Maharashtra NCP Political Crisis | शरद पवार यांनी नाही सांगितली, तीच गोष्ट अजित पवारांनी केली मेळाव्यात

Maharashtra NCP Political Crisis | अजित पवार यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या ठिकाणी एक गोष्ट दिसून आली. शरद पवार यांनी त्यांना एक गोष्ट करु नको म्हणून सांगितली होती, तीच गोष्ट त्यांनी केली.

Maharashtra NCP Political Crisis | शरद पवार यांनी नाही सांगितली, तीच गोष्ट अजित पवारांनी केली मेळाव्यात
NCP Ajit pawar group
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 1:47 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांचे आज मुंबईत मेळावे सुरु आहेत. अजित पवार यांना मानणाऱ्या गटाचा बॅण्ड्रा MET येथे, तर शरद पवार यांच्या गटाचा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मेळावा सुरु आहे. दोन्ही बाजू आज शक्तीप्रदर्शन करुन आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्ष संघटना, जिल्हा, तालुका स्तरावरील कार्यकर्ते, नेते कोणाच्या बाजूने आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत.

सध्याच्या घडीला आमदारांची संख्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने आहे. विधिमंडळातील जवळपास 32 आमदार अजित पवार यांच्या सभास्थळी उपस्थित आहेत. शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांची संख्या 14 आहे.

दोन्ही ठिकाणी भाषणं

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावर दोन्ही बाजूंनी आपला दावा सांगितला आहे. दोघांनी परस्परांचे पदाधिकारी हटवून तिथे नव्याने नियुक्ती केली आहे. विधिमंडळापासून पक्षसंघटनेत नव्याने पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईत दोन्ही ठिकाणी दोन्ही गटाच्या नेत्यांची भाषण सुरु आहेत. जे सांगितलं करु नको, तेच केलं

अजित पवार यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याच्या ठिकाणी एक गोष्ट दिसून आली. शरद पवार यांनी त्यांना एक गोष्ट करु नको म्हणून सांगितली होती, तीच गोष्ट त्यांनी केली. माझा फोटो वापरायचा नाही, असं शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना सांगितलं आहे. पण आज MET येथे सुरु असलेल्या मेळाव्यात एक भव्य बॅनर लावला असून त्यावर शरद पवार यांचा फोटो आहे. हीच गोष्ट अजित पवार यांना नको म्हणून शरद पवारांनी सांगितली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.