Rain Updates: कृष्णा आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली, मराठवाड्यातही मुसळधार, नदी-नाल्यांना पूर

राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावलीय. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आलाय. (Maharashtra Rain Updates).

Rain Updates: कृष्णा आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली, मराठवाड्यातही मुसळधार, नदी-नाल्यांना पूर
Follow us
| Updated on: Aug 17, 2020 | 8:57 AM

मुंबई : राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावलीय (Maharashtra Rain Updates). मराठवाड्यात मागील 2 दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने नदी-नाल्यांना पूर आलाय. दरम्यान सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसलं आहे. आतापर्यंत 10 कुटुंबातील 40 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय.

LIVE Updates:

  • रत्नागिरीत सकाळपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला, दक्षिण रत्नागिरीत पावसाच्या मुसळधार सरी, काजळी नदी दुथडी भरुन प्रवाहित, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा, काजळी नदीचं पाणी पात्राबाहेर, अनेक ठिकाणी पाणी शेतात घुसले, आज दिवसभर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
  • गडचिरोली जिल्ह्यात पाऊसाची विश्रांती, भामरागड तालुक्यातील 100 गावे संपर्काच्या बाहेरच, पुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात, सायकाळपर्यंत पाऊस नसल्यास मार्ग सुरु होण्याची शक्यता, सिरोंचा येथील कंबालपेठा नाला भरुन वाहत असल्याने टेकडा मार्ग बंद
  • बुलडाणा जिल्ह्यत रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु आहे.

पुढील आठवडाभर राज्यात सर्वत्र पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे (Maharashtra Rain Updates). 17, 18 आणि 19 ऑगस्टला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे. 20 आणि 21 ऑगस्टला पावसाचा जोर कमी होईल. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा अंदाज आहे.

पुणे

पुणे शहर परिसरात 17 ते 23 ऑगस्टदरम्यान मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर घाट माथ्यावर काही ठिकाणी मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. खडकवासला धरण क्षेत्र परिसर पर्यटनस्थळ बनलंय. खडकवासला धरण परिसरात उत्साही नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

धरणाचं निसर्गरम्य वातावरण आणि पाण्याची नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा खडकवासला धरण क्षेत्रात नागरिकांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आला. मात्र या आदेशानंतरही उत्साही नागरिकांकडून गर्दी होत आहे. नागरिकांच्या गर्दीमुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

दरम्यान, खडकवासला परिसरात रिमझिम पाऊसही सुरु आहे. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे धरण परिसरात पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

सांगली

कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 31.7 फुटांवर पोहचली आहे. सूर्यवंशी प्लॉटमधील 4 घरांमध्ये कृष्णा नदीचं पाणी शिरलं आहे. सूर्यवंशी प्लॉटमधील 10 कुटुंबातील 40 लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरणाच्या 4 दरवाजांमधून 7 हजार 112 क्यूसेक्सचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 36 फूट 6 इंचावर आली आहे. जिल्ह्यातील 76 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोयना धरणातून नदीपात्रात सोडलेल्या 55 हजार क्यूसेक पाण्यामुळे कराडच्या कृष्णा कोयना प्रितीसंगमावर नदीत प्रचंड पाणी पातळी वाढली आहे. कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे 10 फुटांवर स्थिर आहेत. कालपासून 55 हजार 486 क्यूसेक पाणी विसर्ग सुरु आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा 92.06 टीएमसी झालाय.

औरंगाबाद

औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात पावसाची संततधार सुरुच आहे. अनेक नदी-नाल्यांना पूर आलाय. अनेक धरणेही ओव्हरफ्लो झालीय. मराठवाड्यातील जायकवाडी सारखी मोठी धरणं भरण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे याच संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

गडचिरोली 

गडचिरोली जिल्ह्यात 8 सात दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पाऊसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. तेलंगाणा सरकारने बांधलेल्या लक्ष्मी मेड्डीगट्टा धरणाचे 65 दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली. त्यामुळे 7,69,000 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. याचा फटका प्राणहिता आणि इंद्रावती नद्यांना बसत आहे.

भामरागड तालुक्यात इंद्रावती नदीच्या पाण्यात वाढ झाली होती. ही नदी भामरागड पलाकोटा येथे प्रवेश करते. आज पाणी थोडे कमी झाले, तरी आतापर्यंत 100 गावे संपर्काबाहेर आहेत. 40 ते 50 लोकांनी स्वतः काल दुसऱ्या ठिकाणी घरातील सामान सुरक्षित ठिकाणी हलविले. प्रशासनाने अलर्ट राहण्याचे संकेत दिले आहेत.

संबंधित बातम्या :

मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा

बारा दिवसात पाणीसाठा दुप्पट, मुंबईकरांना नऊ महिने पुरेल इतकं पाणी

Khadakwasla Dam | पुणेकरांकडून नियमांची पायमल्ली, खडकवासला धरण परिसरात उत्साही नागरिकांची गर्दी

Maharashtra Rain Updates

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.