देवेंद्र फडणवीस नव्हे तर महिला नेत्याला मुख्यमंत्री करा; ‘त्या’ नेत्याच्या मागणीने भुवया उंचावल्या

Maharashtra New CM Name : महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होणार आहे. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत चर्चा होत आहे. अशातच काही नावं समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. वाचा सविस्तर बातमी...

देवेंद्र फडणवीस नव्हे तर महिला नेत्याला मुख्यमंत्री करा; 'त्या' नेत्याच्या मागणीने भुवया उंचावल्या
देवेंद्र फडणवीस, भाजप नेतेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 3:07 PM

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या सत्ता स्थापनेकडे… महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार? मंत्रिमंडळात कुणा- कुणाचा समावेश असणार? याबाबत चर्चा होताना पाहायला मिळत आहे. तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार? याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तर दिल्ली दरबारी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. अशातच भाजपच्या महिला नेत्याला मुख्यमंत्री करा, अशी मागणी करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या नेत्याने ही मागणी केली आहे.

“पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा”

ओबीसी आरक्षण बचाव समितीचे नेते मंगेश ससाणे यांनी ही मागणी केली आहे. ओबीसींना विरोध करणारा मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. मनोज जरांगे पाटीलचा खुटा ओबीसीने उपटला आहे.महायुतीसाठी ओबीसी समाज निर्णायक ठरला आहे. ओबीसी समाज्याला मुख्यमंत्री पद द्यावं, असं ससाणे यांनी म्हटलं. छगन भुजबळ किंवा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री कराव अशी आम्ही मागणी करतोय महायुतीने याचा विचार करावा अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला फटका बसेल. आम्हाला वाटत नाही लक्ष्मण हाके यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल… भेटलं तर स्वागत आहे, असं मंगेश ससाणे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत राज्यात सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. यावेळी 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे. यात भाजपचे 10, शिवसेना शिंदे गटाचे सहा तर अजित पवार गटाचे चार आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली असल्याने शिवसेना शिंदे गटाला मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा आहे. एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून शिंदे गट आग्रही आहे. तर भाजपला 132 जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा, अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण असणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?.
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?.
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.