असा आहे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा फॉर्म, ‘या’ 12 गोष्टी भरल्यावरच…

राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. विशेष म्हणजे महिलांसाठी खास योजनेची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना दर महिन्याला दीड हजार रूपये मिळणार आहेत.

असा आहे 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा फॉर्म, 'या' 12 गोष्टी भरल्यावरच...
adki bahini yojana
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 7:54 PM

राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत महिलांना दरमहिन्याला दीड हजार रूपये मिळणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट असणार आहे. त्यापूर्वीच महिलांना अर्ज करावी लागणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना काही कागदपत्रांची पुर्तता करणेही आवश्यक आहे. विशेष म्हणजे या योजनेत काही बदल देखील करण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी असा करा अर्ज 

या योजनेसाठी महिलांना अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन करावा लागणार आहे. अगदी सोप्प्या पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी महिलेला सर्वात अगोदर आपले संपूर्ण नाव लिहावे लागले. जर लग्न झाले असेल तर लग्नाच्या अगोदरचे आणि लग्नानंतरचे संपूर्ण नाव लिहावे लागेल.

पुढे जन्मतारीख आणि संपूर्ण पत्ता लिहिणे देखील आवश्यक आहे. जन्माचे ठिकाण आणि पिनकोड लिहिले देखील आवश्यक आहे. मोबाईल नंबर आणि आधारकार्ड नंबर देखील आवश्यक आहे. या अर्जामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न विचारण्यात आलाय की, इतरही कोणत्या शासकीय योजनेचा संबंधित महिला लाभ घेत आहे का? असेल तर हो तिथे लिहावे लागेल.  अर्जामध्ये वैवाहिक स्थितीबद्दलही महिलांना माहिती द्यावी लागेल.

यासोबतच बॅकेची संपूर्ण माहिती आणि बॅकेचा क्रमांक अर्जामध्ये विचारण्यात आला आहे. ते व्यवस्थितपणे द्यावे लागेल. बॅक क्रमांक आधारकार्डला जोडला आहे का? हे देखील अर्जात विचारण्यात आले आहे. यासोबत भरलेला अर्ज आपल्याला अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यांच्याकडून तपासून घेऊ शकता.

adki bahini yojana

अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक 

आधार कार्ड, अधिवास\जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बॅंक पासबुक आणि यासोबतच अर्जदाराचे फोटोही आवश्यक आहे.

भरलेला अर्ज कुठे जमा करायचा, जाणून घ्या 

अर्जदाराने संपूर्ण भरलेला अर्ज संबंधित अंगणवाडी केंद्रावर जमा करायचा आहे. सेतू सुविधा केंद्रावरही आपण अर्ज जमा करू शकता. राज्यभरातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रांवर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळतंय. उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठीही मोेठ्या रांगा लागल्याचे बघायला मिळतंय. योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, आधार अपडेट्ससाठीचे सर्व्हर स्लो झाल्याचे देखील अनेक ठिकाणी बघायला मिळतंय.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.