Nashik | 6 नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फाटाफूट; 311 उमेदवार रिंगणात

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या 6 नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्याचे समोर आले आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने एकमेकांविरोधात उमेदवार देत शड्डू ठोकला आहे.

Nashik | 6 नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फाटाफूट; 311 उमेदवार रिंगणात
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 9:28 AM

नाशिकः नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या 6 नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्याचे समोर आले आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने एकमेकांविरोधात उमेदवार देत शड्डू ठोकला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 32 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. आता 311 उमेदवार रिंगणात आहेत. कळवण तालुक्यात सगळ्यात जास्त म्हणजे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घतले. त्यात अंतिम उमेदवारांची निश्चिती झाल्याने लढती स्पष्ट झाल्या आहेत. विशेष म्हणजे आजपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होत आहे.

21 डिसेंबर रोजी मतदान

नाशिक जिल्ह्यातील निफाड, देवळा, पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी आदी नगरपंचायतींच्या प्रत्येकी 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे रखडलेल्या दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीचीही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. येथेही 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

अशा होणार लढती

दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगणार आहे. पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जागांवर निवडणूक होत आहे. निफडामध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होईल. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होणार आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होणार आहे.

देवळ्यात आमने-सामने

देवळा नगरपंचायतीमध्ये तीन प्रभागात महाविकास आघाडी आमने-सामने उभी आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने 10 तर काँग्रेसने 2 उमेदवार दिले आहेत. निफाडमध्ये शहर विकास आघाडी आणि शिवसेना एकत्र लढत आहे. या ठिकाणी शहर विकास आघाडी 4 आणि शिवसेना 6 जागा लढवणार आहे. येथे शहर विकास आघाडीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने पॅनल उभारून दंड थोपटले आहेत. तर तिसरे पॅनल भाजपने उतरवले आहे.

माकपविरुद्ध भाजप

सुरगाणा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सर्व जागा लढत असून, त्यांनी 17 उमेदवार उभे केले आहेत. त्यांची मुख्य लढत भाजपसोबत असेल. या जागी काँग्रसने 13 उमेदवार दिले आहेत. कळवणमध्येही महाविकास आघाडीत फाटाफूट झाली आहे. या ठिकाणी भाजप 14 जागा लढत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 10, काँग्रेस 4 निवडणूक लढवणार आहे. तर 5 अपक्ष रिंगणात आहेत. येथे शिवसेना आणि मनसेनेही उमेदवार दिले आहेत.

दिंडोरीत राष्ट्रवादीचे स्वबळ

दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत आहे. येथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. येथे भाजप आणि शिवसेनेमध्ये युतीसाठी प्रयत्न झाले. मात्र, त्यांना यश आले नाही. पेठमध्ये शिवसेना 16 जागावर तर राष्ट्रवादी काँग्रेसने 15 जागांवर उमेदवार दिले आहेत. येथेही महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. पेठमध्ये माकपने 11 जागी उमेदवार उभे केले आहेत.

इतर बातम्याः

हॉर्न वाजवलात, गाडी चालवताना मोबाईलवर बोललात, हेल्मेट नाही घातलात तर सावधान, आजपासून खिसा रिकामा होणार, नियम लागू

केंद्राचा पुन्हा महाराष्ट्रासोबत दुजाभाव? केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे कार्यालय नागपुरहून थेट दिल्लीला हलवले

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.