Weather Alert : राज्यात हुडहुडी! निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद, तर महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले

महाबळेश्वरच्या काही भागात दवबिंदू गोठले आहेत. महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा पारा घसरला आहे

Weather Alert : राज्यात हुडहुडी! निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद, तर महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 9:36 AM

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याला पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे (Maharashtra Winter Weather Update). या आठवड्यात थंडीचा पारा (Cold) घसरणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून (Weather Department) देण्यात आला आहे. कोरडे हवामान आणि उत्तर भारतातून शीतलहरी या महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढणार आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. (Maharashtra Winter Weather Update)

आता मुंबई, नागपूरसह विदर्भातही थंडीची लाट पाहायला मिळत आहे. तर धुळे, परभणी आणि निफाडचाही पारा घसरला आहे. जम्मू काश्मीरसह उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे विदर्भात पारा आणखी घसरला आहे.

मुंबईत गारठा वाढला

मुंबईत हवामानात गारठा वाढला आहे. उत्तरेकडील शीतलहरीमुळे मुंबईतील पारा खाली घसरला आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे 16 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याही माहिती दिली आहे. हे मुंबईतील या सत्रातील सर्वात नीचांकी तापमान आहे.

धुळे गारठलं

धुळे जिल्ह्यात तापमानात घट तापमानात मोठी घट झाली आहे. धुळ्याचं तापमान 6 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. त्यामुळे सध्या धुळेकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.

परभणीत आजही थंडीची लाट

परभणीत आजही थंडीची लाट पाहायला मिळत आहे. परभणीचा पारा 5.1 अंश सेल्सियसवर थंड वारे वाहत असून दाट धुके आसल्याने परभणीकरांची पहाट उशिराने सुरु होत आहे. उब मिळविण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर केला जात आहे. थंडीच्या या वातावरणात धुळ्यात जागोजागी शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहे.

निफाडमध्येही किमान पारा घसरला

निफाडचा किमान पारा घसरला आहे. 6.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची यंदाच्या थंडीच्या हंगामातील नीचांकी नोंद निफाडमध्ये करण्यात आली आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात ही नोंद करण्यात आली आहे (Maharashtra Winter Weather Update).

महाबळेश्वरच्या काही भागात दवबिंदू गोठले

महाबळेश्वरच्या काही भागात दवबिंदू गोठले आहेत. महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा पारा घसरला आहे. वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरामध्ये 6 अंश एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.

Maharashtra Winter Weather Update

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार? संशोधनात धक्कादायक खुलासा

Nagpur | नागपूरसह विदर्भात वाढणार थंडी, हवामान खात्याचा अंदाज

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.