AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिषजी, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा…; शिवसेना नेत्या Manisha Kayande यांचा शेलारांना इशारा

हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. शेलार यांच्या या विधानाचा शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी समाचार घेतला आहे.

आशिषजी, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा...; शिवसेना नेत्या Manisha Kayande यांचा शेलारांना इशारा
शिवसेना नेत्या Manisha Kayande यांचा शेलारांना इशाराImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 4:30 PM

मुंबई: हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार  (ashish shelar) यांनी केला होता. शेलार यांच्या या विधानाचा शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी समाचार घेतला आहे. आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला. अन्यथा शिवसैनिक (shivsainik) तुम्हाला पळता भूई सोडणार नाही, असा इशाराच मनिषा कायंदे यांनी दिला आहे. कायंदे यांनी ट्विट करत शेलार यांना हा इशारा दिला आहे. तसेच आतापर्यंत कोरोना परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू सणांना परवानगी दिली आहे. आरोग्याला प्राधान्य दिल्यानेच महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात राहिला आहे, असंही कायंदे यांनी म्हटलं आहे. शेलार यांची टीका आणि कायंदे यांचं त्यावरच प्रत्युत्तर यामुळे हिंदू सणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आगामी काळात आमने सामने येण्याची चिन्हे दिसत आहेत.

शेलार काय म्हणाले होते?

आशिष शेलार यांनी आज सकाळी मीडियाशी संवाद साधताना हिंदू सणांवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. मुंबई पोलीसांनी मुंबईत 10 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्‍यासाठी आतंकवादी, देशविरोधी शक्‍ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्‍ला करतील अशी माहिती पोलिसांकडे आल्‍याचे ते सांगत आहेत. अशी माहिती आली असेल तर त्‍याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्‍यावी. या कारणाने मुंबईत जमावबंदीचे कमल लावण्‍यात आले आहे. मात्र याच काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम येतात. म्‍हणून आमचा सरकारला सवाल आहे की, हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो? आणि रामभक्‍तांचा विषय आला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते? असा सवाल त्यांनी केला. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोन्‍ही सणांना परवानगी देण्‍यात याव्‍यात. या कार्यक्रमात खोडा टाकू नये. आम्‍ही या मंडळ व समित्‍यांसोबत चर्चा करीत असून या उत्‍सवात भाजपा सहभागी होईल, असे आशिष शेलार यांनी म्हटलं होतं.

6 ते 14 एप्रिल भाजपचा सेवा सप्ताह

6 एप्रिल हा भाजपाचा स्‍थापना दिन असून या निमित्‍ताने एक व्‍यापक कार्यक्रम देश पातळीवर हाती घेण्‍यात आला आहे. भाजपा हा देशातील सर्वात मोठा सेवाकार्य करणारा पक्ष असून जमिनीवर काम करणारा तसेच महाराष्‍ट्रात सर्वात जास्‍त जनसमर्थन मिळालेला पक्ष आहे. म्‍हणून 6 एप्रिलला मुंबईतील प्रत्‍येक शक्‍ती केंद्रावर भाजपातर्फे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्‍यात येणार आहे. सकाळी पावणे दहाच्‍या दरम्‍याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपा पक्ष कार्यकर्ते आणि जनतेला जाहीर संबोधि‍त करणार आहेत. मुंबईत 1500 पेक्षा जास्‍त ठिकाणी या निमित्‍ताने सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून 6 एप्रिल ते 14 एप्रिल हा सप्ताह सेवा सप्‍ताह म्‍हणून भाजपा देश पातळीवर साजरा करणार आहे, असे त्‍यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, भाजप विरोधात एकत्र या, mamata banerjee यांचा एल्गार, पवारांसह गैरभाजप मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्रं

VIDEO: पवारांनी काय केलं ते सोडा, सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली?; अमोल मिटकरींची खोचक टीका

Maharashtra News Live Update : दिल्ली विधानसभा पेपरलेस होणार, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची घोषणा

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.