Breaking News | आता मृत्यूनंतर क्लास वन अधिकाऱ्याच्या कुटुंबियालाही मिळणार नोकरी, राज्यात अनुकंपा धोरण लागू
गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून "महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम 2021" तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. मात्र, गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीतदेखील हे अनुकंपा धोरण लागू करावे, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. (Maharashtra State Government will give government job to family member of class one officer after his death implemented compassionate policy)
अधिकारी संघटनांचीदेखील अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी
कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनांचीदेखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम 2021 तयार करण्यास मान्यता
गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून “महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम 2021” तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
इतर बातम्या :
पूरग्रस्त चिपळूणसाठी तब्बल अडीच हजार पुस्तकांची भेट, राज्याच्या मराठी भाषा विभागाचे दानयज्ञ
पुण्यात मेट्रो कारशेडमध्ये फायरिंग! मेट्रो कर्मचारी जखमी, रिकामी काडतुसंही सापडलीhttps://t.co/GuDEfMoglw#Pune #Crime #PuneFiring #Kothrud #PuneMetro #MetroCarshed
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 26, 2021
(Maharashtra State Government will give government job to family member of class one officer after his death implemented compassionate policy)