Prophet Muhammad Protest: सोलापूर, औरंगाबाद, परभणी, शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लिमधर्मीय रस्त्यावर, नुपूर शर्मांच्या वक्तव्याचे देशभर पडसाद

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्रात उमटले. सोलापूर, नाशिकसह, औरंगाबाद, जालना परभणीमध्ये आज दुपारी चार वाजेच्या नमाज नंतर शेकडो मुस्लिम भाविक रस्त्यावर उतरले.

Prophet Muhammad Protest: सोलापूर, औरंगाबाद, परभणी, शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लिमधर्मीय रस्त्यावर, नुपूर शर्मांच्या वक्तव्याचे देशभर पडसाद
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 5:37 PM

मुंबईः भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्रभर दिसून आले. सोलापूर, नाशिकसह मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणीमध्ये मुस्लिम धर्मियांनी (Muslims) या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. तसेच नुपूर शर्मा यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. आज शुक्रवारी दुपारी नमाजनंतर राज्यभरातील मुस्लिम भाविकांनी विविध ठिकाणी निषेध मोर्चा काढला. सोलापूर, नाशिकसह, औरंगाबाद, जालना परभणीमध्ये आज दुपारी चार वाजेच्या नमाज नंतर शेकडो मुस्लिम भाविक रस्त्यावर उतरले. नुपूर शर्मांनी केलेल्या वक्तव्यावरून हा जमाव खूप आक्रमक झाला होता. राज्यभरात काही ठिकाणी एमआयएमच्या नेतृत्वात तर काही ठिकाणी इतर मुस्लिम संघटनांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. मात्र ज्या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागतंय, तेथील हिंसाचार भडकवणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची जबाबदारी आमची आहे, असं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.

सोलापूरात मुस्लिम धर्मीय रस्त्यावर

Solapur Protest

सोलापुरातील मोर्चा

सोलापुरात MIM च्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेध मुस्लिम धर्मियांनी या मोर्चात केला. आज दुपारी हजारोंच्या संख्येनं मुस्लिम समाजाचे लोक रस्त्यावर उतरले. प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने मुस्लिम समाजात नाराजी दिसून आली. हे वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

औरंगाबादमध्येही जमाव भडकला

Aurangabad morcha

औरंगाबादेतील मोर्चा

औरंगाबादमध्येही शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर हजारोंच्या संख्येनं मुस्लिम भाविक रस्त्यावर उतरले. त्यांनी महापालिका आयुक्तालयासमोर मोर्चा काढला. नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली.

हे सुद्धा वाचा

परभणीत बंद, हजारोंचा मोर्चा

Parbhani Protest

भाजपच्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून परभणीत मुस्लिम समाज आक्रमक झाला असून, मुस्लिम बांधवांकडून आज परभणी बंदची हाक देण्यात आली . आजच्या परभणी बंदला शहरात संमिश्र असा प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी दुकाने चालू तर काही ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात आली .दरम्यान, मुस्लिम बांधवांकडून नुपूर शर्माला अटक करून कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढत , जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले .

जालन्यात मामा चौकात हजारोंचा जमाव

Jalna Protest

जालन्यात मामा चौकातला जमाव

जालन्यातील मामा चौक येथे ऑल इंडिया ईमाम कौन्सिल च्या वतीने नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीसाठी हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरलेत यावेळी मुस्लिम बांधवांनी भाजप तसेच नुपूर शर्मा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच आंदोलकांनी नुपूर शर्मा च्या अटकेची मागनी करत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केली.

नाशिकमध्येही नुपूर शर्मांचा निषेध

लासलगाव शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आपापले सर्व व्यवहार 100 टक्के बंद ठेऊन या घटनेचा निषेध नोंदविला. दुपारच्या नमाज नंतर मुस्लिम धर्मीय एकत्र आले आणि त्यांनी लासलगाव पोलीस स्टेशन पर्यंत मूक मोर्चा काढला. भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. असे निवेदन निवेदन लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना देण्यात आले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.