कुठे बॅटची पूजा, कुठे दुग्धाभिषेक तर कुठे विठ्ठलाला साकडे, संपूर्ण महाराष्ट्रात वर्ल्डकपचा फिवर; तुमच्या शहरात काय?

IND vs AUS Final cricket match ICC World Cup 2023 : भारताच्या विजयासाठी नागपुरात बॅटची पूजा तर मुंबईत सिद्धीविनायकाच्या चरणी विजयासाठी प्रार्थना करण्यात आली सर्वत्र वर्ल्डकपचा फिवर, प्रत्येक शहरात गावात उत्साह आहे. तुमच्या शहरात काय घडतंय? वाचा सविस्तर...

कुठे बॅटची पूजा, कुठे दुग्धाभिषेक तर कुठे विठ्ठलाला साकडे, संपूर्ण महाराष्ट्रात वर्ल्डकपचा फिवर; तुमच्या शहरात काय?
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 12:34 PM

मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : आज क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण वर्ल्ड कपचा फायनल सामना आज होत आहे. गुजरातच्या अहमदाबाद स्टेडियममध्ये हा महामुकाबला होणार आहे. या सामन्याकडे केवळ भारतच नाही तर जगाचं लक्ष आहे. भारतीय संघाने हा वर्ल्डकप जिंकावा, यासाठी क्रिकेटप्रेमी त्यांना भरभरून शुभेच्छा देत आहेत. महाराष्ट्रातल्या शहराशहरात, गावागावात क्रिकेटचा फिवर पाहायला मिळतोय. भारतीय संघाच्या जर्सीसारखे टी- शर्ट घालून तरूणाई रस्त्यावर उतरली आहे. कुठे भारताच्या विजयासाठी बॅटची पूजा केली जातेय. कुणी विजयासाठी सिद्धीविनायकाच्या चरणी साकडं घातलं आहे. तुमच्या शहरातील अपडेट जाणनू घ्या…

पुण्यात क्रिकेटपटूंच्या फोटोंना दुग्धाभिषेक

भारतीय संघाच्या विजयासाठी पुण्यात मनसेतर्फे दुग्धाभिषेक करण्यात आला. विश्वचषकात भारताने विजय मिळवावा यासाठी पुण्यात दुग्धाभिषेक करण्यात आला. मनसेतर्फे भारतीय संघाच्या खेळाडूंच्या कट आउटला दुग्धाभिषेक घालण्यात आला. दुग्धाभिषेक करत भारतीय टीमला पुण्यातून प्रोत्साहन देण्यात आलं. विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी या सगळ्यांच्या पोस्टर्सवर पुण्यात दुग्धाभिषेक घालण्यात आला. भारतीय संघाला पुण्यातून मनसेकडून अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या.

अहमदनगरमध्ये विठ्ठलाला साकडं

अहमदनगरमध्ये वर्ल्ड कप मॅच जिंकण्यासाठी नागरिकांनी घातले विठ्ठलाकडे साकडं घालण्यात आलं आहे. अहमदाबाद इथं आज होणाऱ्या फायनल सामना जिंकण्यासाठी विठ्ठलाची आरती करून प्रार्थना केली गेली. उपनगरातील सावेडी भागातील कजबे वस्तीवरील नागरिकांनी प्रार्थना केली. भारत हा सामना जिंकणार, असा विश्वास व्यक्त क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केला.यावेळी जीतेगा भाई जिथे का भारत जितेगा अशा घोषणा देण्यात आल्या.

सोलापुरात खेळाडू एकवटले

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप फायनल मॅच साठी सोलापुरातील क्रिकेटपटू एकवटले आहेत. सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियम मधील प्लेयर्स कडून टीम इंडियाला शुभेच्छा देण्यात येत आहेत. दहा वर्षापासून साठ वर्षापर्यंतचे प्लेयर्स एकत्र आले आहेत.

नागपुरात उत्साह

नागपुरातील क्रिकेट अकॅडमी मध्ये क्रिकेट प्रेमी आणि खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. टीमचा उत्साह वाढविण्यासाठी घोषणाबाजी करण्यात येत आहे. टीम इंडियाचा विजय निश्चित असल्याचं हे क्रिकेटप्रेमी म्हणात आहेत. नागपूर जिल्ह्यात विश्वकप फायनलचा फिव्हर पाहायला मिळतोय. भारतीय टीमच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींनी‘विजयी भव’ पूजा केली आहे. नागपूर बुटीबोरीत क्रिकेटर्सकडुन ‘विजयी भव’ पूजा करण्यात आली.

नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर इंडिया इंडियाचा जयघोष

वर्ल्डकप फायनलमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होतोय. त्यासाठी नाशिकमध्ये क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. भारत संघाला चिअरअप करण्यासाठी क्रिकेटप्रेमी एकवटले आहेत. गोल्फ क्लब मैदानावर क्रिकेट प्रेमींचा उत्साह पाहायला मिळतोय. यावेळी इंडिया इंडियाचा जयघोष करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये मिसळ फ्री

काही क्षणात भारतीय संघ विश्वचषक उंचावण्यासाठी ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेट प्रेमी उत्साहात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट प्रेमी पाटील मिसळच्या हॉटेल मालकाने अनोखी ऑफर ठेवलीय. अंतिम सामन्याचा दिवस असल्याने या हॉटेल मध्ये दोन मिसळ वर एक मिसळ फ्री ठेवण्यात आली. तर भारत जिंकणार असल्याचा विश्वास असल्याने त्यांनी उद्या एका मिसळ वर एक मिसळ फ्री ठेवली आहे.त्याचा क्रिकेटप्रेमी आस्वाद घेत आहेत.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.