AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये 4 जानेवारीपासून शाळा सुरू होणार; तर जळगावमधील शाळांचा निर्णय सोमवारी!

राज्यातील इतर शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही तूर्तास शाळा सुरू होणार नाही. 4 जानेवारीपासून नाशिकमधील शाळा सुरू होणार असून जळगावमधील शाळा सुरू करण्याचा निर्णय उद्या सोमवारी घेण्यात येणार आहे. (maharashtra: schools in nashik to remain shut till january 4)

नाशिकमध्ये 4 जानेवारीपासून शाळा सुरू होणार; तर जळगावमधील शाळांचा निर्णय सोमवारी!
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 2:34 PM

नाशिक: राज्यातील इतर शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही तूर्तास शाळा सुरू होणार नाही. 4 जानेवारीपासून नाशिकमधील शाळा सुरू होणार असून जळगावमधील शाळा सुरू करण्याचा निर्णय उद्या सोमवारी घेण्यात येणार आहे. (maharashtra: schools in nashik to remain shut till january 4)

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी ही माहिती दिली. शाळा उघडण्याचा निर्णय पुढे ढकलला तर योग्यच ठरेल असं पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या 4 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून परिस्थिती पाहून 4 जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात येणार आहे. मात्र परिस्थितीनुसार निर्णय बदलण्यात येऊ शकतो, असं भुजबळ म्हणाले. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांच्या टेस्ट करण्यात येणार असून शाळांना सॅनिटाइज करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 45 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

शहरात कोणताही लॉकडाऊन अथवा कर्फ्यू नाही. मात्र, नागरिकांनी सतर्क राहावे. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. मास्कशिवाय फिरू नये. हात स्वच्छ धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदी गोष्टींवर भर देण्यात यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

जळगावचा निर्णय उद्या

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शाळा सुरू करायच्या की नाहीत? याचा निर्णय उद्या सोमवारी घेण्यात येणार असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत सातशे शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असून शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे, असं सांगतानाच उद्या शाळा सुरू होणार आहे. पण शाळा सुरू करण्याबाबतचे संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं पाटील म्हणाले.

कोल्हापुरात उद्या शाळा सुरू नाही

कोल्हापुरातही उद्या शाळा सुरू होणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्याने उद्यापासून शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार असल्याचं कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याने सांगितलं.

नागपुरात 25 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार

नागपूरमध्येही उद्यापासून शाळा सुरू होणार नाहीत. नागपूरमध्ये येत्या 25 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरमध्ये 41 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे 23 आणि 24 तारखेला कोरोनाच्या स्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. तसेच मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

नागपूर जिल्ह्यात 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

नांदेडमध्ये 22 शिक्षकांना कोरोनाची बाधा, विद्यार्थी पालकांमध्ये भीतीचं वातावरण

उस्मानाबादेत 48, नागपुरात 41, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह?

(maharashtra: schools in nashik to remain shut till january 4)

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.