AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, आदित्य ठाकरे, पटोले, वडेट्टीवारांच्या नेतृत्वात सत्ताधाऱ्यांची कुरघोडी

आज विधीमंडळात शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय वडेटटीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने 'राज्यपाल हटाव' ची मोहीम हाती घेतली. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, आदित्य ठाकरे, पटोले, वडेट्टीवारांच्या नेतृत्वात सत्ताधाऱ्यांची कुरघोडी
| Updated on: Mar 03, 2022 | 12:15 PM
Share

मुंबईः महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मागणीसाठी भाजप आक्रमक झाली तर राज्यपाल भगत सिंह कोश्यारींविरोधात (Bhagatsingh Koshyari) शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादीच्या नेत्यांची कुरघोडी दिसून आली. राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी (Mahavikas Aghadi) राज्यपालांविरोधात जोरदार मोहीम उघडली. चार दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत केलेल्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीने राज्यपालांचा राजीनामा घेतला जावा, या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे.

आदित्य ठाकरे, पटोले, वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आंदोलन

आज महाविकास आघाडीने विधी मंडळात राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन छेडलं. औरंगाबाद येथे चार दिवसांपूर्वी त्यांनी शिवाजी महाराजांविषयीचं एक वक्तव्य केलं होतं. समर्थ रामदासांशिवाय शिवाजी महाराजांच्या जीवनाला काय अर्थ, अशा आशयाचं वक्तव्य केल्याने राज्यपालांविरोधात राष्ट्रवादी सह महाविकास आघाडी सरकारचे नेते आक्रमक झाले आहेत. आज विधीमंडळात शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय वडेटटीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने ‘राज्यपाल हटाव’ ची मोहीम हाती घेतली. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

औरंगाबादचं वक्तव्य ते विधिमंडळ सभागृह

औरंगाबादमध्ये रविवारी स्वातंक्ष्याचा अमृत महोत्सव तसेचे राजभाषा मराठी दिनाचं औचित्य साधून श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘चाणाक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल, शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं..’ असं वक्तव्य राज्यपालांनी केलं. मात्र समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच हे कोर्टात सिद्ध झालंय, राज्यपालांना इतिहास माहिती नसेल तर त्यांनी तो जाणून घ्यावा, आधी राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूणच महाविकास आघाडीतर्फे केली जात आहे. राज्यपालांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आमदारांनी आज जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे गुरुवारी विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांनी अभिभाषण अगदी थोडक्यात आटोपून विधीमंडळ सोडून काढता पाय घेतला.

इतर बातम्या-

अमेरिकेची दादागिरी, रशियाच्याविरोधात मतदान केलं नाही म्हणून भारतावर निर्बंध लादणार?

जुते मारो सालों को, भाजपाच्या आमदारांकडून भरसभागृहात नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी घोषणाबाजी

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.