राज्यात लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण आणणार, मुंबईतील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन

राज्यात लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण लागू केलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दिली. तसेच दरवर्षी महिला दिन, मातृदिन येतो. हे दिन आपण दिमाखात साजरे करतो. पण हा सन्मान सर्वकाळासाठी हवा. तरच खऱ्या अर्थाने समानता नांदेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

राज्यात लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण आणणार, मुंबईतील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 2:17 PM

 मुंबईः राज्यात लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण लागू केलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दिली. तसेच दरवर्षी महिला दिन, मातृदिन येतो. हे दिन आपण दिमाखात साजरे करतो. पण हा सन्मान सर्वकाळासाठी हवा. तरच खऱ्या अर्थाने समानता नांदेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. यशवंतराव चव्हाण सभागृहात जागतिक महिला दिन (International Women’s Day) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला व बाल विकास विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, महिला व बालविकास सचिव श्रीमती आय ए कुंदन, यांच्यासह महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील महिला व प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.

महिलांचा सन्मान सर्वकाळासाठी हवा- मुख्यमंत्री

यावेळी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागितक महिला दिनानिमित्त राज्यातील महिलांना शुभेच्छा दिल्या. तसेच महिला सर्वच क्षेत्रात पुढे असल्याचा सार्थ अभिमान असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘ दरवर्षी महिला दिन, मातृदिन येतो. हे दिन आपण दिमाखात साजरे करतो. पण हा सन्मान सर्वकाळासाठी हवा. तरच खऱ्या अर्थाने समानता नांदेल. महिलांनी त्या त्या दुय्यम स्थानाविरुद्ध काळात नेहमी आवाज उठवला. सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे टाकून काम केले. आपल्या राज्यात महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे  काम छान. महिलांचे प्रश्न, त्याविषयीची  त्यांची तळमळ नेहमी जाणवते. सर्वसमावेशक महिला धोरण तयार करण्याचे काम महिला व बाल विकास विभाग करत आहे.

सर्व आघाड्यांवर काम करणाऱ्यांना मानाचा मुजरा- मुख्यमंत्री

यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, ‘  मुंबई पोलीस आयुक्तांनी आजपासून महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे 8 तास निश्चित केले आहेत.  महिला पोलीसांना कुटुंब, घरदार याकडे लक्ष द्यावे लागते, सणवार सोडून ड्युटी करावी लागते, त्यांच्यावरही कामाचा तणाव असतो, याची जाणीव आहे. कोरोनाच्या संकट काळात, अत्यंत कठीण परिस्थितीत महिला पोलीसांनी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस  यांनी खुप उत्तम काम केले. चिमुकल्यांना घरी ठेऊन कोरोना काळात या महिला कामावर गेल्या आहेत.  त्यांना त्रिवार मानाचा मुजरा, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

 ‘महिला म्हणजे  फक्त चूल आणि मुल नाही’

महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलला पाहिजे, असं सांगताना मुख्यमंत्री म्हणाले,’  चूल आणि मुल या पलिकडे जाऊन पुरुषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. आपण त्यांना कसे सहकार्य करतो, त्यांना कसा आधार देतो हे राज्यकर्ते म्हणून पाहण्याचे आपले काम आहे. महिलांचे कायदे त्यांच्यापर्यंत पोहोचले का, त्यांच्यासाठीच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या का, आरोग्य सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत का हे पाहणे आपले कर्तव्य, या सुविधा त्यांच्यासाठी आहेत हे माता भगिनींना समजून सांगण्याची गरज आहे. याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.

इतर बातम्या-

Women’s Day | त्याच्याएवढंच काम करताय, पण पगार बरोबरीचा नाही? कुठे करणार तक्रार? समान वेतन कायदा काय?

अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, मोठेपणा दाखवायचा बंद करा- पडळकर

सोबतच्या महिलांना Happy Women’s Day म्हणताय? जरा थांबा, त्यांना नेमकं काय हवंय, तेही जाणून घ्या!

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.