Maharashtra political crisis live : अजितदादांनी मला पुन्हा एकदा संधी दिली- रुपाली चाकणकर

| Updated on: Jul 17, 2023 | 10:54 AM

Maharashtra political crisis live updates : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या जोरबैठका सुरू आहेत.

Maharashtra political crisis live : अजितदादांनी मला पुन्हा एकदा संधी दिली- रुपाली चाकणकर
Maharashtra political crisisImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. त्यांच्या एका गटाने शिंदे सरकारला पाठिंबा दिला असून हा गट सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर त्यांच्या नऊ सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत राजकीय भूकंप झाला आहे. या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आता दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. तसेच दोन्ही गटाकडून पक्ष बांधणीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Jul 2023 05:49 PM (IST)

    अजितदादांनी मला पुन्हा एकदा संधी दिली- रुपाली चाकणकर

    रुपाली चाकणकर म्हणाली की, अजितदादांनी मला पुन्हा एकदा संधी दिली आहे. 15 महिन्यामध्ये मला पक्षाच्या व्यासपीठावर येऊ दिल नाही. खडकवासला मतदार संघावर माझा दावा कायम आहे, मी अजित पवारांकडे याबाबत मागणी करणार आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांशी आम्ही कायम राहणार आहे. महाविकास आघाडीत असताना आमच्यासोबत शिवसेना होती, मग आता भाजप आलं तर काय अडचण आहे.

  • 08 Jul 2023 05:34 PM (IST)

    मंत्री संजय राठोड यांच्या मतदार संघात उद्या उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता मेळावा

    शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या मतदार संघात उद्या उध्दव ठाकरे यांचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. दिग्रसच्या महेश कृषी बाजार समितीमध्ये कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी देखील सुरू आहे.

  • 08 Jul 2023 05:30 PM (IST)

    राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे पुण्यात करण्यात येणार जंगी स्वागत

    राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आज पुण्यात येणार आहेत. अजित पवार गटाकडून महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर चाकणकर आज पहिल्यांदाच पुण्यात दाखल होणार आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चाकणकरांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.

  • 08 Jul 2023 05:28 PM (IST)

    मंत्री छगन भुजबळ यांचे नाशिक शहरातील कार्यालयात आगमन

    मंत्री छगन भुजबळ यांचे नाशिक शहरातील कार्यालयात आगमन झाले आहे. समर्थकांची मोठी गर्दी ही बघायला मिळत आहे.  फटाके फोडून आणि हार घालून स्वागत करण्यात आले आहे.

  • 08 Jul 2023 05:03 PM (IST)

    फोडाफोडीच्या राजकारणात फडणवीसांची प्रतिमा मलिन – डॉ. राजू वाघमारे

    राष्ट्रवादीला समाविष्ट करून घेण्याचा निर्णय वरिष्ठांचा आहे. फडणवीसांची प्रतिमा महाराष्ट्राच्या फोडाफोडीच्या राजकारणात एवढी मलीन झाले की, त्यांना स्वत:चीच लाज वाटते. फडणवीस म्हणतायत राष्ट्रवादीला समावेश करून घेण्याचा वरिष्ठांचा निर्णय, कारण वरिष्ठांना कोणी विचारू शकत नाही. आपली प्रतिमा जपायची पण राष्ट्रवादीची लाज काढायची हा फडणवीसांचा डाव आहे.

  • 08 Jul 2023 05:01 PM (IST)

    शरद पवारांकडून जळगाव, धुळे, नंदुरबारला कमी महत्व

    शरद पवार हे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला कमी महत्व देत होते, असा आरोप कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी शरद पवार राज्यभर दौरा करणार आहेत. पुढच्या दोन दिवसात ते धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी सभा घेणार होते. परंतु ऐनवेळी त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. या विषयावर प्रश्न केला असता अनिल पाटलांनी हा आरोप केला. शरद पवारांचं काही प्लॅनिंग असेल, काही अंदाज असतील ते मला सांगता येणार नाहीत. हा दौरा का रद्द केला, हे त्यांनाच विचारलं पाहिजे. पुढच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना ज्या ठिकाणी महत्व द्यावंसं वाटतं असेल त्या ठिकाणी ते जातील, असंही अनिल पाटील म्हणाले.

  • 08 Jul 2023 04:55 PM (IST)

    भंडाऱ्यात शेततळ्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

    युवा शेतकऱ्याचा शेतातील शेततळ्यात पाय घसरून पडल्यानं पाण्यात बुडून मृत्यू झाला. भंडाऱ्यातील लाखांदूर इथं ही घटना घडली. भैरुदास गोटाफोडे असं मृतक शेतकऱ्याचं नावं आहे. सध्या खरीप हंगाम सुरू झाला असल्यानं ते शेतावर गेले असता ही घटना घडली.

  • 08 Jul 2023 04:54 PM (IST)

    भुजबळांच्या बालेकिल्ल्यात येवल्यात शरद पवार यांचे जंगी स्वागत

    विंचूर चौफुली येथे आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. 150 किलोचा जम्बो हार त्यांना जेसीबीच्या माध्यमातून घालून स्वागत करण्यात आळे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

  • 08 Jul 2023 04:53 PM (IST)

    मंत्रिमंडळाचा पुन्हा एक विस्तार बाकी आहे – सुधीर मुनगंटीवार

    आमची खाते काढून त्यांना द्यायची आहेत, म्हणून कदाचित खाते वाटपात वेळ होत असेल. किंवा मंत्रिमंडळाचा पुन्हा एक विस्तार बाकी आहे, त्यामुळे खाते वाटपात उशीर होत असेल.

  • 08 Jul 2023 04:52 PM (IST)

    कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं त्यांचं आहे – सुधीर मुनगंटीवार

    2014 पासून जे ठरले होते ते केले असते, तर सहकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांचा विश्वास राहिला असता. तुमच्यात सहकारी टिकवून ठेवण्याचे कौशल्य असते तर हे घडले नसते. तुम्ही भाजपवर आरोप का करता? तुम्ही देशहितासाठी काय केले? तुमच्या कृषिमंत्री कार्यकाळात 70 हजार शेतकऱ्यांच्या आत्म्यहत्या झाल्या आहेत. आता कितीही दौरा केला तरी काही होणार नाही. एकदा कार्यकर्त्या उत्साहाच्या भरात करतो. त्यात अनिल पाटील यांचा काय दोष आहे. अशी लहान मुलं दीड तास का उभे करता 5 मिनिट पहिले उभे करा, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यव्यस्था करा. तेच तर आपल्या देशाचे भवित्यव आहेत.

    कोविड काळात असे फिरले असते, तर कदाचित आमच्यासोबत एकनाथ शिंदे दिसले नसते. बच्चू कडू नाराज कुठे आहेत, पण त्यांचे म्हणणे बरोबर आहे. कोणीही मोठा नेता नाराज झाला की वाटोळं करतो. पंकजा मुंडे यांच्यासोबत माझे बोलणं झाले आहे. त्या अंतर्मुख होण्यासाठी 2 महिने सुट्टीवर जात आहेत. त्या राजकीय कार्य करणार आहेत. त्या मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत. अपात्रतेची नोटीस ठाकरे यांच्या आमदारांना गेली आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

  • 08 Jul 2023 04:44 PM (IST)

    अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नांदेड येथील ते 18 भाविक सुरक्षित

    नांदेड येथील 18 भाविक आणि त्यांच्यासोबत पुणे येथील 1 असे 19 भाविक नांदेड येथून मनमाड आणि पुढे मनमाडवरून जम्मू मार्गे अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. ते पहलगाम येथे पोचून पुढे 6 जुलै 2023 रोजी अमरनाथ यात्रेसाठी रावण झाले. परंतु खराब हवामानामुळे ते अमरनाथ गुफेपासून 6 किमी अलिकडे पंचतरणी येथे अडकून पडले आहेत. सध्या ते आर्मी कॅम्प मध्ये सुरक्षित आहेत. जिल्हा नियंत्रण कक्ष त्यांच्याशी सतत संपर्कात आहेत.

  • 08 Jul 2023 04:41 PM (IST)

    जी पद्धत अवलंबली आहे, ती सर्वोच्च न्यायालयानुसार आहे – ऊज्वल निकम

    जी पद्धत अवलंबली आहे, ती सर्वोच्च न्यायालयानुसार आहे. अर्थात त्याकरता सर्वोच्च स्पीकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे दोघांनाही नोटीस दिलेली आहेत. त्या नोटीसीद्वारे ते दोन्ही गटांचे म्हणणं विशेषतः व्हिपबद्दल व्हिप कुणाचा मानायचा आणि कुठले कागदपत्र, कुठला अधिकार त्यांच्याजवळ आहे. याबाबतीत आणि त्यानुसार मग आमदारांची अपात्रता होते की नाही हा दुय्यम प्रश्न आहे.

    व्हिप कुणाचा मानायचा राजकीय पक्ष आणि त्यासाठी कुणाचा व्हिप लागू होतो हे महत्त्वाचे आहे. यासाठी कोणती पद्धत त्यांनी अवलंबली हे महत्त्वाचे आहे. तोंडी पुरावा घ्यायचा की शपथपत्र जे आमदारांनी दिलेला आहे ते पाहिलं जाईल आणि मग निर्णय घेतला जाईल. जर तोंडी पुरावा ग्राह्य धरायचा आहे, तर मग त्यासाठी त्यांना प्रत्यक्षदर्शी तपासावे लागतील.

  • 08 Jul 2023 04:36 PM (IST)

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खेडमध्ये उपक्रम

    सध्या महाराष्ट्रमध्ये जे राजकारण सुरू आहे. त्याबाबत संतापाची लाट अनेक ठिकाणी दिसून येते. याच विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक सही संतापाची ही मोहीम राज्यभर राबवत आहे. कोकणात खेडमध्ये शिवाजी चौकात मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या माध्यमातून एक सही संतापाची ही मोहीम राबविण्यात आली.

  • 08 Jul 2023 04:34 PM (IST)

    घाटकोपरमध्ये घराचा स्लॅब कोसळला

    घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीतील हनुमान बिल्डिंगमधील घराचा स्लॅब कोसळला. रहिवासी सुरेखा घुगे यांनी इमारत धोकादायक असल्याची वारंवार तक्रार करुनही बिल्डरने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. स्लॅब कोसळल्याने घरातील साहित्यांचं मोठं नुकसान झालं. रहिवाशांकडून इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.

  • 08 Jul 2023 04:33 PM (IST)

    वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

    वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील अधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून बसचालकाने डेपोतच औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. बस चालक आणि वाहकांचे प्रश्न प्रशासना समोर परखडपणे मांडत असल्याने चालकाला सेवेतून बडतर्फची नोटीस दिली. संतप्त चालकाने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. वसई विरार महापालिकेच्या सातिवली परिवहन बस डेपोत आज दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली.

    या घटनेचा लाईव्ह मोबाईल व्हिडीओ समोर आला आहे. त्यात डेपो व्यवस्थापक शेरेकर यांना दोषी धरण्यात आले आहे. भीमराव रामचंद्र कासारे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या चालकाचे नाव आहे. महापालिका परिवहन ठेकेदार एस.एन.एन. या कंपनीने त्याला बडतर्फची आज ही नोटीस दिल्यानंतर चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

  • 08 Jul 2023 04:28 PM (IST)

    जनतेला आमचा निर्णय पसंत – छगन भुजबळ

    जनतेला अजित पवार आणि आम्ही घेतलेला निर्णय पसंत पडलेला आहे. मोठ्या प्रमाणात जनता आणि कार्यकर्ते स्वागताला उपस्थित होते. ज्यावेळी मला संधी मिळाली, त्यावेळी मी नाशिक जिल्ह्यात मोठे काम केलं आहे. यापुढे देखील सत्तेचा उपयोग शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य यांच्यासाठी करू. शरद पवार यांचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाल्यानंतर पक्ष उभारणीसाठी त्यांच्यासोबत उभा राहणारा मी पहिला नेता आहे. मी पहिल्यांदा त्यांच्या बरोबर होतो, त्यामुळे माझा पहिला नंबर आहे.

  • 08 Jul 2023 04:24 PM (IST)

    सहस्त्रकुंड धबधब्याच्या प्रवाहात वाढ

    नांदेड हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात पडलेल्या पावसानंतर आता सहस्त्रकुंड धबधब्याच्या प्रवाहात आज दुपारी वाढ झाली. त्यामुळे उद्याच्या रविवारी सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होईल असे चित्र आहे. सहस्त्रकुंड धबधब्याला तेलंगणा विदर्भ आणि मराठवाड्यातील पर्यटकांची आता गर्दी होईल असे चित्र आज निर्माण झालंय.

  • 08 Jul 2023 04:16 PM (IST)

    सोमवारी किंवा मंगळवारी केंद्रिय मंत्रिमंडळाचा विस्तार – सूत्र

    पुढच्या 72 तासांत केंद्रिय मंत्रिमंडळाचा विस्तार अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटाला एक आणि अजित पवार गटाला एक मंत्रीपद मिळणार अशी माहिती मिळते. सोमवारी किंवा मंगळवारी केंद्रिय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी माहिती मिळते.

  • 08 Jul 2023 04:12 PM (IST)

    बस फेल झालेल्या प्रवाशांना शरद पवारांची मदत

    शरद पवार यांनी ताफा थांबून महिलांना आणि लहान मुलांना ताफ्यांमधील गाड्यांमध्ये बसवले. नाशिकहून येवला दौऱ्यावर निघालेल्या शरद पवारांच्या माणुसकीचे दर्शन घडले. निफाड येथील पिंपळस गावाजवळ बंद पडलेल्या लाल परितीली प्रवाशांना शरद पवारांनी साथ दिली.

  • 08 Jul 2023 03:53 PM (IST)

    पवार बाबा की जय, शरद पवारांना चिमुकल्याची साद!

    अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी राज्यभर दौरा करणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे आज शरद पवार नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातील आंबेगाव तालुक्यातील ताराबाई निघोट या आजींनी शरद पवार यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला आणि शरद पवार यांना लढण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान ताराबाई यांच्या नातवाने शरद पवार यांच्यासोबत बोलताना पवार बाबा की जय चा नारा लगावला.

  • 08 Jul 2023 03:45 PM (IST)

    सांगली: आमदार नीलम गोरे यांचे पोस्टरला जोडे मारून निषेध

    मिरजेत आमदार नीलम गोरे यांचे पोस्टरला जोडे मारून निषेध. नीलम गोरे यांना प्रतीकात्मक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

  • 08 Jul 2023 03:30 PM (IST)

    बडतर्फची नोटीस दिल्यानंतर चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

    वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतून बडतर्फ केले असल्याने बस चालकाने पॉइझन पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. भीमराव रामचंद्र कासारे असे आत्महत्यांचा प्रयत्न करणा-या चालकाचे नाव आहे. महापालिका परिवहन ठेकेदार एस. एन. एन या कंपनीने त्याला बडतर्फची नोटीस दिल्यानंतर चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यात चालकाची प्रकृती गंभीर असून त्याला वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

  • 08 Jul 2023 03:20 PM (IST)

    गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेन वर आज सकाळ पासून प्रचंड वाहतूक कोंडी

    मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाही आहे. गुजरातहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेन वर आज सकाळ पासून प्रचंड वाहतूक कोंडी सुरू असून, वसई कामन ब्रिज पर्यंत 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तासनतास वाहनधारक वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडल्याने वाहनधाराकाना तीव्र मनस्ताप होत आहे. महामार्गावर वसई हद्दीत मालजीपाडा, सासूनवघर, वर्सोवा ब्रिज जवळ मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत, त्यामुळे खड्ड्यातून मार्ग काढत असताना ही वाहतूक कोंडी होत आहे. तसेच महामार्गाच्या आजूबाजूच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात मुंबईतील डेब्रिज, कचरा आणून माती भराव झाल्याने तुंगारेश्वर डोंगराचे पाणी ही।महामार्गावर साचत आहे. याकडे हायवे अथोरिटी आणि वसई विरार महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने याचा फटका वाहनधाराकाना बसत आहे.

  • 08 Jul 2023 03:06 PM (IST)

    इंदापूरमध्ये दोन युवकांवर धार-धार शस्त्राने वार

    इंदापूरमध्ये दोन युवकांवर धार धार शस्त्राने वार. इंदापूर शहरातील टेंभूर्णी नाका वरील घटना, 10 ते 12 जणांनी केला दोन युवकांवर प्राणघातक हल्ला. दोन जण गंभीर जखमी. केवल मखरे व विवेक मखरे गंभीर जखमी. हल्लेखोरांनी जखमींच्या गाडीचे ही केले मोठे नुकसान. हॉटेलचे बिल देण्याच्या वादातून झाली भांडण.

  • 08 Jul 2023 02:57 PM (IST)

    नाशिकमध्ये शरद पवार यांच्या भेटीसाठी गर्दी

    शरद पवार यांची भेट घेण्यासाठी नाशिकमध्ये मोठी गर्दी झाली आहे. रोहित मते या कार्यकर्त्याने शरद पवार यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. त्यात शरद पवार आमचे विठ्ठल असल्याचे म्हटले आहे. रक्ताने लिहिलेले पत्र घेऊन रोहित मते पवार यांच्या भेटीसाठी आला आहे. तो नाशिक जिल्ह्यातील विहितगाव येथील आहे.

  • 08 Jul 2023 02:47 PM (IST)

    संजय राऊत यांना शिंदे गटाकडून ऑफर

    संजय राऊत आमच्या गटात येत असतील तर आम्ही त्यांचा विचार करू, अशी ऑफर एकनाथ शिंदे गटाकडून देण्यात आली. एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य आहे, असे मानून संजय राऊत यांनी शिंदे गटात यावे, असे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटले आहे.

  • 08 Jul 2023 02:40 PM (IST)

    लोकशाहीत विरोधी पक्ष महत्वाचा – शरद पवार

    प्रफुल्ल पटेल यांनी माझ्या निवडीचा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे माझी नियुक्ती बेकायदेशीर आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष महत्वाचा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंदच आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

  • 08 Jul 2023 02:30 PM (IST)

    शरद पवार यांचा दावा

    शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांनाही नाशिकमधून लक्ष केले. प्रफुल्ल पटेल यांना आपण केंद्रात मंत्रिपद दिले. तीन वेळा खासदार केले. त्यानंतरही त्यांनी बंडखोरी केली. परंतु बंडखोरी करणारे सर्व जण पराभूत होतील, असा दावा शरद पवार यांनी केला. आपण वास्तूस्थिती मांडण्यासाठी राज्याचा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 08 Jul 2023 02:22 PM (IST)

    शरद पवार यांचा अजित पवारांवर पलटवार

    ‘न टायर्ड हूं, न रिटायर्ड…मे तो फायर हूं’ शरद पवार यांचा अजित पवार यांच्यावर पलटवार केला आहे. अजित पवार यांनी आता वय झाले, तुम्ही सल्ला देण्याचे काम करा, चुकले तर सांगा, असे म्हटले होते. त्याला नाशिकमधून शरद पवार यांनी उत्तर दिले.

  • 08 Jul 2023 01:56 PM (IST)

    अजिप पवार यांच्याकडून माझे भाजपचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते असा उल्लेख

    गडचिरोली येथे महाराष्ट्र सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे. या प्रसंगी अजित पवार यांनी गडचिरोलीच्या जनतेशी संवाद साधला. त्यांनी आपल्या भाषणात माझे भाजपचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते असा उल्लेख केला. सरकारने गडचिरोलीसाठी केलेल्या विकास कामांची त्यांनी माहिती दिली.

  • 08 Jul 2023 01:46 PM (IST)

    अजित पवार यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचे कौतुक

    नुकतेच सत्तेत दाखल झालेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. पवारांकडून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री असा करण्यात आला. ते गडचीरोलीत शासन आहल्या दारी या कार्यक्रमात बोलत आहेत.

  • 08 Jul 2023 01:36 PM (IST)

    गडचिरोलीत शासन आपल्या दारी कार्यक्रम

    शिंदे सरकारचा उपक्रम असलेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज गडचिरोली येथे पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित झाले आहे. अजित पवार यांनी पहिल्यांदाच या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

  • 08 Jul 2023 01:26 PM (IST)

    ढोल ताशांच्या गजरात शरद पवारांचे नाशिकमध्ये स्वागत

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभर सभा घेणार असल्याचे जाहिर केले आहे. विशेषतः राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांच्या मतदार संघात शरद पवार सभा घेणार आहेत. याच अनुशंगाने ते आज नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या समर्थकांनी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले आहे. तरूण कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

  • 08 Jul 2023 01:14 PM (IST)

    येवल्यामध्ये शरद पवार यांची सभा

    छगन भुजबळ यांचा गड मानल्या जाणाऱ्या येवला येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जाहिर सभा आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवार यांची पहिलीच जाहिर सभा आहे. सध्या शरद पवार यांचे नाशिकमध्ये आगमन झाले आहे. कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांचे भव्य स्वागत करण्यात येत आहे.

  • 08 Jul 2023 01:00 PM (IST)

    शरद पवारांनी आता पर्यंत अनेक धक्के पचवले, पण घरात घडलेला हा प्रकार वेदनादायी – हेमंत टकले

    शरद पवारांनी आता पर्यंत अनेक धक्के पचवले पण घरातून घडलेला हा प्रकार वेदनादायी असल्याचे वक्तव्य पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केलं आहे. तसेच अजित दादा गटाकडून राष्ट्रवादीच्या राज्यभरातील कार्यालयांवर दावा सांगणं योग्य नाही, असेही ते म्हणाले.

    अजित दादा गटाचे नेते तयार असतील तर आम्ही चर्चेला तयार, हा संघर्ष रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे त्यांनी नमूद केले.

  • 08 Jul 2023 12:47 PM (IST)

    गडचिरोलीत आज ‘शासन आपल्या दारी ‘ कार्यक्रम

    गडचिरोलीत आज ‘शासन आपल्या दारी ‘ कार्यक्रम पार पडत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यासाठी एकाच मंचावर उपस्थित आहेत.

  • 08 Jul 2023 12:45 PM (IST)

    राज्यातील राजकीय घडामोडींनी जनता मेटाकुटीला – अमित ठाकरे

    राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत, त्यामुळे इथली जनता मेटाकुटीला आली आहे, त्रासली आहे, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली आहे. या सगळ्या गोष्टींची लोकांच्या मनात चीड निर्माण झाली असून त्याचा विस्फोट होईल असेही ते म्हणाले.

    दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे हा प्रयत्न याआधी महाराष्ट्रात झाला होता पण त्याला काही यश मिळालं नाही. पण आता मनसे एकमेव पर्याय या सगळ्यांसमोर आहे आणि हा पर्याय निवडल्यानंतर लोकांच्या सगळ्या समस्या दूर होतील असं मला वाटतं. कारण सगळ्यांनी नैतिकता सोडली आहे फक्त एकच पक्ष मनसे, ज्याने कधीही आपली नैतिकता सोडली नाही आणि कुणासोबतही ते गेले नाहीत.

  • 08 Jul 2023 12:29 PM (IST)

    घोटी टोल नाक्यावर शरद पवार यांचे जोरदार स्वागत

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज येवल्यात सभा होणार असून त्या दिशेने निघालेल्या शरद पवार यांचे इगतपुरी येथील घोटी टोल नाक्यावर जोरदार स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले, तर स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना भाताचे वाण भेट म्हणून दिले.

    शरद पवार यांच्यासोबत अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, सुनील भुसारा, रोहित पवार आदी नेते उपस्थित. त्यांच्या स्वागतासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • 08 Jul 2023 12:23 PM (IST)

    येवल्यात एकीकडे शरद पवार तर नाशिकमध्ये छगन भुजबळांच शक्ती प्रदर्शन

    राष्ट्रवादीतील नेत्यांच्या बंडानंतर शरद पवारांची आज येवल्यात जाहीर सभा होणार आहे. तर पवारांना शह देण्यासाठी छगन भुजबळांच नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन होणार आहे. मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच ते नाशिक दौरा करणार.

    भुजबळांच्या स्वागतासाठी त्यांचे समर्थक नाशिककडे रवाना झाले असून त्यांनी जोरदार घोषणाबाी केली आहे. येवला तालुक्यातून जवळपास 2 हजार समर्थक नाशिककडे रवाना झाले.

  • 08 Jul 2023 12:10 PM (IST)

    पवार साहेबांचं माझ्यावर प्रेम, म्हणूनच त्यांची येवल्यात सभा – छगन भुजबळ

    शरद पवारांचं माझ्यावर जास्त प्रेम आहे, म्हणूनच ते आज येवल्यात सभा घेत आहेत, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.

    संजय राऊत यांनी आधी कुठूनतरी निवडून येऊन दाखवावं, असं आव्हानही भुजबळ यांनी दिलं आहे. छगन भुजळ कुठूनही निवडून येणार नाहीत, अशी टीका राऊतांनी केली होती, त्या टीकेला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

  • 08 Jul 2023 11:59 AM (IST)

    कोल्हापूर याठिकाणी घरात शिरून बिबट्याने केला श्वानांवर हल्ला

    पन्हाळा याठिकाणी बिबट्या आणि श्वानांची झटापट सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पन्हाळा येथील राज होळकर यांच्या श्वानांवर बिबट्याने हल्ला केला आहे. घरात शिरून बिबट्याने श्वानांवर हल्ला केल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

  • 08 Jul 2023 11:48 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणा दौऱ्यावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणा दौऱ्यावर आहेत. वारंगलमध्ये पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भद्रकाली मंदिरामध्ये मोदींनी पूजा केली आहे. 6 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांची उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आली आहेत. तेलंगणाचे योगदान देशासाठी महत्त्वपूर्ण… देशाच्या आर्थिक विकासात तेलंगणाचे महत्त्व अधिक आहे… असं वक्तव्य मोदी यांनी केलं आहे.

  • 08 Jul 2023 11:38 AM (IST)

    आषाढी एकादशी दरम्यान एसटीला मोठा फायदा; वारकऱ्यांच्या रूपाने एसटीला विठूराया पावला

    आषाढी एकादशी दरम्यान सांगली जिल्ह्यातील एसटीच्या दहा आगारांतून ३४८ बसेसच्या १४१८ फेऱ्या झाल्या. १ लाख ७२ हजार २४९ किलोमीटर बसेस धावल्या असून ६४ लाख ५६६२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी ६१ लाख १४०७४ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीपेक्षा २ लाख ९१ हजार ५८८ रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले. वारकऱ्यांच्या रूपाने एसटीला विठूराया पावला आहे.

  • 08 Jul 2023 11:27 AM (IST)

    शरद पवार आणि छगन भुजबळ समर्थकांमध्ये बॅनर वॉर

    नाशिकच्या पाथर्डी परिसरात समर्थकांच्या वतीने मोठ्या प्रमाणात फलकबाजी करण्यात आली आहे. बॅनरच्या माध्यमातून शरद पवार यांच्या समर्थकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरु आहे. शरद पवार यांच्या समर्थकांनी लावलेल्या फलकाच्या बाजूला भुजबळांचे पवारांपेक्षा मोठे फलक लावण्यात आले आहेत. शरद पवार आणि छगन भुजबळ दोनही नेते आज नाशिक दौऱ्यावर आहेत.

  • 08 Jul 2023 11:22 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर धुंवाधार पाऊस

    कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर धुंवाधार पाऊस झाला आहे. पंचगंगेची पाणीपातळी 18 फुटांवर पोहचली आहे. राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे पाण्याखाली आहेत. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. कोल्हापूरची तहान भागवणाऱ्या राधानगरी धरणात 35.56% पाणीसाठा…

  • 08 Jul 2023 11:11 AM (IST)

    कार्यालयातून शरद पवार यांचा फोटो काढणार नाही – धर्मराव बाबा आत्राम

    कार्यालयातून शरद पवार यांचा फोटो काढणार नाही असं वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीला आणखी मंत्रीपदं मिळतील. नवी इनिंग सुरु करत असल्यामुळे आनंद आहे. शिवाय अजित पवार यांच्या गडचिरोली दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचं वक्तव्य देखील धर्मराव बाबा आत्राम यांनी केलं आहे…

  • 08 Jul 2023 11:05 AM (IST)

    राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याला गुजरात हायकोर्टाचा नकार; काँग्रेसकडून मौन सत्याग्रह

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याला गुजरात हायकोर्टाने नकार दिल्यानंतर काँग्रेसकडून मौन सत्याग्रह केला जाणार आहे. 12 जुलै रोजी सर्व राज्यात गांधी पुतळ्यासमोर बसून एक दिवस मौन सत्याग्रह केला जाणार आहे. राहुल गांधी यांच्याबाबतची एकता दाखवण्यासाठी के सी वेणूगोपाल यांनी पत्र काढलं आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सत्याग्रह असणार आहे..

  • 08 Jul 2023 10:36 AM (IST)

    शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नार्वेकरांची नोटीस

    म्हणणं मांडण्यासाठी शिवसेना आमदारांना नोटीस

    शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नार्वेकरांची नोटीस

    १६ आमदारांविषयीचा निर्णय लवकर झाला पाहिजे – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

    १० व्या सुचीनूसार आमदार अपात्र होणार

    सेनेच्या ४० आमदारांना आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस

  • 08 Jul 2023 10:31 AM (IST)

    उद्धव ठाकरे गट आता मोकळा श्वास घेऊन काम करणार, कार्यकर्त्यांचा नीलम गोऱ्हे यांना टोला

    नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पुणे शहर उद्धव ठाकरे गट आता मोकळा श्वास घेऊन काम करणार असल्याची टीका कार्यकर्त्यांनी केली आहे. निलम गोऱ्हे यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर उद्धव ठाकरे गटाकरून ट्विट करत गोऱ्हे उपरोधिक टोला लगावला आहे. “पुण्यातील शिवसैनिक आता नवीन भरारी घेणार, धन्यवाद निलमताई”

  • 08 Jul 2023 10:24 AM (IST)

    सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना टोला, ‘नव्याने उभं करण्याची हिंमत माझ्यात आहे…,

    एखाद्याने अख्ख घर जरी लुटून नेले, तरी ते नव्याने उभ करण्याची हिंमत माझ्यात आहे. हे जगाला छाती ठोकपणे सांगायची धमक तुमच्यात असायला हवी असा टोला सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लगावला आहे.

    शरद पवार साहेब आपण शेतकऱ्यांचं शेत लुटून आणि गावगाडा उध्वस्त करून राजवाडे बांधले. त्याचं गाव गाड्यांच्या शापाने राजवाड्याचा एक एक बुरुज ढासळत आहे. हे याचि देही याचि डोळा आपल्याला पाहावं लागत आहे. त्याचबरोबर नियतीने उगवलेला हा सूड आहे असंही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

  • 08 Jul 2023 10:20 AM (IST)

    शरद पवारांच्या आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्याआधी दिलीप वळसे पाटलांचा दौरा

    शरद पवारांच्या आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्याआधी दिलीप वळसे पाटलांचा दौरा

    मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील उद्या आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर

    वळसे पाटील यांच्या उपस्थितीत उद्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन

    उद्या सकाळी 11 वाजता मंचर येथे आंबेगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.

    यावेळी वळसे पाटील नेमके काय बोलणार, याकडे तालुक्‍यासह राज्याचं लक्ष

  • 08 Jul 2023 10:18 AM (IST)

    रणजितसिंह मोहिते पाटलांनी अजित पवारांची घेतली भेट

    भाजपाचे आमदार आणि नेते रणजितसिंह मोहिते पाटलांनी अजित पवारांची भेट घेतली. देवगिरी बंगल्यावर अजित पवारांना भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. मोहिते पाटील घराण्यानं राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपाची वाट धरली होती.

  • 08 Jul 2023 09:48 AM (IST)

    येवल्यात छगन भुजबळ यांचा पराभव करु

    येवल्यात यावेळी छगन भुजबळ यांचा पराभव करणार, येवल्यात शिवसेनेचा आमदार निवडून येणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. आज शरद पवार यांचा नाशिक दौरा होत आहे. येवल्यात हजारो शिवसैनिक शरद पवार यांचे स्वागत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 08 Jul 2023 09:45 AM (IST)

    मला त्यांची लाज वाटते, नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका

    मला त्यांची लाज वाटते, अशी तिखट प्रतिक्रिया संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर केली आहे. ज्या विचारश्रेणीतून त्या शिवसेनेत आल्या होत्या. त्यांना सातत्याने पक्षाने अनेक पदे दिली. पाच वेळा आमदार झाल्या. आता दोन-तीन महिन्यासाठी, पद वाचविण्यासाठी त्या शिंदेकडे गेल्या आहेत. नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्राला लाज वाटते, अशी जहरी टिका त्यांनी केली.

  • 08 Jul 2023 09:40 AM (IST)

    महाराष्ट्र गद्दारांची भूमी, अशी ओळख होत आहे- संजय राऊत

    महाराष्ट्रात दडपशाही सुरु आहे. महाराष्ट्र आता गद्दारांची भूमी, अशी ओळख होत आहे. या प्रवृत्तीविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन संजय राऊत यांनी केली. शरद पवार यांच्या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे ते म्हणाले. आम्हाला महाराष्ट्र आणि देश वाचवायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 08 Jul 2023 09:34 AM (IST)

    राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय वरिष्ठांचा-फडणवीस

    राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांनी घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करायला हवं, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येईल, नाराजी दूर करण्यात येईल असा दावा त्यांनी केला.

  • 08 Jul 2023 09:17 AM (IST)

    ठाण्यात शरद पवार यांचं जल्लोषात स्वागत

    शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पक्ष फुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पिंजून काढण्याचा त्यांचा मानस आहे. जे पक्षातून गेले, त्यांना जाऊ द्या. नवे नेतृत्व उभे करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. तसेच उत्तर महाराष्ट्रापासून दौऱ्याची सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले होते. नाशिककडे जात असताना ठाण्यात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

  • 08 Jul 2023 09:14 AM (IST)

    शरद पवार यांच्या ताफ्याचा मार्ग बदलणार?

    शरद पवार यांच्या ताफ्याचा मार्ग बदलणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. नाशिकमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोरुन हा ताफा जाणार होता. पण आता हा मार्ग बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात भुजबळ समर्थक जमा झाले आहेत. त्यामुळे कोणताही संघर्ष टाळण्यासाठी हा बदल करण्यात येण्याची शक्यता आहे.

  • 08 Jul 2023 09:04 AM (IST)

    अजित पवार यांनी परत यावं, हवं तर मी राजकारण सोडतो

    अजित पवार यांनी परत यावं, हवं तर मी राजकारण सोडतो, अशी भावनिक साद जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. शरद पवार यांच्या भोवती काही मंडळींनी कोंडाळं केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी अजित पवार यांना परत येण्याचे आवाहन केले. जयंत पाटील यांना पण सोबत घेऊन जातो. आम्हाला काहीच नको, असे भावनिक आवाहन आव्हाड यांनी केले.

  • 08 Jul 2023 08:58 AM (IST)

    शरद पवार मुंबईहून नाशिककडे रवाना, ठिकठिकाणी स्वागत

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नाशिकच्या येवल्यात सभा होणार आहे. त्यासाठी शरद पवार मुंबईहून नाशिककडे रवाना झाले आहेत. सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत आहेत. ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे. ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावरील राजनोली नाका परिसरात मोठ्या संख्येने भिवंडी कल्याण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत.

  • 08 Jul 2023 08:50 AM (IST)

    शासन आपल्या दारी कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार

    उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई विमानतळला पोहोचले आहेत. गडचिरोली येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला राहणार उपस्थित राहणार आहेत.  सरकारमध्ये शामिल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज प्रथमच शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रविण दरेकर कालिना एअरपोर्ट दाखल झाले आहेत.

  • 08 Jul 2023 08:30 AM (IST)

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ मोहीमेला प्रारंभ

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाचे या मोहीम प्रारंभ होतेय.  सोलापूर जिल्ह्यातील या मोहिमेला पंढरपुरातून सुरुवात होत आहे. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत मोहिमेला प्रारंभ झाला.  यावर दिलीप धोत्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  राजकारणाचा चिखल झाला आहे का? माझ्या मताला काही किंमत नाही का? एकदा मतदान केलं की तुम्हाला पाच वर्षे गृहीत धरणार का? ज्या ज्या लोकांना या सरकारवर संताप व्यक्त करायचा आहे त्यांनी या बॅनरवर सही करावी, असं आवाहन दिलीप धोत्रे यांनी केलं आहे.

  • 08 Jul 2023 08:20 AM (IST)

    मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये ‘वर्षा’वर खलबतं

    वर्षा बंगल्यावर मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली.  मंत्रिमंडळ विस्तार ,आमदारांची नाराजी तसेच इतर काही मुद्यांवर बातचीत झाली असण्याची शक्यता आहे.  मध्यरात्री 11.15 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहचले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यरात्री 1.15 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत करून वर्षाहून निघाले.

  • 08 Jul 2023 08:10 AM (IST)

    महाराष्ट्रातील नवे ‘संत’ महामंडळ!… पण नैतिकता कोठे आहे?; सामनातून सवाल

    आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. आमचा प्रश्न पुन्हा तोच आणि तोच आहे. अजित पवार यांच्यावरील सर्व आरोप खोटे की खरे? व खोटे असतील तर ‘ईडी’च्या बेताल वर्तणुकीवर काय कारवाई करणार? एकंदरीत सगळाच घोटाळा आहे. भाजपचे आमदार राहुल कुल यांनी त्यांच्या भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचा ‘मनी लाँडरिंग’ घोटाळा करून ठेवला. मंत्री दादा भुसे यांनी गिरणा मोसम सहकारी साखर कारखान्यात 178 कोटींचा घोटाळा केला, पण संत, महात्मे व युगपुरुषांच्या चुका शोधायच्या नसतात. त्यांचे गुन्हे म्हणजे प्रसादच असतो. महाराष्ट्राला सध्या तो प्रसाद मिळाला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहेच, पण हे सगळे कलियुगातील ‘संत’ आहेत. त्यांच्या पायाचे तीर्थ सध्या भाजप प्राशन करीत आहे. महाराष्ट्रासाठी ते विष आहे!, असं सामनात म्हणण्याता आलं आहे.

  • 08 Jul 2023 08:10 AM (IST)

    शरद पवार यांची आज नाशिकमध्ये जाहीर सभा

    शरद पवार यांची आज नाशिकच्या येवल्यामध्ये जाहीर सभा होणार आहे. आज दुपारी चार वाजता ही सभा होणार आहे. या सभेसाठी शरद पवार सुप्रिया सुळे नाशिकच्या दिशेने रवाना झाले आहेत. शरद पवार महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेणार आहेत. त्याची सुरूवात छगन भुजबळ यांच्या नाशिकमधून होतेय. त्यामुळे ते या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

  • 08 Jul 2023 07:58 AM (IST)

    आमदार रोहित पवार यांनी घेतली छगन भुजबळ यांच्या कट्टर समर्थकाची भेट, रात्री उशिरा खलबतं

    राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडल्यानंतर पक्षाचे विविध नेते आणि कार्यकर्त्यांची भेट दोन्ही गटाकडून सुरू झालेली आहे. येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांची मध्यरात्री उशिरा आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली.

    शरद पवार यांची येवला येथे आज होणाऱ्या सभेसाठी होळकर यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या समवेत विक्रमगडचे आमदार सुनील भुसार उपस्थित होते. सध्या झालेल्या घडामोडी वर यावेळी साधकबाधक चर्चा करण्यात आली.

  • 08 Jul 2023 07:37 AM (IST)

    शरद पवार यांची आज पहिली जाहीर सभा, भुजबळ यांच्या येवल्यातून हल्लाबोल करणार

    राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज पहिली जाहीर सभा पार पडणार आहे. छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या येवला येथे ही सभा होणार आहे. आज दुपारी 4 वाजता होणाऱ्या या सभेत शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 08 Jul 2023 07:24 AM (IST)

    सगळ्यांना अनुभवलं, हाती काय लागलं; मालेगावात मनसेची बॅनरबाजी

    सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मालेगावमध्ये मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. आजपर्यंत सगळ्यांना अनुभवलं हाती काय लागलं? अजूनही वेळ गेलेली नाही… एकदा राजसाहेब ठाकरे यांना आजमावून बघा…अशा आशयाचे बॅनर मालेगावमध्ये झळकले आहेत. महाराष्ट्राला एकच पर्याय राज साहेब आहेत, असे या बॅनरमध्ये म्हटले आहे. त्यामुळे मालेगावात सध्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • 08 Jul 2023 07:20 AM (IST)

    मनसेची एक सही संतापाची आजपासून; थेट जनतेशीच संवाद

    राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी विरोधात आज ठिकठिकाणी मनसेची सह्यांची मोहीम सुरू होणार आहे. राजकीय समीकरणांचा निषेध करण्यासाठी मनसेने एक उपक्रम हाती घेतला आहे. एक सही संतापाची असं या उपक्रमाचं नाव आहे. त्याची सुरुवात आज सकाळी 10 वाजता सुरू होत आहे. यावेळी जनतेशी थेट संवाद साधण्यात येणार असून नागरिक या मोहिमेला कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 08 Jul 2023 07:13 AM (IST)

    ईडीच्या बेताल वर्तवणुकीवर काय कारवाई करणार?; दैनिक ‘सामना’तून सवाल

    आमचा प्रश्न पुन्हा तोच आणि तोच आहे. अजित पवार यांच्यावरील सर्व आरोप खोटे की खरे? आणि खोटे असतील तर ‘ईडी’च्या बेताल वर्तणुकीवर काय कारवाई करणार? एकंदरीत सगळाच घोटाळा आहे, असं दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून म्हटलं आहे.

Published On - Jul 08,2023 7:11 AM

Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.