Maharashtra Corona Updates | महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! रुग्णसंख्येचा नवा उच्चांक! कोरोना रुग्णवाढ 36000च्याही पार
तब्बल 36 हजारपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण संपूर्ण राज्यात आज आढळून आले आहेत. यातील 20 हजारपेक्षा जास्त रुग्ण तर एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचा नवा विक्रम नव्या वर्षात नोंदवला आहे. तब्बल 36 हजारपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण संपूर्ण राज्यात आज आढळून आले आहेत. यातील 20 हजारपेक्षा जास्त रुग्ण तर एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नसल्यानं चिंता आणखीनच वाढली आहे. त्यामुळे लक्षण नसलेल्या रुग्णांकडून संसर्ग अधिक होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे.
आजची सविस्तर आकडेवारी
राज्यात आज कोरोनाचे 36 हजार 265 नवे रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात एकूण 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आजच्या रुग्णवाढीतील सर्वाधिक रुग्णसंख्या ही एकट्या मुंबईत नोंदवली गेली असून मुंबईत तब्बल 201818 नव्या रुग्णांचं निदान करण्यात आलं आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे एकूण 8 हजार 907 रुग्ण कोरोनातून बरे झाले असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट करण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ –
महाराष्ट्रात लॉकडाऊनची वेळ पुन्हा येणार का, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. कारण वाढती रुग्णवाढ आरोग्य आणि प्रशासनावरील ताण वाढवण्याची शक्यता आहे. याचबाबत आत बैठकही पार पडली होती. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. कोरोनाची ही तिसरी लाट थोपवण्यासाठी विविध शहर आणि जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. मात्र संपूर्ण राज्यात विकेंड लॉकडाऊन लागणार का, असा प्रश्न विचारला गेला. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले आरोग्यमंत्री?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यामध्ये आज कोरोनासंबंधी आढावा बैठक झाली. या बैठकीत कोरोनाचा प्रसार आणखी वाढू नये, याकरिता काय उपाययोजना करता येतील यासंबंधी चर्चा झाली. आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, – मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या भयंकर वेगाने वाढते आहे. मात्र अद्याप येथील लोकल बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. – जिल्हाबंदीविषयी विचारल्यास, राजेश टोपे म्हणाले, सध्या तरी जिल्हाअंतर्गत बंद घालण्याची गरज वाटत नाही. – विकेंड लॉकडाऊनविषयी राजेश टोपे म्हणाले, येत्या दोन दिवसातील परिस्थितीचा आढावा घेऊन याविषयी निर्णय घेतला जाईल. – हॉटेल्स, मॉल्स बंद करणार का, असा प्रश्न विचारल्यास राजेश टोपे म्हणाले, आज मुंबई, ठाणे, पुणे, आदी शहरांमध्ये हळू हळू शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. पण शाळा-कॉलेज बंद करून मुले हॉटेल्स, मॉल्समध्ये फिरणार असतील तर यावर काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. – राज्यात अनावश्यक गोष्टींसाठी मेळावे, एकत्र येण्यावर आता कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला.