चित्रपटानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने शाळा, कुठे अन् कोणी घेतला निर्णय
maratha reservation manoj jarange: मनोज जरंगे पाटील यांनी अखेर उपोषणाचा बुधवारी पाचवा दिवस आहे. त्यापूर्वी चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालवली होती. त्यामुळे त्यांनी औषधोपचार घ्यावे, यासाठी दोन वेळा डॉक्टरांचे पथक केले. परंतु त्यांनी औषध उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर बुधवारी मध्यरात्री त्यांनी औषध उपचार घेतले.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट येत आहे. संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील आणि मर्द मावळा शिवरायांचा वाघ हे चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची संघर्षकथा मांडण्यात आली आहे. आता मनोज जरांगे यांचे नाव शाळांनाही देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शाळेला मनोज जरांगे पाटील यांच नाव देण्याचा ठराव मंजूर झाला आहे. बार्शी तालुक्यातील जय जगदंब शिक्षण संस्थेने मुंगशी विद्यालयाला जरांगे पाटील यांचं नाव देण्याचा ठराव करण्यात आला.
मनोज जरांगे पाटील यांना दिले पत्र
जय जगदंब शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर तुमचे नाव शाळेला देण्याची अनुमती मिळावी यासाठी पत्र दिले आहे. तसेच जरांगे पाटील यांना नामांकरण सोहळ्याचे सुद्धा निमंत्रण संस्थेनेकडून देण्यात आले आहे. याबाबत मनोज जरंगे पाटील यांच्याकडून शिक्षण संस्थेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
मनोज जरांगे उपस्थित राहणार
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे स्वतः या नामकरण सोहळ्याला उपस्थित असणार असल्याचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कपिल कोरके सांगितला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच शाळेला नाव देण्याचा पहिला मान सोलापूर जिल्ह्याला भेटला आहे.बार्शी तालुक्यातील मुंगशी या गावामध्ये 1998 साली या विद्यालयाची स्थापना करण्यात आली होती.
मनोज जरांगे यांनी घेतले औषधोपचार
मनोज जरंगे पाटील यांनी अखेर उपोषणाचा बुधवारी पाचवा दिवस आहे. त्यापूर्वी चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालवली होती. त्यामुळे त्यांनी औषधोपचार घ्यावे, यासाठी दोन वेळा डॉक्टरांचे पथक केले. परंतु त्यांनी औषध उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर बुधवारी मध्यरात्री त्यांनी औषध उपचार घेतले. जरांगे पाटील यांनी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करण्यासाठी उपोषण सुरु केले आहे. चार दिवस त्यांनी अन्न पाणी आणि औषधोपचार घेतला नव्हता. परंतु काल रात्री यांच्यावर वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून औषध उपचाराला सुरुवात करण्यात आली. सलग उपोषण केल्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्याने त्यांना औषध उपचाराची गरज होती.