AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, तीन आमदारांसह, काही नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

शिंदे गटाने सुरू केलेल्या "ऑपरेशन टायगर"मुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अनेक माजी आमदार आणि नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत. मुंबईत तीन माजी नगरसेवक आणि तीन माजी आमदारांचा आज पक्षप्रवेश होणार आहे.

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, तीन आमदारांसह, काही नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 18, 2025 | 4:32 PM
Share

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकासआघाडीला चांगलीच गळती लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते, आजी माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात प्रवेश घेत आहेत. त्यातच आता लवकरच महापालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त नगरसेवक आपल्याकडे वळवून घेण्यासाठी महायुतीतील सर्वच पक्ष आग्रही आहेत. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरु केले आहे. आज शिवसेनेत मुंबईतील तीन माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे

शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. कोकणातून शिवसेनेने या ऑपरेशनला सुरुवात केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर शिवसेनेच्या गळाला राज्यातील कोणते नेते लागणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. आता शिवसेनेचे ॲापरेशन टायगर पुन्हा सक्रीय झाले आहे.

तीन माजी आमदार, तीन माजी नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार

आज मुंबईतील तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे. त्यापाठोपाठ राज्यातील तीन माजी आमदारांचाही आज पक्षप्रवेश होणार आहे. यामुळे विरोधकांना जोरदार धक्का बसला आहे. विधिमंडळ अधिवेशन काळात शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला जाणार आहे. मुंबईतील माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. बाळासाहेब भवन या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा रंगणार आहे. त्यानंतर मुक्तगिरी बंगल्यावर तीन माजी आमदारांचा पक्ष प्रवेश होणार आहे. आता शिंदे गटात प्रवेश करणारे तीन माजी आमदार कोण, तीन माजी नगरसेवक कोण, याची चर्चा रंगली आहे.

वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरेंना धक्का

शिवसेना शिंदे गट उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांना संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. वैजापुर-गंगापुर विधानसभा मतदार संघातील माजी आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे शिवसेनेतून शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे. पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्तागिरी येथे दाखल झाले आहेत. मुक्तागिरी निवास्थानी पक्षप्रवेशासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.