Gautami Patil : सबसे कातील, गौतमी पाटील आज नाशकात, तोबा गर्दी होण्याची शक्यता
सबसे कातील गौतमी पाटील म्हणून संपूर्ण राज्यातील जनतेला परिचित असलेली गौतमी आज नाशिकमधील निफाड येथे येत आहे. तिच्या लावणी महोत्सवयाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : सबसे कातील असं म्हंटल्यावर आपसूकच गौतमी पाटील ( Gautami Patil ) असं नाव ज्याच्या तोंडून बाहेर पडणार नाही असा माणूस सध्या शोधून सापडणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात ( Maharashtra News ) गौतमी पाटील हे नाव परिचित झाले आहे. गौतमी पाटील या नृत्यांगणेने ( Gautami Patil Dance ) महाराष्ट्रातील तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. गौतमी पाटील ज्या कार्यक्रमाला असते तिथे तरुणाईची तूफान गर्दी होत असते. काही ठिकाणी तर चेंगराचेंगरी झाली आहे. त्यात मागे एकाचा मृत्यूही झाला होता. इतकच काय तर गौतमी पाटील स्टेजच्या खालून दिसत नाही म्हणून झाडावर बसून तरुणांनी लावणी पहिली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात गौतमी पाटील ही नृत्यांगना सर्वांनाच परिचित आहे. याशिवाय गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वाद होण्याच्या घटनाही यापूर्वी समोर आल्या आहे.
रील स्टार, नृत्यांगना म्हणून परिचित असलेली गौतमी पाटील ही नाशिकमध्ये आहे. गौतमी पाटील हिची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इतकंच काय तर अनेकदा तिने केलेल्या नृत्यावरून वादही उभा राहिला आहे. तरी देखील गौतमी पाटील हिची मागणी कमी झालेली नाही.
गौतमी पाटील ही आज नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे येणार आहे. रायगड ग्रुपच्या वतीने गौतमी पाटीलचा लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे गौतमी पाटीलच्या डान्सवर अनेकजण जीव ओवाळून टाकतात त्यामुळे आज निफाडमध्ये तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे.
रायगड ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेला लावणी महोत्सव हा निफाड मार्केट यार्ड परिसरात होणार आहे. गौतमी पाटीलचा लावणी महोत्सव पाहण्यासाठी तोबा गर्दी होण्याची शक्यता असल्याने तिकीटही ठेवण्यात आले आहे.
200, 500 आणि एक हजार रुपये असा लावणीच्या तिकीटाचा दर ठरविण्यात आला आहे. सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. निफाडमध्ये गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी मोठी गर्दी होणार असल्याने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नृत्यांगना गौतमी पाटील ही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही दिवसांपासून चर्चेत असलेली गौतमी आज निफाडला येणार असल्याने मोठ्या प्रमाणात तरुणाईची गर्दी सकाळपासूनच निफाडमध्ये दिसून येत आहे.
गौतमी पाटीलचा डान्स वादात अडकल्याने तिला अनेकांनी विरोध केला आहे. तरीही तीच्या लोकप्रियतेत कुठलीही कमी झाली नाही. उलट वाढ होऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रमांची मागणी वाढत चालली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलत असतांनाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला गेला होता. दरम्यान गौतमी पाटीलचा घुंगरु चित्रपट देखील येत आहे. त्यामुळे गौतमी पाटील हिची क्रेझ वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.
गौतमी पाटील हिने तीच्या डान्स आणि एक्स्प्रेशन्सने तरुणाईला वेड लावलं आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं. मानधन घेऊन गौतमी ठिकठिकाणी लावणीचे कार्यक्रम घेत आहे.