Malegaon Corona | राजेश टोपेंसोबत बैठक सुरु असतानाच रिपोर्ट आला, मालेगावचे मनपा आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह
मालेगावातील महापालिका आयुक्तांसह एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. एका महापालिका आयुक्तालाच कोरोना झाल्याने मालेगावातील जनतेची चिंता वाढली आहे.
नाशिक : नाशकातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या (Municipal Corporation Commissioner Corona Report) मालेगावातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालेगावातील महापालिका आयुक्तांसह एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. एका महापालिका आयुक्तालाच कोरोना झाल्याने मालेगावातील जनतेची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक सुरु असताना या पालिका आयुक्तांना कोरोना (Municipal Corporation Commissioner Corona Report) झाल्याची माहिती मिळाली.
मालेगाव हे कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं आहे. नाशकात सध्या कोरोनाचे एकूण 741 रुग्ण आहेत. त्यापैकी एकट्या मालेगावात 616 रुग्ण आहेत. शिवाय, मालेगावातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
Pune Corona Discharge | पुण्यात कोरोनाबाधित डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या वाढली, 12 दिवसात 937 जणांना डिस्चार्जhttps://t.co/rGXekEhicN #CoronaUpdatesInIndia #CoronavirusIndia
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 13, 2020
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासोबत मालेगावात आज दुपारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालिका आयुक्त आणि इतर अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते (Municipal Corporation Commissioner Corona Report). अगदी आमोरासमोर ही बैठक सुरु होती. बैठक सुरु असतानाच पालिका आयुक्तांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं कळालं. त्यानंतर आयुक्तांना तात्काळ क्वारंटाईन कक्षात नेण्यात आलं.
काहीच दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला. या अहवालात आयुक्त आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
आज आलेल्या 40 अहवलांपैकी 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 7 पुरुष आणि 2 महिलांचा (Municipal Corporation Commissioner Corona Report) समावेश आहे.
संबंधित बातम्या :
‘कोरोना’ला हरवणारी 94 वर्षीय आजी, महाराष्ट्रातील सर्वात वयोवृद्ध रुग्णाची कोरोनावर मात
Ratnagiri Corona | कोकणात प्रवेशापूर्वी चाकरमान्यांची तपासणी होणार, कशेडी घाटात वाहनांची गर्दी
सोलापूरमध्ये 152 पोलिसांना घरीच थांबण्याचे आदेश, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय