Maharashtra: Mumbai Rains LIVE, Monsoon Updates : राज्यात पावसामुळे पाचवी आणि आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

| Updated on: Jul 15, 2022 | 6:45 AM

Maharashtra Mumbai Rains LIVE Monsoon, IMD Updates in Marathi : राज्यात जवळपास सर्वच भागात जोरदार पाऊस बरसतोय. गडचिरोली आणि नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गडचिरोली दौऱ्यावर पोहोचले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 4- 5 दिवसात कोकण (मुंबई ठाण्यासह), मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार‌ पाउस, मराठवाड्यातही पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे.

Maharashtra: Mumbai Rains LIVE, Monsoon Updates : राज्यात पावसामुळे पाचवी आणि आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
Maharashtra: Mumbai Rains LIVE, IMD UpdatesImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्यात सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळतोय. तर नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालीय. अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर पोहोचलेत. तिथे असलेल्या पूरस्थितीचा आढावा ते घेत आहेत. तसंच संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचनाही त्यांनी केलाय. तिकडे नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर शहराला (Navapur City) पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. तर नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली असून, गंगापूर धरणातून जवळपास दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या जवळपास मानेपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Jul 2022 05:58 PM (IST)

    वसई तालुक्यात पर्यटन स्थळी जाण्यावर बंदी

    मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून 144 कलम केले लागू

    मान्सून काळात निसर्गाचा, तसेच धबधबे, तलाव, धरण, समुद्र किनारी आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठयप्रमानात येतात.

    अतिवृष्टी मध्ये पर्यटकांची जीवित किंवा वित्त हानी होऊ नये यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय। परिमंडळ 2 चे पोलीस आयुक्त संजयकुमार पाटील आजपासून पर्यटन स्थळ, धोकादायक परिसरावर केला मनाई आदेश जारी

    पर्यटन स्थळावर किंवा स्थळापासून 1 किलोमीटर अंतरा पर्यंत पर्यटकांना मनाई आदेश जारी केला आहे. या परिसरात फोउजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2) हेही लागू केले आहे.

    – पर्यटन स्थळावर पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, पोहणे, धबधब्याच्या उगमस्थान जाणे किंवा पोहणे, सेल्फी काढणे, नैसर्गिक पर्यटन किंवा धोकादायक ठिकाणी मद्यपान करणे, बाळगणे, धोकादायक ठिकाणी वाहन थांबवणे किंवा चालवणे, या सहा अन्य काही बाबीनवर पोलिसांनी मनाई आदेश लागू केला आहे.

  • 14 Jul 2022 05:57 PM (IST)

    राज्यात पावसामुळे पाचवी आणि आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

    मुंबई- राज्यात 20 जुलैला राज्यभरात होणार होती परीक्षा मात्र आता पावसामुळे ती 31 जूलैला परीक्षा होणार. परीक्षेसाठी नवीन हॉलतिकीट काढण्याची गरज नाही ते ग्राह्य धरलं जाणार, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.

  • 14 Jul 2022 05:52 PM (IST)

    नांदेडमधील पूरस्थिती ओसरण्यास सुरुवात

    नांदेड: जिल्ह्यातील पूरस्थिती निवळण्यास सुरुवात, गोदावरी-पैनगंगा नद्यांचे पाणी हळूहळू होतेय कमी, अनेक रस्ते वाहतुकीसाठी पुन्हा खुले, सहा दिवसानंतर काही भागात सूर्यदर्शन, पासदगाव इथल्या आसना नदीत वाहून गेलेल्याचा अद्याप शोध लागेना.

  • 14 Jul 2022 05:51 PM (IST)

    मुंबई-अहमदाबाद हायवेवर पाणी, वाहतूक मंदावली

    मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर नवसारी आणि गुजरातच्या इतर भागात पाणी साचले आहे. लहान वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे वाहतूक अत्यंत मंदावली आहे. गुजरातकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना गुजरातमध्ये महामार्ग मोकळा होईपर्यंत प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे किंवा त्यांना अडथळे येऊ शकतात. असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी केले आहे,

  • 14 Jul 2022 03:28 PM (IST)

    दरड कोसळली, कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

    रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावरच्या अंजनी-चिपळूण दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली आहेत. युद्ध पातळीवर दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  पुढच्या अर्ध्या तासात रेल्वे ट्रॅक सुरळीत होणार असा दावा कोकण रेल्वेने केला आहे.

  • 14 Jul 2022 03:24 PM (IST)

    तेलंगणा राज्यातील दोन शेतकऱ्यांची पुरातून हेलिकॉप्टरद्वारे सुटका

    गडचिरोली- तेलंगणा-महाराष्ट्र सीमावर्ती भागात, तेलंगणा राज्यातील सोमनपल्ली येथे पुरात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरने दोन नागरिकांना रेस्क्यू करण्यात आला जिल्ह्यात मेडीगट्टा धरणातुन सोडलेल्या पाण्यामुळे मोठा पुराचा फटका महाराष्ट् सीमावर्ती भागात व तेलंगणा सीमावर्ती भागाला बसलेला आहे. गंभीर परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झाली असून या या पुराचा फटका तेलंगणा राज्यातील चन्नुर सोमनपल्ली या गावालाही बसला होता.  नगरम येथील हनुमान मंदिरही पुराच्या पाण्याने वेढले आहे.

  • 14 Jul 2022 03:13 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत वाढ

    कोल्हापूर – गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत आता झपाट्याने वाढ होतेय. कोल्हापुरातील प्रयाग संगम या ठिकाणी कुंभी,कासारी, भोगावती या नद्यांचा संगम होऊन पुढे पंचगंगा नदी प्रवाहित होते. या संगमाच्या ठिकाणी सध्या पाण्याचं विस्तीर्ण रूप पाहायला मिळतय. संगमावर असलेलं दत्त मंदिरदेखील आता पूर्णपणे पाण्याखाली गेलं असून मुख्य पुलाबरोबर पाण्याचा प्रवाह सुरू आहे.  प्रयाग संगमाच्या ठिकाणी वाढत असलेल्या पाण्याची पाहणी आज एनडीआरएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली.

  • 14 Jul 2022 03:09 PM (IST)

    तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता

    पालघर – तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे. तेव्हा 2 ते 3 दरवाजे उघडे करून 93.78 क्युसेक्स पर्यंत विसर्ग होउ शकतो.  त्यामुळे तानसा नदीकाठच्या 33 गावांना इशारा देण्यात आला आहे

  • 14 Jul 2022 03:07 PM (IST)

    चंद्रपूर-  पुरात अडकलेल्या २२ ट्रक ड्रायव्हरांचा वाचला जीव

    चंद्रपूर-  पुरात अडकलेल्या २२ ट्रक ड्रायव्हरना वाचवण्यात आले आहे.  घुग्गुस-भोयेगाव मार्गावर आज पहाटे करण्यात रेस्क्यू करण्यात आले आहे. भोयेगाव पुलावर पाणी असल्यामुळे या ठिकाणी ट्रक थांबले होते. मात्र काल रात्री अचानक वर्धा नदीचे पाणी वाढल्याने थांबलेल्या ट्रकच्या मागच्या बाजूने देखील पुराचा वेढा पडला होता.  पोलीस विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीमने सर्व ट्रकचालकांना बोटीच्या मदतीने काढले बाहेर

  • 14 Jul 2022 02:48 PM (IST)

    पुणे – भोर तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, भातशेती गेली वाहून

    पुणे- जिल्ह्यातील भोर तालुक्यात पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. भातशेती पाण्यात वाहून गेली आहे.  भाताच्या खाचरातील मातीही  वाहून गेली आहे. शेकडो हेक्टरवर भात शेतीचं नुकसान झालं आहे.

  • 14 Jul 2022 02:27 PM (IST)

    विदर्भात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

    विदर्भातील बहुतांश भागात उद्या येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.  गडचिरोलीत ॲारेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  यंत्रणेला सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  हवामान विभागाने नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलाय, तर गडचीरोली जिल्ह्यात ॲारेंज अलर्ट आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत विदर्भातील बहुतांश  भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागपूर हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. त्यानंतर पुढील पाच दिवस विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज आहे.

  • 14 Jul 2022 02:16 PM (IST)

    नांदेड- पूरग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ 50 हजारांची मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी

    नांदेडमध्ये गेल्या सहा दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेय. नदी नाल्याना आलेल्या पुरामुळे शेत जमिनीचे प्रचंड असे नुकसान झालेय. आज सकाळ पासून पाऊस ओसरला असला तरी पुराचे पाणी अद्यापही शेतात साचूनच आहे. आता शेतात पंचनामा करायला काहीच शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे नांदेडमध्ये शेतकऱ्यांना तत्काळ पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

  • 14 Jul 2022 02:14 PM (IST)

    वसईच्या तानसा नदीला पूर, अनेक घरांत पाणी, काही गावांचा संपर्क तुटला

    विरार :- वसईच्या तानसा नदीला पूर आला आहे. नदीचे पात्र दुतर्फा भरून वाहत असून आजूबाजूच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीच्या आजुबाजुला एक किलोमीटरपर्यंत पाणीच पाणी झाले असून, अनेक घरांतही पाणी गेले आहे.भाताने, नवसई , मेढा , चिमणे , खनिवाडे, हेदवडे , काशीद कोपर, आडाने , पारोळ, आंबोडे , शिरवली , घाटघर थाळ्याचा पाडा , जांभूळ पाडा या गावांचा संपर्क तुटला आहे.  जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत 15 ते 20 किलोमीटर चा वळसा घालून गावांना संपर्क करावा लागत आहे.

  • 14 Jul 2022 02:11 PM (IST)

    हिंगोली जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची रिप -रिप सुरू असल्याने नदी नाले ओसंडून वाहत असल्याने हजारो हेक्टर वरील शेतातील कोवळी पिके पाण्याखाली गेली असल्याने शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झाले आहेत , घरांचीही पडझड झालेली आहे.  शहरातून ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूले वाहून गेल्याने अनेक गावांचा शहराशी संपर्क होत नाहीये.

  • 14 Jul 2022 02:07 PM (IST)

    रत्नागिरी-मुंबई मार्गावरील परशुराम घाट 10 दिवसांनी सुरु

    रत्नागिरी- मुंबई-गोवा मार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.  10 दिवसानंतर परशुराम घाट सुरू झालाय.  दरडी कोसळत असल्याने अवजड वाहतुकीसाठी घाट बंद केला होता.
  • 14 Jul 2022 02:05 PM (IST)

    जळगाव- गिरणा धरण 80 टक्के भरले, कधीही धरणातून विसर्ग सुरु होणार

    जळगाव – संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा सिंचनाचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्या धरणावर अवलंबून आहे ते गिरणा धरण 80 टक्के भरले असून कुठल्याही क्षणी गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली आहे.

  • 14 Jul 2022 02:03 PM (IST)

    अमरावतीत गांधी चौकात इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

    अमरावती: अमरावती जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरांची पडझळ होत आहेत. अशातच अमरावतीमध्येही एक इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही. अमरावतीच्या गांधी चौक ते राजापेठ चौक रस्त्यादरम्यान असलेल्या कन्हैया दूध डेरी व एक इलेक्ट्रॉनिक दुकान असलेली दोन मजली इमारत दुपारी एक वाजता च्या सुमारास इमारत अचानक कोसळली. इमारत कोसळणार याची शक्यता वाटल्याने  व्यावसायिक दुकानाबाहेर पडले होते त्यानंतर दहा मिनिटातच इमारत पत्त्यासारखी कोसळली. कोसळलेली इमारत ही 35-40 वर्ष जुनी असल्याची माहिती मिळाली आहे. इमारत कोसळतात पोलीस प्रशासन व महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले असून, सध्या जेसीबीद्वारे रस्त्यावरील मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.

  • 14 Jul 2022 01:48 PM (IST)

    nashik rain update : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट

    नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे सायखेडा येथील नदीकाठचे स्थलांतरित नागरी घराकडे येण्यास सुरुवात झाले आहे मात्र चिखल आणि घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई उद्भवण्याच्या भीतीमुळे चिंताग्रस्त झाले

  • 14 Jul 2022 01:47 PM (IST)

    maharashtra rain live update : दक्षिण गडचिरोली असलेल्या सिरोंचा अहेरी एटापल्ली भामरागड मुलचेरा या पाच तालुक्यात पच्चवीस आरोग्य पथके तैनात

    गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त असलेल्या 129 गावांमधून 187 गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास जिल्हा आरोग्य यंत्रणेने बोलावली तात्काळ बैठक

    जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातून 17 गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवले त्यातून एक गर्भवती महिलेची प्रसूती पण झाली बाळ माता सुरक्षित आहेत

    सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली सोमनुर या गावातून तीन गर्भवती महिलांना जीवाची बाजी लावून काल सुरक्षित ठिकाणी प्रशासनाने हलविले

    दक्षिण गडचिरोली असलेल्या सिरोंचा अहेरी एटापल्ली भामरागड मुलचेरा या पाच तालुक्यात पच्चवीस आरोग्य पथके तैनात

    आरोग्य विभागाची तात्काळ बैठक सुरू असताना आढावा घेतला आमचा प्रतिनिधी मोहम्मद इरफान यांनी

  • 14 Jul 2022 01:45 PM (IST)

    Kokan rain live update : कोकणात भातशेतीसह इतर शेती उत्पादनांच्या कामांना सुरुवात

    कोकणात भातशेतीसह इतर शेती उत्पादनांच्या कामांना सुरुवात होते. गावोगावच्या शेतात शेतकरी कधी एकटा तर कधी सहकुटुंब, शेजारपाजा-यांसह राबताना दिसतो. या भूमिपुत्रांसोबत अनेकदा नेहमीच्या वापरातील कपडय़ांसहित चिखलात बिनधास्त वावरणारे युवक-युवतीही दृष्टीस पडतात. साहजिकच पाहणा-यांची नजर वळते आणि ज्यांना हे माहीतच नसते, त्यांना कुतूहल निर्माण होते.

  • 14 Jul 2022 01:43 PM (IST)

    maharashtra rain live update : दहा जणांची एनडीआरएफने केली सुटका

  • 14 Jul 2022 01:31 PM (IST)

    Maharashtra rain live update : कुकडी प्रकल्पांतर्ग असलेल्या पाच धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात मागील 24 तासात मोठी वाढ

    कुकडी प्रकल्पांतर्ग असलेल्या पाच धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात मागील 24 तासात मोठी वाढ झाली आहे. प्रकल्पांतर्गत  असलेल्या वडज धरण लाभक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने  मीना नदीला पूर आलाय. वडज धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग मीना नदीपत्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या नारायणगाव, खोडद आदि गावच्या लोकवस्तीला धोक्याचा इशारा देण्यात आलाय. धरणात सुमारे 50 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.त्यामुळे काळजी घेण्याचं प्रशासनाने आवाहन केलं आहे.

  • 14 Jul 2022 01:09 PM (IST)

    Pune rain live update : सिंहगडावर दरड कोसळल्याची घटना

    सिंहगडावर दरड कोसळल्याची घटना
    आज सकाळी घाट रस्त्यावर एका वळणावर कोसळली दरड
    सिंहगड किल्ल्यावरील 28 कॉर्नर म्हणजेच जगताप माचीच्या वरील भागातील दरड आज सकाळी कोसळली
    सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कुठलीही वाहतूक सुरु नव्हती
    कुठलीही हानी नाही
    अतिवृषटीमुळे सिंहगड किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे
  • 14 Jul 2022 01:08 PM (IST)

    Kolhapur Vishalgad Live Update : कोल्हापुरातील विशाळगडाचा दगडी बुरुज ढासळला

    कोल्हापुरातील विशाळगडाचा दगडी बुरुज ढासळला

    लोखंडी जिन्याच्या बाजूच्या बुरुजाचा काही भाग कोसळला

    बुरुज ढासळल्याने लोखंडी जिना वाहतुकीसाठी बंद

  • 14 Jul 2022 12:58 PM (IST)

    maharashtra rain live update : पावसामुळे कल्याण एपीएमसी मार्केट मध्ये भाज्यांची आवक घटली

    नगर पुणे नाशिक जिल्ह्यात अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला आहे .त्यामुळे शेतीचे नुकसान झालंय याचा परिणाम कल्याण एपीएमसी मार्केट मध्ये पाहायला मिळत आहे, पाले भाज्या व फळभाज्यांची आवक घटली आहे .कल्याण एपीएमसी मार्केट मध्ये दरदिवस २५० ते ३०० गाड्यांची आवक होते. मात्र पावसामुळे १५० गाड्यांची आवक होतेय .आवक घटल्याने भाज्यांचे भाव कडाडले असून दुप्पटीने वाढले आहेत पुणे, नाशिक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातून देखील भाज्याची आवक होते गुजरात मध्ये देखील काही जिल्ह्यात पूर परिस्थिती आहे याचा परिणाम कल्याण च्या कृषी उत्पन्न बाजार समिती ला बसला आहे .त्यामुळे काही दिवस तरी नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
  • 14 Jul 2022 12:52 PM (IST)

    Gujrat rain live update : मुंबई अहमदाबाद महामार्गावर ओलीपोर वलसाड येथे वाहतूक करण्यात आली बंद

    1. मुंबई अहमदाबाद महामार्गावर ओलीपोर वलसाड येथे वाहतूक करण्यात आली बंद ,
    2. मुसळधार पावसाने पूर्णा नदीचे राष्ट्रीय महामार्ग आल्याने महामार्ग बंद करण्यात येत असल्याचे नवसारी जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश
    3. मुंबई अहमदाबाद वरील गुजरात आणि मुंबई कडे येणारी वाहतूक पूर्णतः विस्कळीत, वाहनाचा वलासाड येथे लागल्या वाहनाचा रांगा .
  • 14 Jul 2022 12:49 PM (IST)

    Chandrapur Rain Live Update : चंद्रपूर तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन बाप शिरला पुराच्या पाण्यात

    1. चंद्रपूर तापानं फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन बाप शिरला पुरात..
    2. मुलगा तापाने फणफणत होता.गावात आरोग्य सूविधा नाही.नदी,नाल्यांना पुर.मात्र बाप तो बापच.मुलाला खांद्यावर घेत बापाने पुरात पाय ठेवला.
    3. पुराततून पायी मार्ग काढीत मुलावर उपचार करण्यासाठी दुसऱ्या गावाला घेऊन गेला.या जिगरबाज बापाचे नाव आहे, श्यामराव पत्रूजी गिनघरे.तो गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावातील रहीवासी आहे.
  • 14 Jul 2022 12:47 PM (IST)

    Mahabaleshwar Rain Live Update : महाबळेश्वर तालुक्यात गेल्या  दिवसापासुन पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले

    महाबळेश्वर तालुक्यात गेल्या  दिवसापासुन पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे..मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटाचे प्रचंड नुकसान झाले होते.. याच पाश्वभुमीवर सतर्कतेचा बाब म्हणुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोजांरी यांनी आंबेनळी घाट दुरुस्तीसाठी आज सकाळी 11 ते 5 यावेळेत बंद ठेवला आहे

  • 14 Jul 2022 12:44 PM (IST)

    Pune Rain Live Update : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणारं नीरा नदीवरील नेकलेस पॉईंटचं विहंगम दृश्य

    पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणारं नीरा नदीवरील नेकलेस पॉईंटचं विहंगम दृश्य

    पडणाऱ्या पावसानं नदीला आलं पाणी

    भोर तालुक्यात पडलेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान

    नेकलेस पॉईंटचं हे विहंगम दृश्य पाहा आकाशातून !

    टीव्ही 9मराठीनं ड्रोन मधून घेतला आढावा !

  • 14 Jul 2022 11:45 AM (IST)

    vasai virar rain live update : वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला

    वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला. सखल भागात पाणी साचनण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजा नुसार पालघर जिल्ह्याला आज दिवसभर रेड अलर्ट जाहीर केला आहे. आज वसई विरार शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कॉलेज ला सुट्टी जाहीर केली आहे.

    दिवसभरात पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आज ११ वाजताची वसई पंचवटी नाक्यावरील ही दृश्य आहेत

  • 14 Jul 2022 11:44 AM (IST)

    Pune Rain Live Update : दत्त मंदिरासमोरील वाड्याची भिंत शेजारच्या घरावर कोसळली

    – शहरातील कोंढवा बुद्रुक गावठाण येथील दत्त मंदिरासमोरील वाड्याची भिंत शेजारच्या घरावर कोसळली. अग्निशमन दलाने तात्काळ प्रतिसाद देत वाड्याशेजारील तीन घरातून ११ रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  • 14 Jul 2022 11:43 AM (IST)

    Aurangabad Rain Live Update : औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील सीतान आणि धबधबा प्रवाहित

    औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील सीतान आणि धबधबा प्रवाहित झाला आहे औरंगाबाद जिल्ह्यात जोरात पाऊस झाल्यामुळे या धबधब्याला पाणी आलेला आहे त्यामुळे वेरूळ लेणीच्या सौंदर्यात भर पडली आहे तब्बल 200 फूट उंचावरून सीता नानीचा धबधबा सध्या कोसळू लागला आहे त्यामुळे पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षण बनला आहे

  • 14 Jul 2022 11:18 AM (IST)

    Palghat Rain Live Update : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात  मुसळधार पाऊस

    पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात  मुसळधार पाऊस सुरूच आहे त्यामुळे  मोडकसागर धरणातून  224.03 cumecs पाण्याचा विसर्ग होत मुंबई महानगरपालिका यांनी या अगोदरच पालघर व ठाणे जिल्ह्यातील नदीकाठच्या 42 गावांना इशारा दिला आहे

  • 14 Jul 2022 11:13 AM (IST)

    Navi Mumbai Rain Live Update : नवी मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात

    नवी मुंबईत सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता बरसायला सुरुवात केली आहे

    जुईनगर, बेलापूर, वाशी या ठिकाणी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे

  • 14 Jul 2022 10:29 AM (IST)

    Koyana River Update : कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ, कराडच्या प्रिती संगमावर नदीची पाणी पातळी वाढली

    कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ

    कराडच्या प्रितीसंगमावर नदीची पाणी पातळी वाढली

    धरणातुन सोडलेले पाणी व पडत असलेला पाउस यामुळे पाणी पातळीत वाठ

  • 14 Jul 2022 10:20 AM (IST)

    Khadakwasla Dam : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातला पाऊस झाला कमी

    मध्यरात्रीनंतर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातला पावसाचा काहीसा कमी झाल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय….सकाळी सहा वाजल्यापासून धरणातून 10 हजार 246 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय… त्यामुळं भिडे पुलावरचे पाणी ओसरले आहे….. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंदच ठेवण्यात आलाय

  • 14 Jul 2022 09:52 AM (IST)

    Vasai Rain Update : वसई विरार मध्ये जोरदार पाऊस सुरू

    विरार:- वसई विरार मध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे..

    सकाळी 9.30 पासून पावसाला सुरवात झाली असून, वाऱ्या सह जोरदार पाऊस पडत आहे..

    आज दिवसभर पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे..

    आभाळ पूर्णपणे भरलेले असून दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे..

  • 14 Jul 2022 09:51 AM (IST)

    Nashik Rain Update : नाशिक शहराला जोडणारा रामसेतू पूल ‘रामभरोसे’

    नाशिक – शहराला जोडणारा रामसेतू पूल ‘रामभरोसे’

    रामसेतू पुलावर पुराच्या पाण्यामुळे मोठे खड्डे

    तीन वर्षांपासून पुलाची ना दुरुस्ती, ना डागडुजी

    धोकादायक रामसेतू पुलावरून नागरिकांची ये – जा सुरूच

    पूल कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती..

    रामसेतू पुलाच्या तात्काळ दुरुस्तीची रहिवाशांची मागणी

  • 14 Jul 2022 09:50 AM (IST)

    Amravati Rain Update : अमरावतीच्या अप्पर वर्धा धरनाचे 7 दरवाजे उघडताच धरणावर पर्यटक येण्यास सुरवात

    अमरावतीच्या अप्पर वर्धा धरनाचे 7 दरवाजे उघडताच धरणावर पर्यटक येण्यास सुरवात…

    अमरावती: मागील चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे नदी नाल्यांनाही पूर आला आहे .सोबतच अप्पर वर्धा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने धरण 75 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे 13 पैकी सात दरवाजे उघडले आहे. दरम्यान दरवाजे उघडल्याची माहिती मिळतात पर्यटकांची पावले आता अपर वर्धा धरणाकडे वळू लागले आहे..

  • 14 Jul 2022 09:34 AM (IST)

    kokan rain update : अणुस्कूरा घाटात कोसळलेली दरड केली बाजूला

    अणुस्कूरा घाटात कोसळलेली दरड केली बाजूला

    अणुस्कूरा घाटातील वाहतूक पुन्हा सुरू

    बांधकाम विभागाच्या प्रयत्नानंतर पडलेली दरड केली बाजूला

    राजापूर मार्गे कोल्हापूरला जोडणारा हा घाट

    मुसळधार पावसाचा परिणाम कोकणातील घाट रस्त्याला देखील

  • 14 Jul 2022 08:54 AM (IST)

    Palghar Rain Update : पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल

    पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल दिनांक 14/07/2022 (8 am to 8pm) 1)वसई:- 80मी मी 2)जव्हार:- 237.66मी मी 3) विक्रमगड:- 296.50मी मी 4) मोखाडा:- 154.50मी मी 5) वाडा :- 267.75मी मी 6)डहाणू :- 232.66मी मी 7) पालघर:- 220मी मी 8) तलासरी :- 290.15मी मी एकूण पाऊस :- 1779.22मी मी एकुण सरासरी :- 222.40 मी मी

  • 14 Jul 2022 08:47 AM (IST)

    Mumbai Rain Update : मुंबईतल्या पावसाची अपडेट एका क्लिकवर

  • 14 Jul 2022 08:43 AM (IST)

    Khadakwasla Dam Rain Update : खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती, धरणात परिसरात 54 मिमी पावसाची नोंद

    खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती

    खडकवासला धरणातून नदी पात्रता करण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग केला कमी

    सध्या धरणातून 4 हजार 807 पाण्याचा विसर्ग सुरु

    खडकवासला धरणात 54 मिमी पावसाची नोंद

  • 14 Jul 2022 08:39 AM (IST)

    Gadciroli Rain Update : गडचिरोली जिल्ह्यातील सोमनुर व सोमनपल्ली या दोन गावात तीन गर्भवती महिला पुरात अडकलेल्या होत्या

    1. गडचिरोली जिल्ह्यातील सोमनुर व सोमनपल्ली या दोन गावात तीन गर्भवती महिला पुरात अडकलेल्या होत्या
    2. सिरोंचा येथील तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांनी Sdrf यांच्या साहाय्याने या तीन गर्भवती महिलांना पुरातून  सुरक्षित बाहेर काढले
    3. इंद्रावती नदीला पूर आल्याने महाराष्ट्रातील टोका वरती भाग सोमनपल्ली सोमनुर या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती
  • 14 Jul 2022 08:28 AM (IST)

    Maval Rain Update : मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 50.97 टक्के पाणीसाठा

    मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 50.97% टक्के पाणीसाठा

    -गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली

    -24 तासात धरण परीक्षेत्रात 144 मिलिमीटर पाऊस पडलाय त्यामुळे तब्बल अवघ्या 12 तासात 7.30% टक्के इतका पाणीसाठ्यात वाढ झाली, यामुळं पाणी कपातीच संकट दूर झालं

    -असाच मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास जुलै च्या शेवटच्या आठवड्यात धरण ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.

  • 14 Jul 2022 08:21 AM (IST)

    Chadrapur Rain Update : चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात शिरले इरई नदीचे पाणी

    चंद्रपूर : चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात शिरले इरई नदीचे पाणी…

    रहमत नगर, राजनगर आणि सहारा पार्क या भागातल्या अनेक घरांमध्ये इरई नदीच्या पाण्याचा शिरकाव,

    महानगरपालिकेच्या पथकाने रहमतनगर परिसरातून 15 ते 20 लोकांना हलविले सुरक्षित स्थळी,

    इरई धरणाचे सर्व म्हणजे 7 दरवाजे अजूनही 1 मीटरने सुरू असल्याने नदीच्या पाणी पातळीत होत आहे सातत्याने वाढ

  • 14 Jul 2022 08:20 AM (IST)

    Koyana Dam Update : कोयना धरणात 43.18 tmc पाणीसाठा झाला

    कोयना धरणात 43.18 tmc पाणीसाठा झाला

    धरणात 55182 कयुसेक पाणी आवक सुरु

    कोयना नदीपात्रात 1050 कयुसेक पाणी विसर्ग

    धरण पाणलोट क्षेत्रात कोयनानगर 112 मिलिमीटर नवजा 121 मिलीमिटर महाबलेश्वर 270 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली

  • 14 Jul 2022 08:19 AM (IST)

    Vidharbh Rain Update : विदर्भात पावसाची विक्रमी हजेरी

    विदर्भात पावसाची विक्रमी हजेरी

    आठवडाभरात जून -जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा दीडपट अधिक पावसाची नोंद

    अजूनही पावसाचा इशारा असल्याने परिस्थिती आणखी वाईट होणार का ?.

    विदर्भात 13 जुलै पर्यंत सरासरी 299 मिमी पावसाची नोंद होते मात्र यावेळी तब्बल 405 मिमी पावसाची झाली नोंद

  • 14 Jul 2022 07:43 AM (IST)

    Washin Rain Update : वाशिम जिल्ह्यात सर्वत्र रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरूच

    वाशिम जिल्ह्यात सर्वत्र रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरूच….

    जिल्ह्यातील सर्वात मोठे मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी…

    सोनल प्रकल्प – 448.90 मीटर

    एकबुर्जी प्रकल्प -144.50 मीटर

    अडाण प्रकल्प – 376.85 मीटर

    जलसाठा द.ल.घ.मी.मध्ये

    सोनल प्रकल्प – 7.25

    एकबुर्जी प्रकल्प – 0.95

    अडाण प्रकल्प – 21.17

  • 14 Jul 2022 07:38 AM (IST)

    Gadchiroli Rain Update : गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद पडलेले आहे

    गडचिरोली- महाराष्ट्राचा टोकावर गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 85 दरवाजे सुरू असून राज्यातून सर्वात जास्त विसर्ग या धरणातून सध्या होत आहे

    १९ लाख ६६ हजार ०९० क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणातुन होत आहे

    राज्यात सर्वात जास्त विसर्ग होणारा धरण

    या मेड्डीगट्टा लक्ष्मी धरणांमुळे गोदावरी प्राणहिता नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली

    गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद पडलेले आहे

    काल सिरोंचा तालुक्यातील अकरा गावांना रेड अलर्ट करण्यात आला होता तिथून पहाटे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

    जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आव्हान केला आहे की सुरक्षित ठिकाणी रहावे पूरपरिस्थिती निर्माण असलेल्या रस्त्यावरून प्रवास करू नये

    गडचिरोली जिल्ह्यात पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आसावा दिवसभर पाऊस रिमझिम असला तरी पूर परिस्थिती कायमच

    Wkt& जिल्हाधिकारी आवाहन केलेले बाईट विजलव मेडीगट्टा धरणाचे

  • 14 Jul 2022 07:35 AM (IST)

    Buldhana Rain Update : बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारे धरण 55 टक्के भरले, शहराच्या आठ महिन्याच्या पाण्याची चिंता मिटली

    बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारे धरण 55 टक्के भरले, शहराच्या आठ महिन्याच्या पाण्याची चिंता मिटली…
    गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बुलडाणा शहर आणि 13 खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पानी पातळीत वाढ होऊन  येळगाव धरण 55% भरलेय … त्यामुळे बुलढाणेकर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय..  धरणं 55% भरल्याने  आता पाण्याची आठ महिन्यांची चिंताही मिटली आहे… तर पाऊस अजूनही सुरूच असून येत्या काही दिवसात धरणात आणखी पानी पातळी वाढण्याची शक्यता आहे ..  तसेच नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे , की पाण्याचा अपव्यय टाळावा,  नळाचे  कॉक बंद करून ठेवावे,  जेणेकरून दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही..  धरणांमध्ये सध्याच्या घडीला 55 टक्के पाणीसाठा आहे.
  • 14 Jul 2022 07:33 AM (IST)

    Mahableshwar Rain Update : अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटाचे प्रचंड नुकसान झाले

    महाबळेश्वर तालुक्यात गेल्या 4 दिवसापासुन पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे..मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटाचे प्रचंड नुकसान झाले होते.. याच पाश्वभुमीवर सतर्कतेचा बाब म्हणुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोजांरी यांनी आंबेनळी घाट दुरुस्तीसाठी आज सकाळी 11 ते 5 यावेळेत बंद करण्याचे पत्र महाबळेश्वर तहसिलदार यांना दिले असल्याची माहीती उप अभियंता महेश गोजांरी यांनी दिलीये .

  • 14 Jul 2022 07:32 AM (IST)

    Bhandara Rain update : नरसिह मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त गेल्याने तेथेच अड़कुन पडलेल्या 15  भाविकाना अखेर 19 तासांचा अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढले

    भंडारा जिल्हातिल मोहाडी तालुक्यातिल माडगी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात असलेले नरसिह मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त गेल्याने तेथेच अड़कुन पडलेल्या 15  भाविकाना अखेर 19 तासांचा अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे।यात 7 स्त्रिया व 8 पुरुषाचा समावेश आहे।विशेष म्हणजे राज्य आपत्ति दलामार्फत रेस्क्यू दला मार्फत काल पासून रेस्क्यू करण्याचे काम सुरु होते।मात्र पाण्याचा प्रवाह अधिक जास्त असल्याने त्यांना बाहेर काढ़ने धोक्याचे ओळखून आज अखेर सकाळी त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आहे।

  • 14 Jul 2022 07:30 AM (IST)

    Vaitarana River Update : वैतरणा नदीच्या पाण्यात अडकलेल्या बार्ज मधील तेरा कामगारा पैकी 6 कामगारांना सुखरूप बाहेर काढले

    पालघर मधील वैतरणा नदीच्या पाण्यात अडकलेल्या बार्ज मधील तेरा कामगारा पैकी 6 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात NDRF च्या टीम ला आले यश आहे. 13 पैकी 6 जणांना NDRF टीम ने बोटी च्या साह्याने बाहेर काढले आहे. इतर साथजणांना बाहेर काढण्याचा बचाव कार्य सुरू आहे.

  • 14 Jul 2022 07:28 AM (IST)

    Nashik Rain Update : धरण पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस सुरूच असल्याने पाण्याची पातळी वाढली

    नाशिक – जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच..

    धरण पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस सुरूच असल्याने पाण्याची पातळी वाढली

    गंगापूर धरणातून आज देखील पाण्याचा विसर्ग सुरुच राहणार

    गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे ड्रोन च्या माध्यमातून घेतलेले हे exclusive दृश्य फक्त TV9 च्या दर्शकांसाठी (सौजन्य म्हेह बडाख)

  • 14 Jul 2022 07:27 AM (IST)

    Pachaganga River Update : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम, नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

    कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची उसंत

    पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ मात्र कायम

    नदीची पाणी पातळी पोहोचली 36 फूट दहा इंचावर

    जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली

    पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्यासाठी अवघे दोन फूट बाकी

    नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

  • 14 Jul 2022 07:24 AM (IST)

    Nagpur Rain Update : अवैध माती उत्खनन केल्याने पावसात शेजारच्या शेतकऱ्यांची जमिन खचलीय

    – नागपूर जिल्ह्यांच्या कामठी तालुक्यातील आडका गावात अवैध माती उत्खनन

    – रेल्वे कंत्राटदाराने केलेल्या अवैध माती उत्खननाचा शेतकऱ्यांना फटका

    – नागपूर – नागभीड रेल्वे ब्रॅाडगेज कामासाठी केलं मातीचं अवैध उत्खनन

    – अवैध माती उत्खनन करुन केले १५ ते २० फुटाचा खड्डा

    – अवैध माती उत्खनन केल्याने पावसात शेजारच्या शेतकऱ्यांची जमिन खचलीय

    – शेजारच्या शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान

    – महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका

    – कामठी तहसीलदार कारवाई का करत नाही? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

  • 14 Jul 2022 07:24 AM (IST)

    Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सात तालुके टॅंकरमुक्त

    पुणे जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सात तालुके टॅंकरमुक्त

    दौंड, इंदापूर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे आणि हवेली हे तालुके टँकर मुक्त

    शिवाय जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या एकूण टॅंकरची संख्या पूर्वीपेक्षा निम्म्याहून कमी झाली

    मात्र भर पावसाळ्यातही जिल्ह्यातील शिरूर तालुका अद्यापही तहानलेलाच

    या तालुक्यात सर्वाधिक 15 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

    सद्यःस्थितीत जिल्ह्यातील 22 गावे आणि 192 वाड्यांना 29 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु

  • 14 Jul 2022 07:23 AM (IST)

    Dhule Rain Update : धुळे शहरात रात्रभर भर पावसाची रिप रिप सुरु

    धुळे शहरात रात्रभर भर पावसाची रिप रिप सुरु…सकाळ पासून वातावर कोरडे…पाऊस नसल्याने शेती च्या कामना वेग..

  • 14 Jul 2022 06:58 AM (IST)

    पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 7 दरवाजे 45 सेमी ने उघडले

    पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 7 दरवाजे 45 सेमी ने उघडले….

    धरणाच्या 7 दरवाज्यातुन वर्धा नदीपात्रात 500 क्युमेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे…

    अप्पर वर्धा धरण 75 टक्के भरले;धरण क्षेत्रात रात्रीपासून सुरू आहे पावसाची दमदार बॅटिंग….

    अमरावती, वर्धा,यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा…

  • 14 Jul 2022 06:46 AM (IST)

    Ratnagiri Rain Update : डोंगराला मोठ्या भेगा गेल्यामुळे गावकरी चिंतेत

    चिपळूण मधील कळकवणे मध्ये एनडवाडीतल्या वस्तीच्या मागील डोंगराला पडल्या 4 फुटापर्यंत भेगा पडल्या आहेत

    कळकवणे मधील ग्रामस्थ धास्तावले आहेत  भाषयभीत झाले आहेत

    एनडवाडीतल्या ग्रामस्थांचे प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे

    डोंगराला मोठ्या भेगा गेल्यामुळे गावकरी चिंतेत होते

  • 14 Jul 2022 06:45 AM (IST)

    Solapur Rain Update : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरुच

    – सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरुच

    – मागील तीन दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा

    – तर संततधार पावसामुळे शहरी भागातील छोट्या व्यवसायिक, कामगारांच्या रोजगाराला ब्रेक

    – संततधार पावसामुळे शहरातील नागरिक हैराण

    – सोलापूर जिल्ह्यात कोणतीही जिवीत किंवा वित्त हानी नाही.

  • 14 Jul 2022 06:39 AM (IST)

    Nanded Rain Update : नांदेडमध्ये सर्वदूर संततधार पाऊस

    नांदेड: काल सांयकाळी थोडीशी विश्रांती घेतलेला पाऊस मध्यरात्रीपासून पुन्हा सक्रिय, मध्यरात्रीपासून नांदेडमध्ये सर्वदूर संततधार पाऊस, पावसाच्या थैमानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची दैना, अजूनही अनेक गावांचा संपर्क तुटलेलाच, असंख्य रस्ते पाण्याखाली तर अनेक गावांना पुराचा विळखा कायम.

  • 14 Jul 2022 06:36 AM (IST)

    Latur Rain Update : उदगीर शहराला पाणी पुरवठा करण्यात येणारा बनशेळकी तलाव ओव्हरफ्लो

    लातुर–उदगीर शहराला पाणी पुरवठा करण्यात येणारा बनशेळकी तलाव ओव्हरफ्लो, प्रशासनाने केली पाहणी.

  • 14 Jul 2022 06:35 AM (IST)

    Khadakwasla Dam Rain Update : खडकवासला धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला आहे

    खडकवासला धरण धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 13138 क्युसेक विसर्ग कमी करून ठीक स. 6.00 वा. 4708 क्युसेक करण्यात येत आहे.

    तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी…

  • 13 Jul 2022 11:03 PM (IST)

    हातनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले

    हातनूर धरणातून 125156 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. हातनूरचे असलेले पूर्ण 41 दरवाजे यावर्षी पहिल्यांदा उघडले आहेत. तापी नदी मध्यप्रदेशातून तर पूर्णा नदी विदर्भातून येत असल्याने हातनूर धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे.

  • 13 Jul 2022 10:51 PM (IST)

    Mumbai Rain : वसई दरड दुर्घटना: मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 6 लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    मुंबई : वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी 2 लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी 6 लाख मदत केली जाईल. याशिवाय जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 10:46 PM (IST)

    Rain Update : धरणाचे आणखी दरवाजे उघडणार

    ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊसाला सुरुवात झालेली आहे. पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे आज रात्री 11 वाजता धरणाचे 5 दरवाजे 20 सेमीने उघडण्यात येणार असून 160 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येणार आहे .

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 10:38 PM (IST)

    गडचिरोलीतील शाळाही तीन दिवस बंद राहणार

    गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती पाहता 16 तारखेपर्यंत शाळा, महाविद्यालय सर्व बंद राहतील. असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. पहिले 11 तारखे पासून 13 जुलैपर्यंत शाळा बंद  ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता या तीन दिवसाची वाढ जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसाच्या फटका बसल्याने अनेक नद्या व नाले पूर परिस्थितीत आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 10:30 PM (IST)

    उदगीर ते लातूर वाहतूक शिरूर-अनंतपाळ मार्गे वळवली

    उदगीर ते लातूर वाहतूक शिरूर-अनंतपाळ मार्गे वळवली आहे, नळेगाव जवळच्या चामरगा-पाटीजवळ रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने उदगीर-लातूर मार्गावरची वाहतूक झाली ठप्प झाली, रस्त्याचे काम सुरू असल्याने पुलाचे करण्यात आले आहे. खोदकामात ओढ्याचे पाणी घुसल्याने वाहतुकीचा खोळंबा झालाय.. लातूरहून उदगीरकडे जाणाऱ्या वाहनांनी आणि उदगीरहून लातूरकडे येणाऱ्या वाहनांनी पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन करण्यात आलंय.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 10:24 PM (IST)

    Mumbai Rain Update : ठाण्यातील शाळाही उद्या बंद राहणार

    ठाणे जिल्ह्यातील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील इयत्ता 12 वी पर्यंतच्या शाळांना दि. 14 आणि 15 जुलै रोजी अशी दोन दिवसांची सुट्टी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी जाहीर केली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 09:55 PM (IST)

    Yavatmal Rain : शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो

    यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारे निळोणा धरण ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळे यवतमाळकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे, सलग मुसळधार पावसामुळे निळोणा धरण ओव्हरफ्लो झालं आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 09:53 PM (IST)

    Gondia Rain : 4 मुलं नाल्याच्या प्रवाहात बेपत्ता

    -गोंदिया शहरातीलल 4 मुलं नाल्याच्या प्रवाहात बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चार मुलांचा सध्या शोध सुरू आहे. आता जिल्हा प्रसाशनाच्यावतीने सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 09:17 PM (IST)

    Rain Update : पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज-मुख्यमंत्री

    पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क व समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिलेत. राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क व सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. स्थलांतरितांना भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासह धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुख्यमंत्री कार्यालयाचं ट्विट

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 09:04 PM (IST)

    Pune Rain : पुलावरून जात असताना वाहून गेलेली व्यक्ती सुखरूप

    जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथील पुलावरून जात असताना वाहून गेलेली व्यक्ती सुखरूप वाचली आहे. एकनाथ बबन रेंगडे असे या घटनेत बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने व्यक्तिला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.  पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 08:51 PM (IST)

    Rain Update : नवापूर शहरासह तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरवात

    शहरातल्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच रंगावलीसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ईस्लामपूर भागात एका घरात पाणी शिरले आहे. तसेच कॉलन्यामधील रस्ते देखील जलमय झाले आहेत.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 08:44 PM (IST)

    Rain Update : गोसेखुर्द धरणातून मध्यरात्री 12 हजार क्यूसेक्स जलविसर्ग करणार

    चंद्रपूर:-गोसेखुर्द धरणातून मध्यरात्री 12 हजार क्यूसेक्स जलविसर्ग करणार, जलसंपदा विभागाने चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला माहिती ही दिली , धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस होत असल्याने विसर्ग वाढवणार आहेत., चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी-मूल- सावली- पोंभुर्णा- गोंडपिपरी या तालुक्यातून वाहणा-या नदीकाठच्या गावाना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे, चंद्रपूर शहरालगत असलेल्या इरई धरणातून सध्या महत्तम विसर्ग केला जातोय, त्यामुळे इरई-वर्धा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन चंद्रपूर शहराच्या सखल भागात पूर पूरस्थिती आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 08:07 PM (IST)

    Gadchiroli Rain Update : गडचिरोलीत पावसाचा कहर सुरू

    गडचिरोली -सोमनपल्ली येथे गर्भवती महिला पुरात अडकल्याने तिला व काही नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तहसीलदारांनी स्वतः एस.डी.आर.एफ पथकासोबत जाऊन त्यांना पुरातून बाहेर काढलं आहे. महाराष्ट्राचे शेवटच्या टोकाला छत्तीसगड सीमावर्ती भागात असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली या गावात इंद्रावती नदीच्या पाण्यानी अचानक पूर परिस्थिती निर्माण केली. सिरोंचा येथील तहसीलदार जितेंद्र शिरतोडे हे स्वतः बचाव कार्यात उतरले आहेत.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 07:37 PM (IST)

    Palghar Rain : पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना उध्या सुट्टी जाहीर

    जिखाधिकारी डॉ माणिकराव गुरसल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागानं दिनांक 14 जुलै पर्यंत पालघर जिल्हयात अति मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्शवभूमीवर जिल्हाधिकारी यांचा निर्णय 13 ते 14 जुलै पर्यंत पालघर जिल्ह्यातील तसेच वसई विरार महानगरपालिका क्षेञातील सर्व शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 07:34 PM (IST)

    Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू

    जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कलम 144 लावण्याचे आदेश दिले. गड किल्ले, पर्यटन स्थळं येथील अपघात रोखण्यासाठी पर्यटकांना प्रतिबंध असणार आहे. विशेषतः भोर वेल्हा मुळशी जुन्नर मावळ आंबेगाव या तालुक्यातील गड किल्ले, पर्यटन स्थळी बंदी असणार आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 07:31 PM (IST)

    Nagpur Rain : एकाचा शोध अजूनही सुरूच

    नागपूर जिल्ह्यातील नांदागोमुख नाल्यावरून काल स्कार्पिओ कार वाहून गेली होती

    त्यात सहा जण वाहून गेले त्यापैकी तिघांचे मृतदेह काल मिळाले होते

    आज सकाळ पासून एसडीआरफ आणि स्थानिक मच्छीमारांच्या साह्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवत आणखी दोन मृतदेह शोधून काढले

    एकाचा अजून शोध सुरू

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 07:28 PM (IST)

    Nanded Rain : 80 गावांचा संपर्क तुटलेलाच

    नांदेड : जिल्ह्यातील 80 गावांचा संपर्क तुटलेलाच आहे, सर्वाधिक 18 गावं एकट्या हिमायतनगर तालुक्यातील आहेत, आसना, पैनगंगा आणि गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ होतेय, आज रात्री सावधानता बाळगण्याचे प्रशासनाचं आवाहन आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 07:18 PM (IST)

    Mumbai Rain : मोडकसागर धरणाची दोन दारं उघडली

    पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात  मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे  मोडकसागर धरणातून  991.089 क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असून दोन दोन दारं उघडण्यात आली आहेत. मुंबई महानगरपालिकेने पालघर व ठाणे जिल्ह्यातील नदीकाठच्या 42 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 07:17 PM (IST)

    Navi Mumbai Rain : नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

    राज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाची जुलै महिना सुरु झाल्यापासून जोरदार बॅटींग सुरु आहे. मागील चार दिवसांपासून राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढत आहे. ठाणे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उद्या गुरुवार 14 जुलै 2022 रोजी सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 07:14 PM (IST)

    Rain Update : माळशेज घाटात दरड कोसळली

    संततधार पावसामुळे कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाटात सावर्णे गावाजवळ महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली असून, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून झाड बाजूला करण्याचे काम सध्या सुरू आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 06:37 PM (IST)

    Pune Rain : पुण्याला मुसळधार पावसाचा तडाखा

    पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री डोंगर परिसरात दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने थेट डोंगरावरून पायरी मार्गाने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला रौद रूप प्राप्त झाले आहे. मात्र अशातही जीव धोक्यात घालून भाविक आणि पर्यटक डोंगरावर जात आहेत. लेण्याद्री डोंगरावर पडत असलेला सर्व पाऊस याच पायरी मार्गाने जोरात खालच्या दिशेने येत असताना या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 06:21 PM (IST)

    Wardha Rain : वर्ध्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊसाला सुरुवात झालेली आहे. पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे धरणाचे 3 दरवाजे 5 सेमी ने उघडण्यात आले असून 24 क्युसेकचा विसर्ग होणार आहे . तरी सर्व यंत्रणांनी याबाबत ग्रामस्थांना अवगत करावे. ही विनंती, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

  • 13 Jul 2022 06:17 PM (IST)

    Pune Rain : 12 वीपर्यंतच्या शाळांना तीन दिवस सुट्टी जाहीर

    पुणे जिल्ह्यातील काही तालुके वगळून 12 वीपर्यंतच्या शाळांना तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आलीय. दिनांक 14 ते 16 पर्यंत ही सुट्टी जिल्हा https://www.tv9marathi.com/wp-admin/admin.php?page=stories-dashboardप्रशासनाकडून जाहीर केली आहे, यामध्ये इंदापूर, पुरंदर, बारामती, दौंड, शिरूर या तालुक्यातील शाळांना सुट्टी नसणार आहे इतर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, परिपत्रक काढून जिल्हाधिकार्यांनी हे आदेश दिले आहेत.

    हवामान खात्याचा अंदाजही पाहा

  • 13 Jul 2022 06:12 PM (IST)

    Pune Rain : जोरदार पावसानं नागरिकांच्या घरात पाणी

    पुण्यातील उत्तमनगर भागात नागरिकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी

    जोरदार पावसानं नागरिकांच्या घरात पाणी

    घरातील संसारोपयोगी साहित्य भिजलं

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 05:37 PM (IST)

    Dhule Rain : धुळ्यात दोन दिवसाच्या दांडी नंतर पाऊसाची हजेरी

    सुमारे तासाभरा पासून पावसाची संततधार सुरु आहे. साक्री तालुक्यातील मालमथा परिसरात पाऊसामुळे निसर्गाचं विहंगाम दृश्य पाहायला मिळत आहे. अक्कलपाडा धरणाची पातळी वाढली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 05:35 PM (IST)

    Kolhapur Rain : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम

    पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम आहे. आता नदीची पाणी पातळी 36 फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगा उद्या दुपारपर्यंत इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. तसेच शहर परिसरात पावसाची उघडझाप तर धरणक्षेत्रात संततधार कायम आहे.

  • 13 Jul 2022 05:24 PM (IST)

    Pune Rain : पुण्यातील खडकवासला धरणावर पुणेकरांची गर्दी

    पुण्यातील खडकवासला धरणावर पुणेकरांची गर्दी झालीय. सध्या धरणातून 13 हजार क्यूसेकनं पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे पाणी बघण्यासाठी पुणेकरांनी परिसरात जमायला सुरूवात केली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 05:22 PM (IST)

    Palghar Rain : पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे सर्व तालुक्यात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. उद्या सुद्धा पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे पालघर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी उद्या 14 जुलै सर्व माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 05:21 PM (IST)

    Satara Rain : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहातून 1050 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 105 टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या कोयना धरणात 40.63 टीएमसी पाणीसाठा सध्या आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरु आहे. धरणाचा पाणीसाठा कमी झाल्यानंतर पायथा विद्युत गृह बंद केले होते.

  • 13 Jul 2022 04:56 PM (IST)

    Kokan Rain : कोकणातही पावसाचा कहर सुरूच

    रत्नागिरी – चिपळूण शहरात  शिरले वाशीष्टी व  शिवनदीच्या पुराचे पाणी, शहरातील जुना बाजार पूल परिसरातील नाईक कंपनी परिसरात पुराचे पाणी शिरले असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 13 Jul 2022 04:54 PM (IST)

    Rain Update : वैतरणा नदीची पाणी पातळी वाढली

    भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी अकलोली येथे वैतरणा नदीची पातळी वाढली आहे. पुलावरून पाणी वाहू लागले आहे. तर गरम पाण्याचे कुंड गेले नदीपात्रात बुडून रस्त्या लगतच्या दुकानात सुध्दा शिरले पाणी.

  • 13 Jul 2022 04:49 PM (IST)

    Pune Rain : पुढील 48 तासात पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता

    जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात  पुढील 48 तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. 16 जुलैपासून काही ठिकाणी पाऊस ओसरण्याची देखील शक्यता आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 04:46 PM (IST)

    Osmanabad Rain : उस्मानाबादमध्येही मुसळधार पाऊस

    उस्मानाबाद जिल्ह्यात मागील 24 तासात 44 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, आतापर्यंत 243.2 मिमी पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या सततधार भिज पावसामुळे शेतात बांधावर पाणी साचले असून ओढ्यात पाणी आले आहे. शेतात पाणी सचल्याने सोयाबीनसह अन्य पिके धोक्यात येऊ शकतात तर पावसामुळे जलसाठ्यात वाढदिवसाच्या झाली आहे. भिज पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून आगामी 4 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 04:42 PM (IST)

    Kokan Rain : अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

    रायगड जिल्ह्यात ढगफुटी झाल्याप्रमाणे धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू आहे, पाऊस विश्रांती घ्यायला तयार नाही,  जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली जवळील अंबा नदी पुलावरून बुधवारी दुपारी एक वाजल्यानंतर पाणी गेले. तसेच मंगळवारी दुपारी 12 नंतर पुलावरून पाणी गेले ते तब्बल 9 तासांनी म्हणजे रात्री 9 वाजल्यानंतर ओसरले. परिणामी सलग दुसऱ्या दिवशीही पुलावरून पाणी गेल्याने येथील वाहतूक खोळंबून प्रवासी व विदयार्थी यांचे पुरते हाल झाले. त्यामुळे प्रवासी, चाकरमानी, विद्यार्थी व वाहने पुलाच्या दोन्ही बाजूस अडकून पडली होती. तसेच रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा देखील लागल्या होत्या.

    सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालीतून नागोठणे व सुकेळी येथील शाळेत गेलेले 100 हून अधिक विद्यार्थी पुलाच्या पलीकडे अडकून पडली होती. ती मुले रात्री नऊ नंतर पालीला आपल्या घरी पोहचली. ही मुले 7 ते 9 तास पुलाच्या पलीकडे अडकून पडली होती. यामुळे पालक खूप चिंतातूर झाले होते. असे पालीतील पालक डॉ. मयूर कोठारी यांनी सांगितले. शिवाय खेडेगावातून पालीला शाळेत व महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांना देखील सलग दुसऱ्या दिवशी अडकून पडावे लागले. असे शिक्षक शरद निकुंभ यांनी सांगितले.

    पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुलावरून पाणी जात असताना कोणीही पुलावरून प्रवास करू नये, तसेच सर्व तालुका प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचा व खबरदारीच्या सूचना दिल्या असल्याचे सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायणावर यांनी सांगितले.

  • 13 Jul 2022 04:35 PM (IST)

    Marathwada Rain : गोदावरी नदीच्या पुराचा विळखा

    औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध सरला बेट परिसराला गोदावरी नदीच्या पुराचा विळखा बसला आहे, परिणामी आज सरला बेटावरील गुरुपौर्णिमा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुराची महंत रामगिरी महाराजांनी पाहणी केली असून भाविकांनी बेटावर न येण्याचे आवाहन केलं आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 04:33 PM (IST)

    Marathwada Rain : दोन्ही धबधबे वाहू लागले

    औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध वेरूळ लेणीतील सीता न्हाणीचे दोन्ही धबधबे मुसळधार वाहू लागले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील म्हैसमाळ परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे या दोन्ही धबधब्यांना पाणी आलं आहे. वेरूळ लेणीतील हे दोन्ही धबधबे सुरू झाल्यामुळे वेरूळ लेणीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली  आहे.

  • 13 Jul 2022 04:30 PM (IST)

    Nashik Rain : गिरणा धरण 70 टक्के भरले

    नाशिक मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा जळगावला होणार आहे. गिरणा धरणाच्या जलसाठ्यात सातत्याने वाढ होत असून गिरणा धरण 37 % वरून वाढ होऊन आतापर्यंत 70 टक्के धरण भरले आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास लवकरच गिरणा धरणातून गिरणा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती गिरणा प्रशासनाने दिले आहे.
    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 04:27 PM (IST)

    Solapur Rain Update : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चांदणी उपनदीला पूर

    – मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चांदणी नदीला पूर आला आहे.बार्शी तालुक्यातील आगळगाव उंबरगे, भानसळे, कळंबवाडी, खडकोणी गावाचा संपर्क तुटला आहे.  गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने आगळगावातील चांदणी नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे सातत्याने नदीला पूर येत असल्याने पुलाची उंची वाढवण्याची आगळगाव ग्रामस्थांनी मागणी केलीय.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 04:23 PM (IST)

    Vasai Landslide : वसई राजवलीच्या वाघरल पाडा या परिसरात दरड कोसळली

    दरडीखाली 6 जण अडकले असून 4 जणांना रेस्क्यू करून बाहेर काढले आहे. तर 2 जण दरडीखालीच दबलेले असल्याची माहिती मिळाली आहे. वालीव पोलीस, वसई विरार महापालिका अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे. राजीवली वाघराल पाडा परिसरात भूमाफियांनी मोठमोठे डोंगर खोदून चाळी बांधल्या आहेत. अनेक चाळी ह्या दरडच्या पायथ्याशी आहेत. त्याच चाळीतील 2 घरांवर ही दरड कोसळली आहे.

  • 13 Jul 2022 04:19 PM (IST)

    कल्याण खाडीत पाण्याची पातळी वाढली

    कल्याण खाडीत पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे खाडी किनारी असलेल्या घरांमध्ये  पाणी साचलं आहे. महापालिकेकडून नागरिकांना घरं रिकामी करण्याची सूचना करण्यात आली आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 04:18 PM (IST)

    खडवली-कुंभारपाडा रस्ता पाण्याखाली

    टिटवाळा : खडवली स्थानका शेजारील खडवली-कुंभारपाडा रस्ता पाण्याखाली गेला आहे. वसाहतींमुळे नैसर्गिकरीत्या होणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याला अडथळे निर्माण झाल्याने आणि रस्त्यावर पाणी साचले आहे. मोठा पाऊस झाला की हा रस्ता पाण्याखालीच जातो. परिणामी कुंभारपाडा ग्रामस्थ आणि आजुबाजुच्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना खूपच समस्यांचा सामना करावा लागत आहेत.

  • 13 Jul 2022 04:12 PM (IST)

    नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील वडगाव धरणाची 17 दारं उघडण्यात आली आहे. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरण भरले आहे. धरणा पुढील व नदी क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • 13 Jul 2022 04:10 PM (IST)

    भंडारा-मध्यप्रदेश राज्यमार्ग मोहाडी शहरा जवळ झाला जलमय

    मार्ग बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय

    येणाऱ्या जाणाऱ्या वाहणाची मोठ्या प्रमाणात तारंबळ उडाली आहे.

    मोहाडी शहरातील बसस्थानक परीसरात साचल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने भंडारा-तुमसर वरील मार्ग तात्पुरता बंद केला आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 04:00 PM (IST)

    पालघर जिल्ह्यात पूर परस्थिती

    वाडा तालुक्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रस्ते बंद

    1. अकलोली ते केलठण रोडवरील पुलावरून पाणी, वाहतूक बंद
    2. हमरापूर ते गालतारे मधील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद
    3. गौरपूर वनगा पाडा येथील 3 घरात पाणी गेल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं
    4. नदीकाठी गावांना इशारा देण्यात आला आहे
  • 13 Jul 2022 03:57 PM (IST)

    नाशिक, बीड, गोंदियात बंधारे फुटले

    नाशिक, बीड आणि गोंदियात बंधारे फुटले आहेत. या भागत तुफान पाऊस झाला आहे. काही भागात सध्या पूरस्थिती आहे.

  • 13 Jul 2022 03:53 PM (IST)

    पुण्यात पावसाचं पाणी थेट पोलीस स्टेशनमध्ये

    पुण्यातील चंदनगर पोलीस स्टेशनमध्ये घुसलं पावसाचं पाणी

    शहरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला

    शहरात अनेक ठिकाणी साचलं पाणी

  • 13 Jul 2022 03:51 PM (IST)

    नांदेडमध्ये पूरस्थिती

    नांदेड : गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे, गोवर्धन घाट इथली प्रमुख स्मशानभूमी पाण्याखाली, अंत्यसंस्कारासाठी नांदेडकरांना आता सिडको गाठावे लागणार आहे, गोदावरी नदी पुरसदृश्य स्थितीत आली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 03:42 PM (IST)

    कोयना धरण व्यवस्थापनाची माहिती

    कोयना धरण पायथा विद्युत गृहातून सायंकाळी 5.00 वा. 1050 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीमध्ये सुरू केला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 03:37 PM (IST)

    पालघर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

    पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यात  सर्वाधिक पावसाची नोंद वाडा तालुक्यात झाली आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत  118.25 मीमीची नोंद करण्यात आली आहे.

    पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल

    1. वसई:- 5 मी मी
    2. जव्हार:- 30.33मी मी
    3. विक्रमगड:- 76.5 मी मी
    4. मोखाडा:- 17.4मी मी
    5. वाडा :-  118.25मी मी
    6. डहाणू :-  57.82 मी मी
    7. पालघर:- 72.83मी मी
    8. तलासरी :-  39 मी मी

    एकूण पाऊस :- 417.13मी मी

    एकूण सरासरी 52.14 मी मी

    पाहा व्हिडिओ

  • 13 Jul 2022 03:32 PM (IST)

    किनवट येथील पैनगंगेच्या पुरामुळे दोनशे कुटुंबाचे स्थलांतर

    नांदेड : किनवट परिसरात पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुर्ण क्षमतेने नदी भरुन वाहत आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीत येणारे पाण्याचे प्रमाण लक्षात घेता स्वाभाविकच पैनगंगेचे पाणी किनवटच्या नदी जवळील सखल भागात घुसले आहे. या भागातील 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले असून प्रशासनातर्फे या लोकांना अन्नाची पाकिटे व इतर व्यवस्था केली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी दिली. आज सकाळ पासून नांदेड-किनवट हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

  • 13 Jul 2022 03:29 PM (IST)

    पर्यटकांच्या गर्दीने फुलले विदर्भाचे नंदनवन चिखलदरा

    चिखलदऱ्यात संततधार पावसाची रिपरिप

    चिखलदऱ्यात धूक्याची चादर

    रिमझिम पावसाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक चिखलदरामध्ये दाखल

  • 13 Jul 2022 03:28 PM (IST)

    पालघरमधील अनेक रस्ते बंद

    पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे विक्रमगड तालुक्यातील रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे बंद करण्यात आले आहेत

    1. देहर्जे ते शीळ झडपोली
    2. कृंझे ते कंचाड
    3. विक्रमगड ते मनोर
    4. दादाडे ते भगत पाडा
    5. दादाडे ते डोलारी

    वरील रस्ते अतिपाऊसामुळे बंद करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी हे रस्ते वापरू नये  ही विनंती आहे.

  • 13 Jul 2022 02:33 PM (IST)

    अतिवृष्टी पार्श्वभूमीवर उद्या पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुटी

    पुणे आणि पिंपरी चिंडवडमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील दोन दिवसांत अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्या शाळेला सुटी जाहीर करण्यात आली आहे.

  • 13 Jul 2022 02:08 PM (IST)

    Pune Rain Update : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने काल खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले

    पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने काल खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे शहरातील बाबा भिडे पुल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पुलावर दोन्ही बाजूंनी पोलीसांनी  बेरीकेडींग देखील केली होती. मात्र आज सकाळपासून पुणेकर नियम न जुमानता भिडे पुलावरून ये जा करताना दिसत आहेत. नदीपात्रात दोन्ही बाजूला पाणी साचले असताना देखील पुणेकर मात्र बिन्धास्त या भिडे पुलावर फेऱ्या मारत आहेत. काही हौशी पुणेकर तर जीव धोक्यात घालून काठावर सेल्फी काढत आहेत. तर दुसरीकडे मात्र नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी आणि कचरा वाहून आलेला देखील पाहायला मिळत आहे.
  • 13 Jul 2022 02:03 PM (IST)

    Gadchiroli Rain Update : गडचिरोली जिल्ह्यातील दोन धरणातून मोठ्या पाण्याचा विसर्ग

    गडचिरोली जिल्ह्यातील दोन धरणातून मोठ्या पाण्याचा विसर्ग

    मेड्डीगट्टा लक्ष्मी ८५ दरवाजे तर चिचोराह धरणाचे ३८ दरवाजे पूर्णपणे उघडले

    जिल्ह्यातील प्राणहिता व गोदावरी नदीत धोका पातळीच्या वर

    सिरोंचा तालुक्यातील अकरा गावे रेट अलर्ट

    सिरोंचा तालुक्यातील नगरम गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रशासनाचे काम सुरू

    चीचोराह धरणाच्या काठावरुन ग्राऊंड झिरो वरून पूर परिस्थितीचा आढावा

  • 13 Jul 2022 02:02 PM (IST)

    Solapur Rain Update : सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसापासून रिमझिम पावसाची हजेरी

    – सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसापासून रिमझिम पावसाची हजेरी
    – सोलापूर जिल्ह्यात काल मंगळवारच्या एका दिवसात 22 मिमी. पावसाची नोंद
    – 1 जून ते 13 जुलैपर्यंत 154.3 मिमी पावसाची नोंद झालीय
    – सोलापूरमधील तापमानात कमालीची थंडी पसरलीय
    – एरव्ही दुष्काळी समजले जाणाऱ्या बार्शी आणि अक्कलकोटला पावसाची सर्वाधिक नोंद झालीय
  • 13 Jul 2022 02:00 PM (IST)

    Palghar Rain Update | विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास, टायरमधील ट्युबच्या सहाय्याने प्रवास

    विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास, टायरमधील ट्युबच्या सहाय्याने प्रवास

  • 13 Jul 2022 01:42 PM (IST)

    Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झाली पंचनामे कऱण्याचे आदेश दिलेत – देवेंद्र फडणवीस

    मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झाली पंचनामे कऱण्याचे आदेश दिलेत मृत्यूमुखी पडले त्यांना एनडीआरएफला सुचना दिल्यात गडचिरोलीला मुख्यमंत्र्यांनी निदर्शे दिलेले आहेत लोकांची चांगली सोय़ करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मालमत्ता आणि माणस नुकसान होणार नाही

  • 13 Jul 2022 01:41 PM (IST)

    Pune Rain Update : पुण्यातील कात्रज जूना बोगदा परिसरात कोसळली दरड

    1. पुण्यातील कात्रज जूना बोगदा परिसरात कोसळली दरड
    2. मोठा दगड आला होता रस्त्यावर
    3. काहीकाळ कात्रज घाटात वाहतूक कोंडीही झाली होती
    4. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्यात आलीये
    5. पावसाळ्याच्या दिवसात दरड पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये
  • 13 Jul 2022 01:37 PM (IST)

    Chandrapur Rain Update : खासदार धानोरकर यांनी पूरग्रस्त लोकांशी संवाद साधून त्यांना सर्व ती मदत करण्याची ग्वाही दिली

    चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात इरई नदीचे पाणी शिरल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी पूरग्रस्त भागात भेट देऊन प्रशासनाला तातडीने मदतीच्या सूचना केल्या. इरई धरणाचे सर्व सातही दार उघडण्यात आल्याने काठावरच्या भागात पाणी शिरले आहे. चंद्रपूर शहराचा रहमत नगर हा भाग सखल आणि नदीलगत असल्याने इथे सुमारे 50 वर घरात पुराचे पाणी शिरले आहे. या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 60 नागरिकांना हलवण्यात आले असून, प्रशासन इथे कार्यरत आहेत. खासदार धानोरकर यांनी पूरग्रस्त लोकांशी संवाद साधून त्यांना सर्व ती मदत करण्याची ग्वाही दिली.
  • 13 Jul 2022 01:28 PM (IST)

    Nagpur Rain Update : नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले

    नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले

    नवेगाव खैरी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरण भरले

    नवेगाव खैरी धरणातून नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो

    नागपूर ला मिळणार मुबलक पाणी

  • 13 Jul 2022 01:27 PM (IST)

    Lonavala Rain Update : लोणावळ्यात सायंकाळी पाचनंतर प्रशासनाकडून पर्यटनाला बंदी

    -पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही जर पर्यटनस्थळ लोणावळ्यात जाण्याचं नियोजन करत असाल तर आधी ही बातमी पहा

    -कारण लोणावळ्यात सायंकाळी पाच नंतर प्रशासनाने पर्यटनाला बंदी घातली आहे

    -लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे, परिणामी भुशी धरणाने रौद्र रूप धारण केलंय. त्यामुळं पर्यटकांना ही धरणाच्या बाजूला उभ राहून इथला आनंद घ्यावा लागतोय

  • 13 Jul 2022 01:26 PM (IST)

    Godawari Rain Update : गोदाकाट परिसरात असलेल्या गावातील शेती पिकांना फटका बसला 

    गेल्या सहा दिवस नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला आलेल्या पुराचा नांदूर मधमेश्वर धरणाच्या बॅक वॉटर ला असलेल्या निफाड तालुक्यातील गोदाकाट परिसरात असलेल्या गावातील शेती पिकांना फटका बसला

  • 13 Jul 2022 01:23 PM (IST)

    Eknath Shinde : राज्यातल्या सगळ्या परिस्थितीवरती आमचं लक्ष आहे

    गुरुपोर्णिमेदिवशी एक वेगळी भावना असते गुरूपोर्णिमेनिमित्त बाळासाहेबांना वंदन करताना त्यांच्याबद्दल श्रद्धा आणि भावना बाळासाहेबांचा आशीर्वादामुळे सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री होता आलं आज ज्या घडामोडी घडल्या त्या आपण सध्या पाहतो आहोत हिंदु माणसाला जगण्याची हिंमत बाळासाहेबांनी दिली सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम सरकार करेल सर्व समाज घटकांना न्या देण्याचं काम करणार बाळासाहेबांसमोर स्मृती स्थळावर वंदन केलेलं आहे

  • 13 Jul 2022 01:17 PM (IST)

    Pune Rain Upadate : पुण्यात पावसाचं पाणी थेट घुसलं पोलीस स्टेशनमध्ये, शहरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला

    पुण्यात सकाळपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे. पुण्यातील चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये घुसल पावसाचं पाणी…शहरात सकाळ पासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय.

  • 13 Jul 2022 01:13 PM (IST)

    Ratnagiri Rain Update : गुहागर तालुक्यात  मुसळधार पाऊस सुरू

    गुहागर तालुक्यात  मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्री पासूनच पावसाला सुरुवात झाली आहे गुहागर मधील भातशेतीला   पाण्यामुळे  तलावाचे स्वरूप आले आहे

  • 13 Jul 2022 01:08 PM (IST)

    Nanded Rain Update : एका व्यक्तीला  अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले

    शिवणे स्मशानभूमी, नांदेड सिटीकडे जाणारया रस्यावर पुलाच्या ठिकाणी पाण्यामधे अडकलेल्या एका व्यक्तीला  अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले

  • 13 Jul 2022 01:06 PM (IST)

    Godhiya Rain Update : गोंदिया जिल्ह्यात काल  दुपारपासून परिसरात पावसाने झोडपले.

    गोंदिया जिल्ह्यात काल  दुपारपासून परिसरात पावसाने झोडपले. मुसळधार पावसामुळे परिसरातील नाल्यांना पूर आलेला आहे. काल मध्यरात्रीपासून मोरगाव अर्जुनी तालुक्यातील  सावरटोला-पिंपळगाव मार्गावरील नाल्यावर पूर आला असून,नाला दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सावरटोला, बोरटोला पिंपळगाव  मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद झाली आहे.परिसरातील नाल्याला लागूनअसलेल्या सावरटोला, बोरटोला, चापटी,सुरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. शेतातील बांध पाण्याने तुडुंब भरली आहेत. धान पिकांची  रोवणी खोळंबली आहेत. धानपिकांचे  पऱ्हे  पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील मोटार पंपाचे पाईपही पुरात वाहून गेले आहेत. तसेच विहिरीला लावलेल्या मोटारी सुद्धा वाहून गेल्यात, तर काही पाण्यामुळे खराब झाल्या आहेत. पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी सावरटोला, बोरटोला,चापटी,सुरगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे….

  • 13 Jul 2022 01:04 PM (IST)

    Katraj Tunnel : काञज जुना बोगदयाजवळ दरड कोसळली

    काञज जुना बोगदयाजवळ दरड कोसळली. रस्यावर दगडे आली असून महापालिकेचे पथक रवाना झाले आहे

  • 13 Jul 2022 12:58 PM (IST)

    Bhandara Rain Update : तुमसरची स्मशानभूमी पुराच्या पाण्यात बुडाली

    – तुमसरची स्मशानभूमी पुराच्या पाण्यात बुडाली.

    – तुमनी नाल्याला आला पूर.

    – स्मशानभूमी परिसरात 4 फुटावर पाणी.

    – शहरातील स्मशानभूमी बंद करण्याची वेळ तुमसर नगरपरिषदेवर आली असून पर्याय व्यवस्था म्हणून तुमसर शहराच्या स्मशानभूमी लगतच करण्यात आली आहे.

  • 13 Jul 2022 12:57 PM (IST)

    Vardha Rain Update : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच कहर केलाय. सतत सुरु असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात रात्रभर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहे यामुळे नदी नाले दुभडी भरून वाहत आहे. जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील मार्ग सुद्धा पाण्याखाली आल्याने वाहतुकीसाठी बंद झाले आहे. आता पर्यंत जिल्ह्यात 363.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात दोघे वाहून गेल्याची घटना घडलीय.

  • 13 Jul 2022 12:54 PM (IST)

    Khed Rain Update : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस

    खेड तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरु असल्याने ओढे नदीनाले ओसंडुन वाहत आहेत तर काही भागातील ओढे नाल्यांवरील रस्तेही वाहतुकीसाठी बंद झालेत. अशात वेताळे गावातुन साबुर्डी वाशेरे कडे जाणा-या पुलावरुन पाणी जात असल्याने पश्चिम भागातील वाहतुक बंद करण्यात आली असुन नागरिकांनी धोका पत्करुन वेताळे पुलावरुन जाण्याचा प्रयत्न करुन नये नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

  • 13 Jul 2022 12:47 PM (IST)

    Maharashtra Rain Update : मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबईत दुपारी एकवाजेपर्यंत मुसळधार पाऊस

  • 13 Jul 2022 12:44 PM (IST)

    Chandrapur : महाराष्ट्राला तेलंगणाशी जोडणारा राजुरा महामार्ग बंद

    1. चंद्रपूर:– जिल्ह्यातील राजुरा महामार्ग झाला बंद,
    2. वर्धा नदीच्या उंच पुलावरून वाहू लागले पुराचे पाणी,
    3. वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला लागल्या वाहनांच्या रांगा,
    4. महाराष्ट्राला तेलंगणाशी जोडणारा मार्ग बंद,
    5. अप्पर वर्धा आणि इरई धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ,
    6. पावसाने उसंत घेतली असली तरी धरणातून सातत्याने होणाऱ्या पाण्याचा विसर्गामुळे नदीनाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ
  • 13 Jul 2022 12:43 PM (IST)

    Mumbai Rain Update : ‘समुद्र किनारी न जाण्याचं नागरिकांना आवाहन

    ‘समुद्र किनारी न जाण्याचं नागरिकांना आवाहन

  • 13 Jul 2022 12:41 PM (IST)

    Pune Rain | पुण्यातील मावळमध्ये पावसाची जोरदार हजेरी, शिवली

    पुण्यातील मावळमध्ये पावसाची जोरदार हजेरी, शिवली

  • 13 Jul 2022 12:34 PM (IST)

    Amravati Rain Update : अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे पाच दरवाजे 10 सें.मी ने उघडले

    अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पाचे पाच दरवाजे 10 सें.मी ने उघडले

    पूर्णा मध्यम प्रकल्पातून 30.29 घ.मी. प्रतिसेकंद वेगाने पाणी पूर्णा नदीत सोड़ले

    पूर्णा नदीकाठच्या गावतील लोकांना सतर्कतेचा इशारा

    जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाची संततधार कायम.

  • 13 Jul 2022 12:31 PM (IST)

    Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, रजपूत वीटभट्टी येथे घरात पाणी शिरले

    पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात,

    रजपूत वीटभट्टी येथे घरात पाणी शिरले

  • 13 Jul 2022 12:28 PM (IST)

    Chandrapur Rain Update : पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची केली सुटका

    चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर पोलीस ठाण्यातील पथकाची धाडसाची कामगिरी, चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची केली सुटका, मध्यपदेशातून शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती खाजगी ट्रॅव्हल्स बस, पोलीस पथकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितल्यावरही बस चालकाने पुढे दामटली बस, सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पुराच्या पाण्यात बस बंद पडून प्रवाशांच्या जीवाला झाला होता धोका, माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात अंधारातच सुरु केले बचाव अभियान, स्थानिकांच्या मदतीने प्रचंड प्रवाहात देखील दोऱ्या बांधून पुरुष वृद्ध लहान मुले व महिला यांना काढले बाहेर, दुसऱ्या एका बसमध्ये बसवून देत हैदराबादकडे केले रवाना, बस पुराच्या पाण्यात अजूनही अडकून, चंद्रपूर पोलिसांच्या कामगिरीचे होत आहे कौतुक
  • 13 Jul 2022 12:25 PM (IST)

    Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

    – नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला… – मात्र पूर परिस्थिती कायम – गंगापुर धरणातून 10 हजार क्युसेक – दारणा धरणातून 8 हजार 846 क्युसेक – तर पालखेड धरणातून 9 हजार 436 क्युसेक पर्यंत कमी करण्यात आला पाण्याचा विसर्ग – यामुळे नांदूरमतमेश्वर धरणातून 45 हजार क्युसेस पर्यंत पाण्याचा विसर्ग कमी…. – या पावसाच्या हंगामात नांदूरमदमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने आज सकाळी सहा वाजेपर्यंत 12.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग… – जायकवाडी धरणाची पाणी पातळी पोहोचली 44 टक्क्यापर्यंत… – नांदूरमधमेश्वर धरणातून अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने लवकरच पोहोचणार जायकवाडी धरणाची पाणीपातळी 50 टक्क्यांच्या वर

  • 13 Jul 2022 12:17 PM (IST)

    Nashik : नाशिकमधील ओझरखेड धरण 100 टक्के भरलं, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    नाशिक – ओझरखेड धरण 100 टक्के भरलं ..

    धरणातून सध्या 2000 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू

    इतिहासात पहिल्यांदाच जुलै च्या पहिल्या आठवड्यात ओझरखेड धरण फुल्ल..

    नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    धरण भरल्याने दिंडोरी तालुक्याचा पाणी प्रश्न मिटला

  • 13 Jul 2022 12:16 PM (IST)

    Palghar rain update : पालघर तालुक्यातील सफाळे ग्रामपंचायत येथील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    पालघर तालुक्यातील सफाळे ग्रामपंचायत येथील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यातआला आहे,  अतिवृष्टीमुळे कोणीही नागरिकांनी अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नसल्याचे आवाहन करण्यात आले आहे,
    .
    करवाळे धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याचा लोट वाढण्याची शक्यता आह,.  मागील 15 तासापासून सफाळे परिसरात 166 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. तरी कृपया सर्व नागरिकांनी स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास ग्रामपंचायतीला कळवावे असे ग्रामपंचायत ने सांगितलं आहे,. सकाळी 11.30 च्या सुमारास मोठी भरती येणार असल्याने पुराची पातळी अधिक वाढण्याची संभावना आहे.
  • 13 Jul 2022 12:11 PM (IST)

    Nanded Rain Update : तलाव ओव्हर फ्लो झाल्याने हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

    नांदेड: तलाव ओव्हर फ्लो झाल्याने हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला, हिमायतनगर तालुक्यात गेल्या चोवीस तासात तब्बल 183 मिलिमीटर पावसाची नोंद, नदी नाले तुडुंब भरल्याने तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली, हिमायतनगर तालुक्यात पावसाचा कहर.

  • 13 Jul 2022 12:09 PM (IST)

    Aurangabad Rain Update : औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीला पूर

    औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीला पूर

    सरला बेट परिसराला पडला पुराचा विळखा

    गोदावरी नदी काठावरील 35 गावांना सतर्कतेचा ईशारा

    वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील गावांना सतर्कतेचा ईशारा

    प्रसिद्ध सरला बेटावरील गुरुपौर्णिमा महोत्सव रद्द

  • 13 Jul 2022 12:07 PM (IST)

    Mumbai Rain Update : 3-4 तासांत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता

  • 13 Jul 2022 12:03 PM (IST)

    मुंबईत सखल भागात पाणी साचल्याने बेस्ट बसचे मार्ग बदलले

  • 13 Jul 2022 12:00 PM (IST)

    Bhandara Rain Update – मुसळधार पावसातही तरूण पकडत आहेत मासे

    भंडारा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून आलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत असून त्याचे पाणी छोट्या नाल्याला आल्याने सोबतच आलेल्या माशांन्या पकडण्याचा मोह येतील रहदारी करणाऱ्या लोकांना आवरला नाही. लोकांनी मिळेल त्या साधनाद्वारे लोकांनी या माशांना पकडण्यासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या नाल्यातून तीन ते चार किलोचे मासे सापडल्याने आलेला पाऊस खवय्यांसाठी परवणी ठरले आहे. हे संपूर्ण दृश्य तुमसर शहरालगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर पहायला मिळाले.

  • 13 Jul 2022 11:52 AM (IST)

    Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पाऊस

  • 13 Jul 2022 11:48 AM (IST)

    Mumbai Rain Update : पाणी त्वरित उपसून वाहतूक सुरळीत

    जोरदार पावसातही हिंदमाता येथील सखल भागात पाणी त्वरित उपसून वाहतूक सुरळीत राखण्यात आली आहे.

  • 13 Jul 2022 11:44 AM (IST)

    Yavatmal Rain Update : यवतमाळ जिल्ह्यातील वाणी तालुक्यांत पावसाचा हाहाःकार

    – यवतमाळ जिल्ह्यातील वाणी तालुक्यांत पावसाचा हाहाःकार
    – मुसळाधार पावसामुळे घोंसा गावात शिरलं पुराचं पाणी
    – गावातील मंदिर, अनेक घरं पुराच्या पाण्याखाली
    – गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हालवण्याचे प्रयत्न सुरु
    – गावात पुराचं पाणी शिरल्याने लोकांची गैरसोय
    – पुरामुळे घोंसा गावातील लोकांचं मोठं नुकसान
  • 13 Jul 2022 11:41 AM (IST)

    Niphad Rain Update : नऊ वर्षाचा मुलगा पूराच्या पाण्यात बुडाला

    निफाड तालुक्यातील शिंगवे येथे पुराच्या पाण्यात 9 वर्षीय चिमुकला बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली असून रोहित कटारे असे त्याचे नाव आहे. शिंगवे परिसरात देखील नदीच्या पुराचे पाणी वीट भट्टी परिसरात घुसल्या वीट भट्टी जवळ असलेल्या खड्ड्यामध्ये पुराचा अंदाज न आल्याने हा चिमुकला खड्यात पाडला असता यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबियाने त्याचा सर्वत्र शोध घेतला अखेर पाण्यात शोध घेतला असता त्याचा मृतदेह नदीच्या पाण्यात आढळून आला.

  • 13 Jul 2022 11:39 AM (IST)

    Gujrat Rain Update : गुजरातमध्ये पुरामुळे भीषणस्थिती

    मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे

  • 13 Jul 2022 11:36 AM (IST)

    Maharashtra Rain Update : राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

    महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सकाळपासून पुन्हा पाऊस सुरू झाला आहे.

  • 13 Jul 2022 11:33 AM (IST)

    Navi Mumbai Rain Update : नवी मुंबई पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात, काही ठिकाणी साचलं पाणी

    काल दिवसभर उसंत घेतल्यावर आज सकाळ पासून पावसाचे पुन्हा जोरदार आगमन झालंय. सकाळ पासूनच पनवेल उरण सह नवी मुंबईत सर्वत्र पावसाने जोरदार बॅटिंग केलेय. मुसळधार पावसामुळे नवी मुंबई शहरातील सखल भागात काही प्रमाणात पाणी देखील साचले असून नागरिक यातून वाट काढत जात आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आणि एमआयडीसी मधील सखल भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे.

  • 13 Jul 2022 11:32 AM (IST)

    गोसीखुर्द धरणाचे सगळे दरवाजे उघडले, नदी काठावरील गावांना सतर्क राण्याचा इशारा

    अखेर आठव्या दिवशी गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण 33 पैकी 33 दरवाजे उघडले गेले असून 28 दरवाजे अर्ध्या मीटर ने तर 5 दरवाजे 1 मीटर ने उघडले गेले आहे।संपूर्ण 33 दरवाज्यातुन 4286.7 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे।गोसीखुर्द पानलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरु असल्यामुळे धरणात पाण्याची आवक सतत होत असल्याने पाणी पातळी नियंत्रित आनण्यासाठी गोसीखुर्द धरन प्रशासनाने संपूर्ण 33 दरवाजे उघडन्याचा निंर्णय घेतला आहे यामुळे वैमगंगा दुथळी भरून वाहत असल्याने मासेमार बांधवाना नदी पात्रात जाण्यास मनाई करन्यात आली आहे।शिवाय नदी काठील गावाला सतर्क राहान्याचा इशारा देण्यात आला असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोड़ वर आला आहे।

  • 13 Jul 2022 11:30 AM (IST)

    Parbhani Rain Update : परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    परभणी जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाला आहे. जिल्ह्यातील पालम या ठिकाणी लेंडी नदीला पूर आल्याने तालुक्यातील फळा, आरखेड, घोडा, सोमेश्वर, सायाळ, उमरथडी, पूयणी, आडगाव, वणभुजवाडी, तेलजापूर, या गावाचा संपर्क तुटला आहे , पाऊस आणखीन ही सुरूच असल्याने पुराची स्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता आहे

  • 13 Jul 2022 11:25 AM (IST)

    Nashik : निफाडमध्ये पुराच्या पाण्यात बुडून नऊ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू.

    – पुराच्या पाण्यात बुडून नऊ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू… – निफाड तालुक्यातील शिंगवे येथील घटना… – वीट भट्टी जवळ पुराचे पाणी खड्ड्यात घुसल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू…. – रोहित कटारे असे मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव….

  • 13 Jul 2022 11:12 AM (IST)

    Palghar Rain Update : पालघरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस

    पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून वाडा तालुक्यातील हमरापुर- गालतरे मार्गावरील आंब्याची मोरी पाण्याखाली गेल्यामुळे नाणे, सांगे, गालतरे, गो-हे, घुसाळपाडा, गुहीर, हमरापुर, आदि गावांचा संपर्क तुटला आहे. विद्यार्थी, वैद्यकीय अधिकारी ,दूध व्यवसायिक, नोकरदार यांना फटका बसला आहे

  • 13 Jul 2022 11:11 AM (IST)

    Ratnagiri Rain Update : रत्नागिरी- कोकण किनारपट्टी भागात पौर्णिमेचे उधाण

    रत्नागिरी- कोकण किनारपट्टी भागात पौर्णिमेचे उधाण

    समुद्रात साडेचार मीटर उंचीच्या लाटा

    समुद्राचे रौद्र रूप, नागरी वस्ती पर्यंत समुद्राच्या लाटा

    किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना

    मिऱ्या ते पंधरा माड धूप प्रतिबंधक बंधारा वरून लाटा मानव वस्ती पर्यंत

  • 13 Jul 2022 10:40 AM (IST)

    Mumbai Rains : मुसळधार पावसाने मुंबईचा वेग मंदावला!

    Mumbai Rains Live Update: मुंबईत सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरीवली ते वांद्रे आणि अंधेरीते बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले,आणि सांताक्रुज दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनं संथगतीने जाताना दिसत आहेत. मुंबईत मुसळधार पावसाने मुंबईचा वेग मंदावलाय.

  • 13 Jul 2022 10:35 AM (IST)

    Vasai Landslide Update : एकाच कुटुंबातील चौघे दरडीत फसले!

    Vasai Landslide Update : वसईमध्ये  घरावर दरड कोसळली असून या मध्ये एकाच कुटुंबातील चौघेजण फसले. त्यातील दोघा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून दोन जण आत फसले असल्याची माहिती मिळाली आहे.

    दरडीत फसलेली माणसे – अमित ठाकूर (याला आता बाहेर काढलं) रोशनी ठाकूर (ही मुलगी अजूनही अडकली आहेत)

    जखमी – वंदना ठाकूर ओमकार ठाकूर

    वाचा सविस्तर वृत्त : मोठी बातमी! वसईत दरड कोसळली

  • 13 Jul 2022 10:30 AM (IST)

    Central Railway : मध्ये रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं!

    Central Railway Rain Update : मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिराने सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या मध्य उपनगरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई लोकलचा वेग मंदावला आहे. परिणाम लोकलचं वेळापत्रक कोलमडलं असून प्रवाशांना त्याचा फटका बसतोय.

  • 13 Jul 2022 10:26 AM (IST)

    Nagpur Rain Live : नागपुरातील धापेवाडातील नदीला पूर

    Nagpur Rain Update : नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा परिसरातील नदीला पूर आला आहे. नदीच्या पात्रातील पाणी बाहेर वाहू लागल्याने शेतात आणि परिसरात पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना आणि लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडूनही लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच सर्व खबरदारीही घेतली जातेय.

  • 13 Jul 2022 10:25 AM (IST)

    पावसाचा फटका! कसारा घाटात वाहतूक कोंडी

    Kasara Ghat : जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी झाली आहे. अपघात, वाहने बंद पडत असल्यानं टीम मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. सध्या महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर होताना पाहायला मिळतोय.

  • 13 Jul 2022 10:16 AM (IST)

    Thane Rain Update : ठाण्यात मुसळधार! रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात

    Central Railway rain Update : सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे स्थानकात रेल्वे रुळावरती पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या तरी मध्य रेल्वे सुरळीत असून पावसाने मोठ्या प्रमाणात जोर धरला तर रेल्वे रूळ पूर्णतः झाकून जातील. त्यामुळे रेल्लेसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु असून रेल्वेच्या वेळापत्रकावर मुसळधार पाावसाचा परिणाम झाला आहे.

  • 13 Jul 2022 10:10 AM (IST)

    नागपूरातील अंबाझरी तलाव झालाय ओव्हरफ्लो

    – नागपूरातील अंबाझरी तलाव झालाय ओव्हरफ्लो
    – गेल्या तीन दिवसांच्या संततधार पावसाने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो
    – अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नागपूरातील
     नाग नदीत पाण्याची पातळी वाढली
    – तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नागपूरात लुटतायत आनंद
  • 13 Jul 2022 09:59 AM (IST)

    thane rain update : वंदना एसटी बस डेपोत साचल पाणी

    सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील वंदना एसटी बस डेपो या ठिकाणी सखोल भागात गुडघा भर पाणी साचले आहे .ठाणे महापालिकेच्या वतीने सदर ठिकाणी सक्षम पंप लावण्यात आले असून पाण्याचा निचरा होण्यासाठी वेळ लागत आहे.पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने वाहनांना देखील वाट काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे .हवामान खात्याच्या अंदाजा नुसार पुढील 3 ते 4 दिवस ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले आहे ..त्यामुळे प्रशासनाच्या वतीने देखील सतर्क तेचा इशारा देण्यात आले आहे

  • 13 Jul 2022 09:58 AM (IST)

    मुंबईतल्या दादर परिसरात झाडं कोसळलं

    दादरच्या हिंदमाता येथे डीजी देवरुखकर मार्ग येथे एक झाड कोसळला असून काही झोपड्यांवर हे झाड पडलं आहे मात्र कोणती जीवित हानी झाले नसल्याचं सांगितलं जातंय सध्या अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून झाड काढण्याचे काम सुरू आहे

  • 13 Jul 2022 09:42 AM (IST)

    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचीस्थिती

    मोडक सागर धरण –

    पावसाची नोंद – 1187.00 mm पाणी पातळीती वाढ – +1.313 mtr एकूण पाणी पातळी – 205.68 mcm सध्याच्या साठा – 151.85 mcm विसर्ग

    तानसा धरण

    पावसाची नोंद – 82.00 mm पाणी पातळीती वाढ – 1282.00 mm एकूण पाणी पातळी – 0.747 mtr सध्याच्या साठा – 127.55 mcm विसर्ग

    वैतरणा धरण

    पावसाची नोंद – 86.00 mm पाणी पातळीती वाढ – 1144.00 mm एकूण पाणी पातळी -202.10 mcm सध्याच्या साठा – 103.840 mcm विसर्ग

  • 13 Jul 2022 09:27 AM (IST)

    satara : ठोसेघरचा धबधबा पहायला पर्यटकांची गर्दी

    साताऱ्या पासून अवघ्या २५ किलो मीटर वर असणाऱ्या ठोसेघरचा धबधबा पहायला जिल्हयातुन पर्यटक हजेरी लावत आहेत सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे वैशाख वणव्यात होरपळून निघालेली सृष्टी आता संततधार पावसामुळे बहरून आली आहे. हिरवाईचा शालू पांघरलेली धरती पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.  डोंगरदर्‍यांतून खळखळणार्‍या छोट्या धबधब्यांमध्ये पर्यटक आनंद लुटत आहेत.हिरवाईचा शालू अन् धुक्याची दुलई पांघरलेला रम्य परिसर, ऊन-पावसाचा खेळ, फेसाळलेले धबधबे, असा हा सृष्टिसौंदर्याचा रम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी ठोसेघर परिसरात पर्यटक गर्दी करु लागले आहेत. ठोसेघर परिसरात धबधबा पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरी केल्यामुळे या ठिकाणी या गॅलरीत उभे राहून पर्यटक मोठा धबधबा आणि छोटा धबधब्याचा आनंद घेत आहेत.. पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हे दोन्ही धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत… पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धबधबा परिसरात सुरक्षारक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे… या ठिकाणी येणाऱ्या हुल्लड बाज पर्यटकांवर देखील सातारा पोलीस कारवाई करत आहे

  • 13 Jul 2022 09:15 AM (IST)

    palghar rain update : पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यात  सर्वाधिक पावसाची नोंद वाडा तालुक्यात 149.00 मी मी ची नोंद करण्यात आली आहे

    पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल दिनांक 13/07/2022

    1. 1)वसई:- 38.00 मी मी
    2. 2)जव्हार:- 126.66 मी मी
    3. 3) विक्रमगड:- 109.50 मी मी
    4. 4) मोखाडा:- 97.00 मी मी
    5. 5) वाडा :-  149.00 मी मी
    6. 6)डहाणू :-  72.92 मी मी
    7. 7) पालघर:- 113 मी मी
  • 13 Jul 2022 09:11 AM (IST)

    andheri subway : अंधेरीतल्या सबवेमध्ये पाणी साचायला सुरुवात

  • 13 Jul 2022 08:56 AM (IST)

    vasai rain update : वसई राजवलीच्या वाघरल पाडा या परिसरात दरड कोसळली आहे.

    वसई : वसई राजवलीच्या वाघरल पाडा या परिसरात दरड कोसळली आहे.

    दरड खाली 6 जण अडकले असून 4 जणांना रेस्क्यु करून बाहेर काढले आहे तर 2 जण, बाप लेक दरड खालीच दबलेले असल्याची माहिती आहे..

    वालीव पोलीस, वसई विरार महापालिका अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे..

  • 13 Jul 2022 08:51 AM (IST)

    mumbai rain update : हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील 3 दिवस पावसाचा इशारा

    1. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील 3 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे , पाऊसही वेगवान वार्यांसह पडत आहे
    2. पण मुंबईत अजूनही अनेक ठिकाणी पाणी नाही…
    3. अंधेरी सबवे, माटूंगा इथे पाणी भरलंय… हिंदमाता अद्याप पाणी नाही…
    4. बीएमसीच्या बाजूने सर्व काही सामान्य असल्याची माहीती …
  • 13 Jul 2022 08:50 AM (IST)

    pune rain update : जिल्ह्यात वाढत्या पावसामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

    जिल्ह्यात वाढत्या पावसामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

    शहरातील पुराचा धोका असलेली 23 ठिकाणं केली निश्चित तिथल्या नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा

    तर 10 ठिकाणच्या लोकांना स्थलांतरीत करावं लागणार अशीही ठिकाण केली निश्चित

    शहरात पडणाऱ्या पावसानं ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे नंतर कोणतीही परिस्थिती उद्भवू नये यासाठी ठिकाणं निश्चित करण्यात आलीत

    दोन चार दिवस पावसाचा जोर असाच राहिल्यस नागरिकांच स्थलांतर केलं जाण्याची शक्यता आहे..

  • 13 Jul 2022 08:48 AM (IST)

    mumbai rain live update : मुंबई सखल भागात पाणी साचायला सुरुवात

    1. मुम्बई मध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सखल भागात पाणी भरू लागले आहे.
    2. पाण्या भरलेले हे चित्र कुठल्या नदीचे किंवा नाल्याचे नाही, तर अंधेरी सबवेच्या आहे, ज्याचे आता नदीत रूपांतर झाले आहे,
    3. फक्त सबवे नाही तर येथील रस्तेही पाण्यात बुडालेले दिसत आहेत.
    4. सबवे मध्ये पाणी भरल्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूने बॅरिकेड्स लावून हा मार्ग बंद केला आहे.
    5. बीएमसीचे कर्मचारी पंपिंग मशिनच्या द्वारे भुयारी मार्गातील पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
  • 13 Jul 2022 08:47 AM (IST)

    dadar rain update : दादर चैत्यभूमी परिसरात मुसळधार पावसाळा सुरवात

    1. दादर चैत्यभूमी परिसरात मुसळधार पावसाळा सुरवात
    2. समुद्रात पूर्णपणे पांढरे धुक पसरले आहे…
    3. पावसाची तीव्रता वाढतच चालली असून वाऱ्या सह पाऊस पडत आहे…
  • 13 Jul 2022 08:46 AM (IST)

    bhandara rain update : 25 घरात  पुराचे पाणी शिरले असून गोंदेखारी गावात नदीचे स्वरूप

    भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातिल गोंदेखारी नाला ओवर फ्लो झाल्याने 25 घरात  पुराचे पाणी शिरले असून गोंदेखारी गावात नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे।काल आलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसांडून वाहत असल्याने तुमसर तालुक्यातिल चांदपुर तलावाच्या प्रवाहाचे पाणी सरळ गोंदेखारी नाल्यात आल्याने गोंदेखारी नाल्याला पुर आला।त्यामुळे नाल्याजवळील 25 घरात पुराचे पाणी शिरले आहे।नाल्यावरुण 3 फिट पानी तर गावात 1 ते दीड फुटावर पानी वाहत आहे।यामुळे गावात नदीचे  स्वरूप प्राप्त झाले आहे।
  • 13 Jul 2022 08:39 AM (IST)

    maval rain update : मावळात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं इंद्रायणी नदीला पूर आलाय

    -मावळात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं इंद्रायणी नदीला पूर आलाय

    -इंद्रायणी नदीच्या पुलावरून वाडीवळे,कामशेत येथील नागरिक जीवघेणा प्रवास करतायेत

    -पूल पाण्याखाली गेलाय तरी दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने वाडीवळे ग्रामस्थ,शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि कामगारांना याच पुलाचा वापर करावा लागतोय या पावसाच्या पाण्याने आठ गावांचा संपर्क तुटलाय तर अन्य गावांची दळणवळण यंत्रणा ठप्प झालीये

    -उंचीने कमी असल्याने पुलावरून इंद्रायणी नदीच पाणी जातंय, त्यामुळं जीव मुठीत घेऊन आठ गावातील नागरिकांना प्रवास करावा लागतोय.

  • 13 Jul 2022 08:38 AM (IST)

    nagpur rain update : नागपूर शहराला पाणी पुरवठा करणारा गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो

    – नागपूर शहराला पाणी पुरवठा करणारा गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो

    – गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं गोरेवाडा तलाव पूर्ण क्षमतेने भरला

    – तलावाच्या गेट क्रमांक 1 आणि 3 मधून पाण्याचा विसर्ग सुरू

    – मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहताहेत

    – धरण आणि तलावातील पाणी साठ्यात वाढ

  • 13 Jul 2022 08:35 AM (IST)

    lonawala : लोणावळ्यात गेल्या 24 तासात 213 मिलिमिटर पाऊस, आत्तापर्यंत 1735 मिलिमिटर पावसाची नोंद

    -लोणावळ्यात गेल्या 24 तासात 213 मिलिमिटर पाऊस कोसळला आहे

    – तर 48 तासात 433 मिलिमिटर पाऊस बरसला आहे. आत्तापर्यंत 1735 मिलिमिटर पावसाची नोंद झालीये

  • 13 Jul 2022 08:29 AM (IST)

    ratnagiri rain update : रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते खड्डेमय झालेत

    रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते खड्डेमय झालेत. आठवडा बाजार ते काँग्रेस भवन पर्यंतच्या भागातील रस्त्याला मोठे खड्डे पडलेत. या ठिकाणाहून जाताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागतेय. विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच हा रस्ता करण्यात आला होता. आणि पावसाच्या सुरुवातीलाच त्याची दयनीय अवस्था झाली आहे.तरी संबंधित प्रशासनाने यावर वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

  • 13 Jul 2022 08:28 AM (IST)

    jalgaon rain update : हतनुर धरणाचे 18 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

    जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनुर धरणाचे 18 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 22 हजार 708 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मध्यप्रदेश, विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भरपूर जणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने धरणाचे 18 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे .

  • 13 Jul 2022 08:25 AM (IST)

    pune timkar dam : पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं टेमघर धरण यंदा 100 टक्के भरणार

    पुणे शहराला पाणी पुरवठा करणारं टेमघर धरण यंदा 100 टक्के भरणार

    धरणाची 75 टक्के गळती रोखण्यास आल यश

    दोन वर्ष कोरोना काळात करण्यात आलं काम

    यंदा 100 टक्के धरण भरणार त्याची क्षमता ही 3.27 टीएमसी इतकी आहे

    2019 पर्यंत धरणं हे 75 टक्केच भरलं जायचं

    यंदा मात्र ते 100 टक्के भरलं जाणार आहे…

  • 13 Jul 2022 08:25 AM (IST)

    Tapi River : तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आला सतर्कतेचा इशारा

    आज सात वाजता हतनुर धरणाचे 18 दरवाजे पूर्ण उघडले

    हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 22 हजार 708 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

    तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आला सतर्कतेचा इशारा

  • 13 Jul 2022 08:24 AM (IST)

    Hingoli Rain Update : हिंगोली-जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पाऊस

    1. हिंगोली-जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पाऊस
    2. जोरदार पावसा मुळे ओढे-नाले भरून वाहत आहेत
    3. अनेक गावांच्या जवळुन वाहणाऱ्या नाल्यांना पूर
    4. दुध उत्पादक शेतकरी शेतातून दूध आणण्यासाठी पुराच्या पाण्यातुन वाट काढत आहेत
  • 13 Jul 2022 08:23 AM (IST)

    Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी

    1. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी
    2. मुळशीत198 मी मी पावसाचा झाली नोंद
    3. ताम्हिणी घाटात 211 मी.मी इतका पडला पाऊस
    4. पुरंदर तालुक्यातील दावडीत 214 मी.मी इतक्या पावसाची झाली नोंद
    5. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं धरणसाठ्यातही मोठ्या प्रमाणावर वाढ झालीये.
  • 13 Jul 2022 07:50 AM (IST)

    पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम, जिल्ह्यातील 54 बंधारे पाण्याखाली

    पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम

    पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचली 35 फूट दोन इंचावर

    इशारा पातळीकडे वाटचाल करणाऱ्या पंचगंगेची ड्रोन दृश्य tv9 च्या प्रेक्षकांसाठी

    कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप

    जिल्ह्यातील 54 बंधारे पाण्याखाली

  • 13 Jul 2022 07:34 AM (IST)

    गडचिरोली-गोदावरी आणि प्राणहीता नदीला पुराचा मोठा धोका

    गडचिरोली-गोदावरी आणि प्राणहीता नदीला पुराचा मोठा धोका

    सिरोंचा तालुक्यातील बारा गावे तातडीने रिकामे करण्याचे प्रशासनाचे निर्देश…

    तेलंगणातील श्रीपाद येल्लमपल्ली प्रकल्पातुन साडे पाच लाख 22 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु…

    गोदावरी आणि प्राणहीता नदीच्या पुर पातळीत वाढ होत आहे..

    या पाश्र्वभूमीवर गोदावरी आणि प्राणहीता नदीकाठावरील 12 गावे तातडीने रिकामे करुन नागरीकांना सुरक्षीत स्थळी हलवण्याचे आदेश जारी

  • 13 Jul 2022 07:24 AM (IST)

    पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ.

    पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ.

    धरण क्षेत्रात संततधार पावसामुळे अप्पर धरणाचा जलसाठा 63 टक्क्यांवर.

    सतत पाऊस सुरू असल्याने आठवडा भरात जलसाठ्यात 17 टक्क्यांनी वाढ

    मागील चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सुरू आहे संततधार पाऊस.

  • 13 Jul 2022 07:20 AM (IST)

    वसई विरार मध्ये सकाळ च्या वेळेत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे..

    वसई विरार मध्ये सकाळ च्या वेळेत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे..

    रात्रभर रिमझिम पाऊस पडला आहे..

    संपूर्ण परिसरात आभाळ भरून आले असून काळेकुट्ट झाले आहे..

    सध्या सकल भागातील रस्त्यात कुठेही पाणी साचलेले नाही..

    सकाळी 6 वाजल्यापासूनच जोरदार पाऊस सुरू झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकर्मण्याची मात्र मोठी तारांबळ उडाली आहे…

    विरार पूर्व मनवेलपाडा तलाव समोरची सकाळी 6.30 वाजताची दृश्य

  • 13 Jul 2022 07:19 AM (IST)

    नांदेडमध्ये पाऊस सुरु

    नांदेड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून असंख्य रस्ते हे पाण्याखाली बुडाले आहेत, किनवट तालुक्यातील धामणदरी इथल्या ग्रामस्थांना तर मानवी साखळी बनवत घर गाठावे लागतंय. धामणदरी गावाला येजा करण्यासाठी रस्ताच नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून आहे त्याच पांदण रस्त्यातून प्रवास करावा लागतोय. नांदेडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यात अनेक जागी अतिवृष्टीची नोंद झालीय.

  • 13 Jul 2022 07:18 AM (IST)

    सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू आहे

    सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू आहे .रात्रभर रिमझिम पासून सुरू राहिल्याने सध्या कोठे ही पावसाचे पाणी साचले नाही .

  • 13 Jul 2022 07:18 AM (IST)

    वाशिम जिल्ह्यात रातभर रिमझिम पावसाच्या सरी नंतर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू

    वाशिम जिल्ह्यात रातभर रिमझिम पावसाच्या सरी नंतर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू….

  • 13 Jul 2022 06:21 AM (IST)

    खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला, नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी

    खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्ग कमी करून सकाळी १० हजार २४६ क्युसेक करण्यात आलाय

    पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता

    नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Published On - Jul 14,2022 6:00 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.