Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हेंटिलेटर्स बेड संपले, एका बेडवर दोन रुग्ण, जमिनीवर झोपवून ऑक्सिजन, नागपूरची विदारक स्थिती

नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात व्हेंटिलेटर्स बेड संपले आहेत. एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. Nagpur patient no bed issue

व्हेंटिलेटर्स बेड संपले, एका बेडवर दोन रुग्ण, जमिनीवर झोपवून ऑक्सिजन, नागपूरची विदारक स्थिती
नागपूरमधील आरोग्य यंत्रणेची विदारक स्थिती
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 1:51 PM

नागपूर:  नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील विदारक स्थिती समोर आली आहे. बेड नसल्याने मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या पोर्चमध्ये जमिनीवर झोपवून ऑक्सिजन दिले जात आहे. एका बेडवर कोरोनाच्या दोन रुग्णांवर सुरु उपचार आहे. गेल्या 10 दिवसांपासून मेडिकलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मेडिकलच्या बाहेरही फुटपाथवर रुग्ण झोपले. नागपुरातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून जिल्ह्यातील व्हेंटीलेटर्स बेड संपले आहेत. (Maharashtra Nagpur Corona Update Ventilators, oxygen bed full patient sleep on flour and taking treatment)

पोर्चमध्ये जमिनीवर झोपवून उपचार

नागपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ताण आल्याचं चित्र आहे. नागपूरमधील मेडिकल रुग्णालयामध्ये रुग्णांना ट्रामा केअर सेंटरच्या पोर्चमध्ये झोपवून उपचार करण्याची वेळ ओढावली आहे.  तर एका बेडवर दोन दोन रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. तर मेडिकल रुग्णालयाच्या बाहेर देखील रुग्ण झोपल्याचं चित्र आहे.

10 दिवसांपासून क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार

नागपूर जिल्ह्याचा देशातील  सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण असणाऱ्या टॉप टेनमध्ये समावेश आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागपूरच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे.नागपूरच्या मेडिकल रुग्णालयामध्ये गेल्या 10 दिवसांपासून क्षमेतपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नागपूरच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आल्याचं चित्र आहे.

रुग्णाल्याच्या यंत्रणेवर ताण आल्यानं  डॉक्टर आक्रमक

नागपूर मेडिकल कॅालेजच्या निवासी डॅाक्टरांनी रविवारी क्षमतेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार करावे लागत असल्यानं धरणे आंदोलन केलं आहे. मेडिकल रुग्णालयामध्ये गेल्या 10 दिवसांपासून क्षमतेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याने डॅाक्टरांनी धरणे आंदोलन केले. मेडिकलचे 40 निवासी डॅाक्टर धरणे आंदोलनाला बसले होते. डॅाक्टरांची अडचण प्रशासनाला कळावी म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले होते.

नागपूरची कोरोनाबाधितांची संख्या 3 लाखांवर

नागपूरमधील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 2 लाख 84 हजार 258 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 लाख 21 हजार 387 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 58 हजार 507 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 4 हजार 318 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या:

स्मशनात जागा नाही, त्यात पुरलेले मृतदेह कुत्र्यांनी बाहेर काढले, बुलडाण्यातील संतापजनक प्रकार

कोरोना विस्फोटक परिस्थिती मे अखेरपर्यंत राहणार, माणसं मरत असताना उत्सव कशाला?; वडेट्टीवारांचा घणाघात

(Maharashtra Nagpur Corona Update Ventilators, oxygen bed full patient sleep on flour and taking treatment)

कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.