Tourism | पर्यटन महोत्सवाची सुरुवात उस्मानाबादेतून, तेर येथे जोरदार तयारी, दुर्मिळ ठेवा प्रदर्शनात मांडण्याची मागणी

औरंगाबादमधील पर्यटन स्थळांची ख्याती आहे. मात्र इतर दुर्लक्षित स्थळांचा यानिमित्ताने प्रसार करण्याचा पर्यटन विभागाचा उद्देश आहे. मराठवाड्यात नांदेडमधील देगलूर गावात 9 आणि 10 एप्रिल रोजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर बीडमधील कपिलधार किंवा परळी वैजनाथ या ठिकाणीदेखील महोत्सव होणार आहे.

Tourism | पर्यटन महोत्सवाची सुरुवात उस्मानाबादेतून, तेर येथे जोरदार तयारी, दुर्मिळ ठेवा प्रदर्शनात मांडण्याची मागणी
उस्मानाबादमधील दुसऱ्या शतकातील हस्तिदंताची बाहुलीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 6:00 AM

उस्मानाबाद : राज्यातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांना (Tourist Places) प्रकाशझोतात आणण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच 20 पर्यंटन महोत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे. यापैकी तीन महोत्सव मराठवाड्यात (Marathwada) होणार आहेत. त्यातील पहिला महोत्सव उस्मानाबादेत होणार आहे. प्राचीन व ऐतिहासिक शहर अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या 27 आणि 28 मार्च रोजी पर्यटन महोत्सवाचे (Tourism Festival) आयोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील तेर येथे ‘पर्यटन महोत्सव तेर २०२२’ साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवात उस्मानाबादमधील अनमोल ठेवा असलेली दुसऱ्या शतकातील दुर्मिळ हस्तीदंताची बाहुली प्रदर्शनात मांडण्याची मागणी केली जात आहे.

तेर महोत्सवाची जय्यत तयारी

उस्मानाबाद येथील महोत्सवात 27 मार्च 2022 रोजी सकाळी हेरिटेज वॉकचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित तसेच संत गोरोबा काका आणि ऐतिहासिक नगरी (तगर) या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 28 मार्च रोजी सायंकाळी 6.00 वा. संत गोरोबा काका मंदिरासमोर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते तर आमदार कैलास पाटील आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत राहतील. ऐतिहासिक नगरी (तगर) या विषयावर तेर येथील दीपक महाराज यांच्या प्रस्तावनेने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. तेर येथील लामतुरे वस्तू संग्रहालयात दुसऱ्या दशकातील प्राचीन व दुर्मिळ अशी हस्तिदंताची बाहुली आहे ती तेर येथील रेवण लामतुरे यांच्याकडे आहे. याच सारखी दुसरी बाहुली रोम देशात असून तेर व रोम साम्राज्याचे व्यापारी संबंध असल्याचा हा पुरावा आहे. हत्तीच्या दातावर हाताने कोरीव काम करून हि मूर्ती बनविली असून ती प्रदर्शनासाठी खुली ठेवण्यात यावी अशी मागणी होत आहे

औरंगाबादेत महोत्सव नाही, मग कुठे?

मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादेतच हा महोत्सव होणार नाही. औरंगाबादमधील पर्यटन स्थळांची ख्याती आहे. मात्र इतर दुर्लक्षित स्थळांचा यानिमित्ताने प्रसार करण्याचा पर्यटन विभागाचा उद्देश आहे. मराठवाड्यात नांदेडमधील देगलूर गावात 9 आणि 10 एप्रिल रोजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर बीडमधील कपिलधार किंवा परळी वैजनाथ या ठिकाणीदेखील महोत्सव होणार आहे. याविषयीचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल. राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांत 20 ठिकाणी महोत्सव आयोजित कऱण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात ग्रेप हार्वेस्टिंग महोत्सव, नांदूर मध्यमेश्वर महोत्सव, अहमदनगर जिल्ह्यात काजवे महोत्सव आदी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

इतर बातम्या-

‘ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्य होतील, तिथे तिथे..’; The Kashmir Files बद्दल शरद पोंक्षेंचं रोखठोक मत

Sugarcane Sludge : अतिरिक्त ऊसाचा भार 35 साखर कारखान्यांवर, ऊसतोडीसाठी कायपण?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.