महायुती आज सत्तास्थापनेचा दावा करणार; गटनेता निवडीबाबत भाजपची बैठक

Mahayuti Claim To Maharashtra Government Formation : महाराष्ट्रात आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आज महायुती सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. तर गटनेता निवडीबाबत भाजपची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तर भेटीगाठींचा सिलसिलाही वाढला आहे. वाचा सविस्तर बातमी...

महायुती आज सत्तास्थापनेचा दावा करणार; गटनेता निवडीबाबत भाजपची बैठक
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 8:58 AM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस झाले आहेत. असं असताना अद्यापपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. किंबहुना राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव देखील जाहीर झालेलं नाही. तर आता आज सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहेत. महायुतीचे महत्त्वाचे नेते सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांच्या निवासस्थानी जाणार आहेत. भाजपच्या गटनेतेपदी कोण असणार? याबाबतची स्पष्टता नाहीये. गटनेतापदी कोण असणार? याबाबत भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण हे कालच मुंबईत दाखल झाले आहेत.

शिंदे- फडणवीसांमध्ये चर्चा

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे. अर्धातास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. शपथविधी सोहळ्याआधी शिंद- फडणवीसांमध्ये चर्चा झाली. यावेळी गिरीश महाजनदेखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजनांमध्ये बंद दाराआड 30 मिनिटं चर्चा झाली. खातेवाटप, शपथविधी आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. ‘वर्षा’ बंगल्यावरच्या बैठकीनंतर गिरीश महाजनांनी ‘सागर’ बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाचा आग्रह करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी त्यांचा निर्णय बदलल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. तर गृहमंत्रिपदावरून मागच्या काही दिवसांपासूनरस्सीखेच सुरु आहे. त्यावरही तोडगा निघाल्याची माहिती आहे. गृहखात्याऐवजी नगरविकास खातं आणि आणखी एखादं महत्वाचं खास शिंदे गटाला दिलं जाणार असल्याची माहिती आहे.

शपथविधी सोहळ्याला साधू महंताना निमंत्रण

मुख्यमंत्री आणि महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील 400 साधू महंताना निमंत्रण देण्यात आलं आहे. नाशिकमधून देखील अनेक साधू महंत उपस्थित राहणार आहेत. अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडून निमंत्रण देण्यात आलं आहे. नाशिकमधून महंत सुधिरदास महाराज, महंत अनिकेत शास्त्री महाराज, महंत भक्तीचरणदास , रामकृष्ण महाराज लहवितकर, संजय धोंगडे , माधवदास राठी यांच्यासह अनेक साधू महंत उपस्थित राहणार आहेत.

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.