Monsoon Update : बुलडाणा जिल्ह्यातील अनेक मंडळांना अतिवृष्टीचा फटका; पिके पाण्याखाली

heavy rain चार ऑगस्ट रोजी झालेल्या पवासाचा मोठा फटका चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ आणि मेरा खुर्द मंडळातील दहा गावांना बसला आहे. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Monsoon Update : बुलडाणा जिल्ह्यातील अनेक मंडळांना अतिवृष्टीचा फटका; पिके पाण्याखाली
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 12:00 PM

बुलडाणा : जून आणि जुलै महिन्यात राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी (heavy rain) झाली होती. या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना आलेल्या पुराचा (flood)  मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. पुराचे पाणी शेतात घुसल्याने हजारो हेक्टरवरील पीक वाया गेलं. ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. मात्र पावसाने उघडीप दिल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र आता पुन्हा एकदा पावसाला (rain) सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.  जिल्ह्यात चार ऑगस्ट रोजी झालेल्या पवासाचा मोठा फटका चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ आणि मेरा खुर्द मंडळातील दहा गावांना बसला आहे. या परिसरात 100 मिलीमिटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे पाणी शेतात साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय.  शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी सुरू आहे.

शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ आणि मेरा खुर्द मंडळात 4 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली होती, या पावसामुळे दोन्ही मंडळातील भरोसा, रामनगर, मुरादपूर, शेळगाव आटोळ, मिसाळवाडी, अमोना,  इसरूळ,  मंगरूळ,  देऊळगाव धनगरसह पिंपळवाडी, कोनड या गावातील नदी, नाल्यांना मोठा पूर ही आला होता . यामुळे पीके उद्धवस्त  तर झालीच शिवाय शेत जमीनीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.  अनेक भागांमध्ये शेतीत गुडघाभर पाणी साचल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदिल झालाय.  महसूल प्रशासनाकडून  या नुकसानग्रस्त भागाची पहाणी करून आढावा घेण्यात आला आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या या शेतकऱ्यांना आता मदतीची अपेक्षा आहे.

हे सुद्धा वाचा

राज्याच्या ईतर भागातही मुसळधार पाऊस

दरम्यान राज्याच्या इतर भागात देखील जोरदार पाऊस सुरू असल्याचे पहायाल मिळत आहे. मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तर मुंबईमध्ये देखील रविवारी रात्रभर पाऊस सुरू होता. आता विश्रांती दिली आहे. मात्र पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पवासाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच मच्छिमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.