Maharashtra health department recruitment 2021 : महाराष्ट्रात 10 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने भरती

दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची तातडीने होणार भरती (health workers recruitment Abdul Sattar Ajit Pawar corona update)

Maharashtra health department recruitment 2021 : महाराष्ट्रात 10 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने भरती
health department
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 8:09 PM

मुंबई : राज्यात सध्या करोनाने थैमान घातले आहे. त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे. त्यासाठी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पद भरती बाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने तातडीने भरण्याची मागणी केली आहे. (Maharashtra to recruit Ten thousand health workers immediately amid covid19 crisis Minister Abdul Sattar sends proposal to DCM Ajit Pawar corona update)

या पदांची होणार भरती

राज्यात कोरोना करोना च्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. सरकारतर्फे त्याला थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त मंत्रालयाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. त्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची 10, 127 पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

एकूण पाच संवर्गातील पदांची भरती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत दहा हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची भरती होणार आहे. त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे.

मान्यता मिळताच भरती प्रक्रिया तातडीने सुरु होणार

कोरोनाच्या प्रादुर्भावावर शासनाकडून प्रभावी हाताळणी व नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने दहा हजार 127 पदे भरण्याबाबत चा प्रस्ताव ग्राम विभाग ग्रामविकास विभागामार्फत वित्त मंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्तमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती तातडीने सुरू होईल.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : चंद्रकांतदादांची सूचना अजित पवारांना मान्य, आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी- अजित पवार

चंद्रकांतदादांची सूचना अजित पवारांना मान्य, आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, प्रकाश जावडेकरांनाही कोरोनाची लागण

(Maharashtra to recruit Ten thousand health workers immediately amid covid19 crisis Minister Abdul Sattar sends proposal to DCM Ajit Pawar corona update)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.