Nagar Panchayat Election Results 2022 LIVE : कुठे गुलाल कुणाचा? निवडणूक निकालाच्या वेगवान अपडेट वाचा
Maharashtra Nagar Panchayat Election Result 2022 Live Updates: राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकीची दोन टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे.
राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची (Maharashtra Local Body Election Result) रणधुमाळी पाहायला मिळतेय. या निकलांमध्ये राष्ट्रवादी नंबर वन, भाजप दोन, काँग्रेस तीन तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीने 27, भाजप 24, काँग्रेस 22, शिवसेना 17 नगरपंचायतीवर विजय मिळवला आहे. विजयानंतर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. सांगलीतील कवठेमहाकाळमध्ये रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. येथे त्यांनी निवडणूक जिंकली. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जळगावातील बोदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय होती. मात्र जळगाव बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. एकनाथ खडसेंना शिवसेनेने धोबीपछाड दिलाय.
Non Stop LIVE Update