Maharashtra Oxygen Shortage : कर्नाटक सरकारने सांगली, कोल्हापूरचा ऑक्सिजन रोखला!, केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी

कर्नाटक सरकारने अचानकपणे सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा रोखला आहे.

Maharashtra Oxygen Shortage : कर्नाटक सरकारने सांगली, कोल्हापूरचा ऑक्सिजन रोखला!, केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी
oxygen tank
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 4:09 PM

कोल्हापूर : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. अशावेळी केंद्र सरकारकडून अन्य राज्यांमधून ऑक्सिजन पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेसही सुरु करण्यात आलीय. पण आज कर्नाटक सरकारने अचानकपणे सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा रोखला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Karnataka government cut off oxygen supply to Kolhapur, Sangli, Satara and Sindhudurg)

केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटक सरकारने रोखला आहे. कर्नाटकच्या बेल्लारीमधून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरु होता. पण कर्नाटक सरकारने तो आज बंद केलाय. सांगली जिल्ह्यातील ऑक्सिजन टँकर आज कर्नाटकमधून रिकामा परतला आहे. सांगली जिल्ह्याला रोजची 43 टन ऑक्सिजनची सध्या गरज आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झालाय.

केंद्राने हस्तक्षेप करावा – सतेज पाटील

दरम्यान, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलीय. सध्या तरी यात राजकारण वाटत नाही. मात्र, केंद्राने लवकरात लवकर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पाटील यांनी केलीय. त्याचबरोबर कोल्हापूरहून गोव्याला जाणारा ऑक्सिजन थांबवून तो कर्नाटकातून थेट गोल्यावा पुरवण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे

नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात (Nashik Zakir Hussain hospital) ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे ऑक्सिजनअभावी तब्बल 24 कोरोनाग्रस्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाचा चौकशी अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 24 कोरोनाग्रस्तांचा दुर्देवी मृत्यू झाला, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

चौकशी अहवाल सरकारकडे सादर

नाशिकमधील दुर्घटनेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीत ठेकेदारावर ठपका ठेवण्यात आला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नाशिकच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली. त्यामुळे 24 लोकांना दुर्देवाने प्राण गमवावा लागला, अशी माहिती चौकशी अहवालातून समोर आली आहे.

नाशिकमधील दुर्घटनेचा चौकशी अहवाल दाखल करण्यासाठी शासनाने 15 दिवसांच्या मुदत दिली होती. पण 15 दिवसांच्या मुदतीपूर्वीच हा अहवाल शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

लय भारी! गडकरींनी वर्ध्यातील कंपनीला मिळवून दिला रेमडेसिव्हीरच्या उत्पादनाचा परवाना

Corona Vaccine : लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंची महापालिका आयुक्तांशी चर्चा

Karnataka government cut off oxygen supply to Kolhapur, Sangli, Satara and Sindhudurg

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.