AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारे शिल्पकार जयदीप आपटे ‘नॉट रिचेबल’

malvan shivaji maharaj statue: ठाणे येथील 25 वर्षीय युवा शिल्पकार जयदीप आपटे यांना राजकोट येथील शिवाजी महाराजाचा पुतळा निर्मितीची जबाबदारी दिली होती. त्यांना शिल्पकलेचा फक्त अडीच वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत दोन फुटांपर्यंतचे पुतळे उभारले आहेत

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारे शिल्पकार जयदीप आपटे 'नॉट रिचेबल'
शिल्पकार जयदीप आपटे 'नॉट रिचेबल'
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 11:29 AM

Jaideep Apte: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दोन दिवसांपूर्वी पडला. यामुळे तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. आता या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटे सर्व कुटुंबासोबत घराला टाळे लावून गेले आहे. दोन दिवसांपासून ते नॉट रिचेबल झाले आहेत. मंगळवारी दुपारपर्यंत सुरू असलेल्या त्यांचा मोबाईल क्रमांकही आता बंद आहे. तसेच कल्याण पश्चिमेत त्यांचा कारखाना आहे. तो कारखाना देखील ताडपत्रीच्या साह्याने बंद करण्यात आला आहे.

कोण आहेत जयदीप आपटे

ठाणे येथील 25 वर्षीय युवा शिल्पकार जयदीप आपटे यांना राजकोट येथील शिवाजी महाराजाचा पुतळा निर्मितीची जबाबदारी दिली होती. त्यांना शिल्पकलेचा फक्त अडीच वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत दोन फुटांपर्यंतचे पुतळे उभारले आहेत, असे त्यांनीच एका मुलाखतीत म्हटले होते. 28 फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांना तीन वर्ष लागली होती. इतका कमी अनुभव असताना त्यांना हे काम कसे दिले गेले? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठा महासंघ आक्रमक

शिल्पकार जयदीप आपटे याला कठोर शासन व्हावे व त्याला फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकारी मोशमी बर्डे- चौगुले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. पुण्यात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. कोथरूडमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले गेले. बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीतर्फे आज मालवणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा निषेध नोंदवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. भरड नाका ते मालवण तहसीलदार कार्यालयावर मोर्चा निघणार आहे.

भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?.
Operation Sindoor : देशाचा दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला?
Operation Sindoor : देशाचा दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला?.
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला
26/11 च्या अतिरेक्यांना जिथं प्रशिक्षण तेच अड्डे उडवले, 9 ठिकाणी हल्ला.
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका कारण...अमेरिकेकडून पाकला इशारा.
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ
भारताचा कट्टर शत्रू मसूद अजहर, हाफिज सईदचा ढगात? बघा हल्ल्याचे व्हिडीओ.
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर
भारताकडून पाकिस्तानचा बदला, मध्यरात्री 'या' 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर.
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.