बाकी कशाचा नाद करा, पण या विषयात नाद करायचा नाही, लाडकी बहीण योजनेवरुन शिंदेंचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात बोलताना विरोधकांना इशारा दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आज पुण्यात करण्यात आला. त्यामुळे मुख्मयंत्री म्हणाले की, या योजनेवरुन नाद करायचा नाही. हम दो हमारे दो, तुम्हाला गरीबी नाही कळणार.

बाकी कशाचा नाद करा, पण या विषयात नाद करायचा नाही, लाडकी बहीण योजनेवरुन शिंदेंचा इशारा
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 3:48 PM

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पुण्यात लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी बहिणींशी संवाद साधून स्वातंत्र्य दिन साजरा केला. अनेक बहिणींनी भावना व्यक्त केल्या. आम्हाला आधार मिळाला म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता. सरकार स्थापन झाल्यापासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. हे सरकार पडणार असं वारंवार सांगत आहेत. पण बहीण आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सरकार अधिक मजबूत झालं. बहिणीच्या हिताच्या आड कोणी आला तर गाठ माझ्याशी आहे. व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे. बाकी कशाचा नाद करा. पण या विषयात नाद करायचा नाही. आम्ही भाऊ म्हणून समर्थ आहोत.

देना बँक आहे लेना बँक नाही

या राज्यातील सामान्य बहीण भाऊ आणि वरिष्ठ ज्येष्ठांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणायचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो. आमचं सरकार तेच करतं. सर्व सामान्यासंसाठी या योजना राबवत असतो. काही लोकं म्हणाले पैसे मिळणार नाही. आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर काढून घ्या. पण तुम्हाला सांगतो हे देणारं सरकार आहे. घेणारं नाही. ही देना बँक आहे. लेना बँक नाही.

पैसे गेले नसतील तरी चिंता करु नका

ज्या बहिणीच्या खात्यात पैसे गेले नसतील त्यांच्या खात्यात पैसे जाईल. ज्यांचं आधार लिंक राहिलं असेल त्यांनाही पैसे मिळेल. ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. ऑगस्टमध्ये अर्ज भरल्यावर तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळतील. तुम्हाला दर महिन्याला दीड हजाराचा माहेरचा आहेर मिळणार आहे.

यांना गरीबी काय माहीत- शिंदे

हम दो हमारे दो एवढंच ज्यांना कळतं त्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार. यांना गरीबी काय माहीत. मीही शेतकरी कुटुंबातून आलो आहे. माझी आई कशी कसरत करायची मला माहीत आहे. माझ्या आई वडिलांनी कसे हाल सहन केले याचा मी साक्षीदार आहे. आम्ही संघर्ष करून आलो. सोन्याचा चमचा घेऊन नाही आलो. आम्ही चटके सोसले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.