Maharashtra News Live Update : आजच्या महत्वाच्या घडामोडी…
आजच्या महत्वाच्या घडामोडी...
मुंबई : आज 26/11. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या भळभळत्या जखमांच्या स्मृतींचा दिवस… या घटनेला 14 वर्षे पूर्ण झाली. या घटनेत प्राण गमावलेल्या लोकांना आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच राजकीयदृष्ट्याही आजचा दिवस महत्वाचा आहे. एकनाथ शिंदे आपल्या मंत्री आणि आमदारांसोबत गुवाहाटीला जाणार आहेत. या सगळ्याचे अपडेट वाचा एका क्लिकवर….
LIVE NEWS & UPDATES
-
विक्रम किर्लोस्कर यांचं निधन
टोयोटा किर्लोस्कर ग्रुपचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन
वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
टोयोटा कारला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलं
-
WhatsApp वरील तुमचा डेटा सुरक्षित आहे का?
Marathi News LIVE Update
WhatsApp वरील तुमचा डेटा सुरक्षित आहे का?
WhatsApp च्या इतिहासातील सर्वात मोठी हॅकिंग
जगभरातील 50 कोटी युझर्सचा डेटा चोरीला
तुमची महत्वाची माहिती कंपन्यांना विक्री होण्याची भीती
-
-
डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार करा
Marathi News LIVE Update डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार करा
वेगवान गोलदांज मॅक्ग्रे याची मागणी
चेंडू कुरतडल्याप्रकरणात वॉर्नरवर प्रतिबंध
2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सामन्यात केला होता खोडसाळपणा
-
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भारताला धमकी
Marathi News LIVE Update
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भारताला धमकी
आशिया कपसाठी पाकिस्तानात आला तर ठीक
अन्यथा आमच्या संघाविनाच खेळा विश्वकप
आगामी विश्वकप भारतात होणार
पीसीबीचे रमीज राजा यांचा रडका डाव
-
देवेंद्र जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांच्या बुलढाण्यातील सभेतील प्रमुख मुद्दे
देवेंद्र फडणवीस यांचा ऑडिओ ऐकवला. मध्यप्रदेशात वीज बिल माफ करावे. सावकारी पद्धतीने वीज बिल वसूल केले जात आहे. काय बोलत होते. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्र जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा.
या ठिकाणी आम्हाला आनंद होत आहे. त्या ठिकाणी मध्यप्रदेशने वीज बिल माफ केले. या ठिकाणी त्या ठिकाणी करता ना… आता आव्हान आहे. तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि मी या ठिकाणी आहे. आता वीज बिल माफ करून दाखवा.
आता होऊनच जाऊ द्या या ठिकाणी आणि त्या ठिकाणी. आम्ही कर्जमाफी केली होती. तुम्ही कर्जमाफी केली. कुणी किती केली त्यावर बोलायला या मैदानात. मी चर्चेला तयार आहे. फक्त पश्चिम विदर्भात थोडी बाकी होती.
-
-
आम्ही कर्जमाफी करणार होतो. पण या रेड्यांनी शेण खाल्लं: उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांच्या बुलढाण्यातील सभेतील प्रमुख मुद्दे
आम्ही कर्जमाफी करणार होतो. पण या रेड्यांनी शेण खाल्लं. कुणाचं नुकसान झालं. शेतकऱ्यांचंच. मी मुख्यमंत्री असतो तर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ दिली नसती. यांना शिवसेना फोडली असं वाटतंय. पण शिवसेना म्हणजे मेलेलं गाढव नाहीये. ही जिवंत रसरसती माणसं आहेत. शिवसेना तुम्ही कितीही फोडा. फोडून फोडून दमाल तुम्ही. पण माझी शिवसेना तुम्हालाच फोडून टाकून दिल्याशिवया राहणार नाही. निवडणवुका लांबवत आहेत.
शिवसेनेवर घाव घातल्यानंतर मी तुमच्या भरवश्यावर उभा आहे. पण नुसता तुमच्या भरवश्यावर माझं दुख सांगायला आलो नाही. तर तुमच्या संकटात तुमच्यासोबत आहे हे सांगण्यासाठी आलो आहे. आत्महत्या करू नका. शिवरायाचं नाव घेतो. शिवरायांनी लढायला शिकवलं आहे. लंडनमधून तलवार आणणार असं हे म्हणाले. तलवार आणून चालणार नाही. त्यासाठी मनगटत हवं. ते पोलादी मनगट माझ्या मर्द मावळ्यात आहेत. एका बाजूने शिवरायांचं नाव घेतात दुसऱ्या बाजूला कोश्यारी महाराजांचा अवमान करतात. महाराजांचा अपमान कराल तर आम्ही एक तर विराट मोर्चा काढू किंवा आम्ही महाराष्ट्र बंद केल्याशिवया राहणार नाही.
तोतये बनावट गद्दार आहेत. त्यांचं कर्तृत्व शून्य आहे. ते तुम्हाला फसवत आहे. भाजपवाले तुम्हाला सांगतील. तुमच्यातला मुख्यमंत्री केला. हा मुख्यमंत्री तुम्हाला मान्य आहे का. दिवाळीत एक युट्यूबवर व्हिडीओ पाहिला. दिवाळीत मुख्यमंत्री रमले शेतीत. पाहिला का व्हिडीओ. पूर्वी भिंतीवर लिहिलेलं असायचं नारूचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा. आता तसं म्हणायचं का?
देशात दुसरा हेलिकॉप्टरने शेतीत जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा. हेलिकॉप्टर शेतात उतरतं. आणि तुम्ही शेतात पायी जाताना. दिवसा वीज असते की नसते. मग रात्रीचं जाता. हा आमचा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातो. माझं त्यांच्या सुबत्तेबद्दल काही म्हणणं नाही. पण महाराष्ट्रातील शेतकरी असा कधी होणार हा सवाल आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कधी तरी हेलिकॉप्टरने जाणार का. तुम्ही ज्योतिषाकडे जाता. आमचा शेतकऱ्याच्या हातावरच्या रेषा पुसल्या त्याने कुणाला हात दाखवायचा.
तुम्ही पत्रकारांना घेऊन तुमच्या शेतात गेला. तसाच तुम्ही अतिवृष्टी झालेल्या शेतात पत्रकारांना का घेऊन गेला नाही. मला म्हणत होते मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही. तेव्हा करोना होता. माझ्या मानेचं ऑपरेशन झालं. पण तरीही तुमचं काम केलं. तुम्ही विदर्भात या, मराठवाड्यात या. तुम्ही एकदम घरातून बाहेर पडला थेट गुवाहाटीला जाता. शेतकऱ्यांची हालत सांभाळायची कुणी
-
उद्धव ठाकरे यांचा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी सवांद मेळावा थोड्याच वेळात
शेतकरी मेळाव्याला जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक व शेतकरी उपस्थित
शिवसेनेतील मोठया फूटीनंतर पहिल्यादाच उद्धव ठाकरे विदर्भात
शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार
-
अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन
ते ७७ वर्षांचे होते
पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांची माहिती
त्यांचे पार्थिव दुपारी ४ वाजता बालगंधर्व मंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल
संध्याकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार होणार
-
विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरांचे शेवटचे प्रयत्न सुरू
2.30 वाजता हॉस्पिटल प्रशासन देणार माहिती
गोखलेवर शर्थीचे उपचार सुरू आहेत
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार गुवाहाटी विमानतळावर दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांचं पारंपारिक पद्धतीने स्वागत
आसाम सरकारकडून शाल देऊन सर्व आमदार आणि खासदारांचं स्वागत
विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
-
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 42 गावांचा पाणी प्रश्न पेटला
जत तालुक्यात झळकले कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री बोमय्या यांचे पोस्टर
तिकुंडी ग्रामस्थांनी लावले कर्नाटक सरकारची पोस्टर, मुख्यमंत्री बोमय्या यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
-
बाळासाहेब आंबेडकर, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येऊन नवीन समीकरण तयार होत असेल तर स्वागत: पुरुषोत्तम खेडेकर
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यानंतरची उद्धव ठाकरे यांच्यासोबतची ही पहिली सदिच्छा भेट आहे
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीला भविष्यात मोठं यश मिळणार
राजकीय समीकरण सतत सुरू असतात. विरोधकाना दूर ठेवण्यासाठी समीकरण सुरू असतात
गुवाहाटी दौरा तो त्यांचा विषय आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. ते आज तिकडे गेले कदाचित उद्या ते इकडे येऊ शकतात.
-
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा बारामती दौरा
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये जनता दरबाराचे आयोजन
अजितदादा जाणून घेताहेत नागरीकांच्या समस्या
रांगेत उभ्या असलेल्या नागरीकांकडे जाऊन अजितदादांकडून समस्यांची सोडवणूक
अजितदादांना भेटण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी
-
महाराष्ट्र कर्नाटक बससेवा पुन्हा एकदा सुरू
महाराष्ट्र कर्नाटक बससेवा पुन्हा एकदा सुरू
दोन्ही राज्याच्या परिवहन विभागांचा निर्णय
सीमा प्रश्नाचा वाद काहीसा निवळल्यानं बस सेवा पुन्हा एकदा सुरू
बस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा
-
विक्रम गोखले यांची तब्येत पुन्हा खालावली
विक्रम गोखले व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची तब्येत खालावली आहे
रक्तदाब सुरळीत करण्यासाठी उपचार सुरू आहेत. शिरीष याडकीकर यांची माहिती
-
तब्बल पाच दिवसानंतर कोल्हापूर मार्केट यार्डातील गूळ सौदे सुरू
गुळाला मिळाला 3400 ते 3600 पर्यंतचा भाव
योग्य दरासह कर्नाटक गुळावर बंदी आणण्यासाठी गूळ उत्पादकांनी पाडले होते सौदे बंद
कर्नाटकी गुळाला आजपासून कोल्हापूर मार्केटमध्ये बंदी
मागण्या मान्य झाल्याने गूळ उत्पादकही एक पाऊल मागे
ज्यादा दर मिळाल्याने उत्पादकांमध्ये समाधान
-
विद्यार्थी आणि प्राध्यापकांना आता ध्यानाचे धडे
यूजीसीकडून विद्यापीठ आणि महाविद्यालयांना सूचना
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उपक्रम म्हणून हर घर ध्यान हे अभियान राबणावर
आर्ट ऑफ लिव्हिंगकडून ध्यानाचे धडे घ्यावे लागणार
एक तासाच्या अभ्यासक्रमाची निर्मिती श्री श्री रविशंकर आणि आर्ट ऑफ लिव्हिंगमधील प्रशिक्षकांनी केली आहे
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक मतदानाला सुरुवात
मराठवाड्याच्या 4 जिल्ह्यातील मतदान केंद्रावर झाली मतदानाला सुरुवात
4 जिल्ह्यातील 36 हजार 800 मतदार करणार आज मतदान
4 जिल्ह्यातील 83 मतदान केंद्रावर मतदान सुरू
अधिसभा पदवीधरच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू
एकूण 53 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उभे
-
मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री गुवाहाटीच्या मार्गावर, अब्दुल सत्तार मात्र नाशिकमध्ये
मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री गुवाहाटीच्या मार्गावर
कृषीमंत्री अब्दुल सत्तार मात्र नाशिकमध्ये
नाशिकच्या कृषिथॉन कार्यक्रमाला लावणार हजेरी
सत्तारांच्या गैरहजेरीची मात्र चर्चा
-
कर्नाटकच्या गुळाला कोल्हापूर मार्केट यार्डमध्ये बंदी
कर्नाटकच्या गुळाला कोल्हापूर मार्केट यार्डमध्ये बंदी
कर्नाटकी गुळ कोल्हापुरी ब्रँड म्हणून विकणाऱ्यांवर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे बाजार समितीला आदेश
भरारी पथक नेमण्यासह गुळाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
Published On - Nov 26,2022 8:21 AM