Unlock 4 | ई-पास रद्द होण्याची चिन्हं, राज्यातील अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जाहीर होणार

रेस्टॉरंट टप्प्याटप्प्याने सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु मेट्रो, रेल्वे, जिम, मंदिर आताच सुरु करण्याबाबत सरकारचा विचार नाही.

Unlock 4 | ई-पास रद्द होण्याची चिन्हं, राज्यातील अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जाहीर होणार
Follow us
| Updated on: Aug 31, 2020 | 1:29 PM

मुंबई : केंद्राने अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातील अनलॉकच्या चौथ्या टप्प्याची नियमावलीही आज जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या सूचनेनंतर राज्यात ई-पास रद्द करण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे. (Maharashtra Unlock 4 Guidelines to be announced)

प्रशासनाने ई-पास रद्द करण्याबाबत तयारी दाखवली आहे. अद्यापही खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी ई-पास अनिवार्य आहे. त्यामुळे ई-पास रद्द करण्याची मागणी जनसामान्यांकडून केली जात आहे. याबाबत आज गाईडलाईन्स निघण्याची शक्यता आहे.

रेस्टॉरंट टप्प्याटप्प्याने सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु मेट्रो, रेल्वे, जिम, मंदिर आताच सुरु करण्याबाबत सरकारचा विचार नाही.

दुसरीकडे, राज्य सरकारच्या कार्यालयात उपस्थिती वाढवण्याची शक्यता आहे. सध्या 15 टक्के असलेली उपस्थिती वाढवून 30 टक्क्यावर नेण्याचा विचार आहे. याबाबतही आज आदेश जारी होण्याची शक्यता आहे.

केंद्राच्या ‘अनलॉक-4’बाबत गाईडलाईन्स

काय सुरु, काय बंद?

  1. कंटेनमेंट झोनबाहेर लॉकडाऊन नाही.
  2. कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन
  3. शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
  4. ऑनलाइन शिक्षणासाठी शाळेत 50 टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावता येणार
  5. 21 सप्टेंबरपासून फक्त 100 जणांच्या सहभागात सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना मंजुरी
  6. सप्टेंबरपासून मेट्रो रेल्वे टप्प्याटप्प्याने सुरु होणार
  7. मोकळ्या जागांवरील (ओपन एअर) थिएटर 21 सप्टेंबरपासून सुरु करता येणार
  8. सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर्स बंदच राहणार
  9. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही बंदच राहणार
  10. 21 सप्टेंबरनंतर लग्न समारंभास 50 ऐवजी 100 वऱ्हाड्यांची उपस्थित राहता येणार
  11. 21 सप्टेंबरनंतर अंत्यसंस्कारासाठी 20 ऐवजी 100 जणांना हजर राहता येणार (Maharashtra Unlock 4 Guidelines to be announced)

‘या’ गोष्टी बंदच राहणार

  • सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क
  • आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक

केवळ केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या विमानांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जनजीवन आणि देशातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबवली जात आहे. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 1 सप्टेंबरपासून देशात अनलॉक 4 सुरु होणार आहे.

शाळा-कॉलेज बंदच

शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपावण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील शाळा-कॉलेज बंद आहेत. 1 सप्टेंबरपासून शाळा-कॉलेज सुरु करण्यास परवानगी मिळू शकते. मात्र, शाळा-कॉलेज सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारकडे सोपवला आहे.

संबंधित बातम्या : 

ई-पासचे काय होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

Unlock-4 : थिएटर उघडण्याच्या मोदी सरकारच्या हालचाली, मेट्रोही धावण्याची शक्यता, अनलॉक 4 मध्ये काय सुरु होणार?

(Maharashtra Unlock 4 Guidelines to be announced)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.