Nanded Death Case : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव; राहुल गांधी आक्रमक, म्हणाले, भाजप…

Rahul Gandhi on Nanded child death Case : भाजपच्या नजरेत गरिबांची काहीही किंमत नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी नांदेडमधील मृत्यूतांडवावर संतापले. त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केलाय. वाचा सविस्तर...

Nanded Death Case : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव; राहुल गांधी आक्रमक, म्हणाले, भाजप...
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 11:17 AM

नवी दिल्ली | 03 ऑक्टोबर 2023 : नांदेडमध्ये 24 तासात 24 मृत्यू झाले. या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. औषधांच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील नांदेडमध्ये 12 नवजात बालकांसह 24 रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांच्या मृत्यूची घटना ही अत्यंत दुखद आहे. या सर्व मृतरुग्णांच्या कुटुंबियांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. भाजप सरकार स्वत:च्या प्रचारासाठी हजारो कोटींचा खर्च करतं. पण लहान मुलांच्या उपचारासाठी, त्यांच्या औषधांसाठी यांच्याकडे पैसे नाहीत? भाजपच्या नजरेत गरिबांच्या आयुष्याची काहीही किंमत नाही, असं राहुल गांधी म्हणालेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट करत नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी सरकारने ठोस पावलं उचलावीत, असं शरद पवार म्हणालेत.

शरद पवार यांचं ट्विट

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना ही अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे. दोनच महिन्यांपूर्वी ठाण्यातील महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र या घटनेला गांभीर्याने न घेतल्यानेच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अशाप्रकारच्या एका अत्यंत गंभीर घटनेची पुनरावृत्ती झाली. यातून सरकारी यंत्रणांचे अपयश स्पष्ट होते. किमान वेळीच या दुर्दैवी घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि निष्पाप रुग्णांचा जीव वाचला जाईल यासाठी ठोस पावले उचलली जावीत याकडे राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही या नांदेडमधील घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला. ही अतिशय गंभीर बाब असून, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

सुप्रिया सुळे यांचं ट्विट जसंच्या तसं

नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाला. हे मृत्यू केवळ योगायोग नक्कीच नाहीत. या प्रत्येक मृत्यूची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. एका दिवसात एवढे मृत्यू होत असतील तर त्याचे गांभीर्य मुख्यमंत्री आणि यंत्रणेनं लक्षात घेऊन तात्काळ चौकशीचे आदेश देणे अपेक्षित आहे.

पण ठाण्याच्या घटनेच्या वेळी दाखविलेला बेदरकारपणा आणि बेफिकीरी यावेळी देखील दिसतेय. लपवाछपवी सुरु असून एकमेकांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचे उद्योग सुरू आहेत. रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना वेळेवर औषधे मिळाली नसल्याचा आरोप होत आहे. याचा अर्थ, महाराष्ट्रातील जनतेचे जीव एवढे स्वस्त झाले आहेत का? यामध्ये दिरंगाई आणि दुर्लक्षाची बाब दिसत असून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

मुख्यमंत्र्यांनीतातडीने हस्तक्षेप करुन राज्याच्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

याखेरीज या मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देखील मिळायला हवी. या सर्व मृतांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना आणि मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.