारी मैदानात उतरले आहेत.

  • 24 Jul 2023 07:39 AM (IST)

    कल्याण- डोंबिवलीत रात्रीपासून मुसळधार पाऊस, रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात

    चार दिवस मुसळधार कोसळल्यानंतर काल दिवसभर कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने उघडीप दिली होती. मात्र दिवसभराच्या विश्राती नंतर काल मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्री पासून पडत असलेल्या पावसामुळे कल्याण पश्चिम परिसरातील रामबाग, जोशीबाग रोडवर पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. अधूनमधून पावसाचा वेग कमी होत असल्याने या पाण्याचा निचरा ही होत आहे.

  • 24 Jul 2023 07:28 AM (IST)

    मुंबईत पावसाची रिमझिम, पाणी साचलं नाही, वाहतूक कोंडी नाही

    मुंबई आणि उपनगर परिसरातील गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. रात्रभर अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू आहे. रिमझिम पाऊस असल्याने अंधेरी सब-वे मध्ये रात्री पाणी साचलेली नाही. पाणी साचलेलं नसल्याने रात्री अंधेरी सब-वे मधून वाहनांचा ये-जा सुरू आहे.

  • 24 Jul 2023 07:11 AM (IST)

    आजपासून पूरग्रस्तांना 5 हजारांची तात्काळ मदत देणार, अनिल पाटील यांची घोषणा

    आजपासून राज्यातील पूरग्रस्तांना पाच हजार रुपयांची तात्काळ मदत देण्यात येणार आहे. तसेच त्यांनी अन्न धान्याची पाकिटंही देण्यात येणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केली आहे.

  • 24 Jul 2023 06:58 AM (IST)

    घरातून बाहेर पडताना जपून, मुंबई, कोकणाला येलो, तर ठाण्याला ऑरेंज अॅलर्ट

    रात्रीपासूनच मुंबईसह ठाण्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. आज मुंबईसह कोकणाला हवामान खात्याने येलो अॅलर्ट जारी केला आहे. तर ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. त्यामुळे घरातून विनाकारण बाहेर पडू नका. तातडीचं काम असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

  • 24 Jul 2023 06:55 AM (IST)

    लोणावळ्याजवळ दरड कोसळली, कोणतीही दुर्घटना नाही; वाहतूककोंडी

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळा लगत दरड कोसळलीय होती. मात्र आडोशी बोगद्याच्या तुलनेत ही दरड खूपच कमी होती. आता लोणावळा लगतच्या मार्गावरील दरड हटविल्याच यंत्रणेकडून सांगण्यात आलंय. मात्र यामुळं मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा विस्कळीत झालेली आहे. उर्से टोल नाक्याजवळ अनेक वाहनं आताही थांबवलेली आहेत.

  • 24 Jul 2023 06:52 AM (IST)

    मुंबई, ठाण्यात रात्रभर संततधार, अनेक ठिकाणी पाणी साचलं

    मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मात्र, पावसाचा जोर अधिक नसल्याने या पाण्याचा पटापट निचरा होत आहे. कुठेही वाहतूक कोंडीची समस्या झालेली नाही.

Published On - Jul 24,2023 6:47 AM

Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.