AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, आता सामूहिक आमरण उपोषण करणार

"जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालणार आहे आणि मी जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत देखील. आणि यावर मी ठाम आहे. हे आमरण उपोषण अंतरवाली सराटीमध्येच होईल", अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, आता सामूहिक आमरण उपोषण करणार
मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 10:54 PM

मराठा नेते मनोज जरांगे पाटील आता पुन्हा आपल्या मागण्यांसाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात सामूहिक आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे यांनी बीडमध्ये आपल्या आगामी काळातील उपोषणाविषयी माहिती दिली. “आता निवडणूक झाली तो विषय संपला. मराठ्यांनी पटापट डोक्यातून काढून टाका. तुमचं काय तुमच्या जातीचं काय, तुमचं अस्तित्वाचं काय आणि तुमच्या लेकराचे भविष्य काय, त्यामुळे आता आरक्षणाच बघा. सगळ्या मराठ्यांनी आपल्या लेकराच्या भविष्याचं बघा. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण मराठ्यांनी एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणाला आंतरवाली सराटीतल्या तयारीला लागा”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

“सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख मी जाहीर करणार आहे. त्यामुळे सर्वांनी आंतरवालीकडे यायचं आहे”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं. “जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालणार आहे आणि मी जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत देखील. आणि यावर मी ठाम आहे. हे आमरण उपोषण अंतरवाली सराटीमध्येच होईल”, अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

‘कोणीही आलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही’

“हे आता सामूहिक आमरण उपोषण आहे. एकाच दिवशी एकाच वेळी अंतरवाली सराटीमध्ये सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. मी समाजाला सांगितलं होतं, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज आज माझ्या पाठीमागे आहे. आता कोणीही आलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. कोणीही आलं तरी समाजासाठी लढावं लागणार आहे. कोणीही येऊद्या तीच सासू आहे. आम्ही वटणीवर आणू शकतो. पुन्हा आले, वळवळ करसान, दादागिरी करसान किंवा दहशत वाजवण्याचा प्रयत्न करताना तर त्याचा तुम्हाला खूप वाईट परिणाम भोगावे लागतील. मराठ्यांच्या नादी लागू नका”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

‘मराठ्यांशिवाय राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही’

“ते आले काय आणि हे आले काय, ते जरी पुन्हा आले तरी आम्ही पुन्हा उपोषणाला बसणार. सरकार काय करतो, कोणात किती दम आहे हे आम्हाला चांगलं माहीत आहे. फक्त मराठ्यांची बेईमानी त्यांनी करायची नाही कारण शेवटी मराठ्यांशिवाय राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही. मराठ्यांनी दोघांचंही काम केलं जो पडला त्याचंही केलं आणि जो निवडून आला त्याचंही काम केलं. त्यामुळे दोघांनीही मराठ्यांच्या मदतीला यायचं. माज आणायचा नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.

“निवडून आलेला म्हणेल की आता ताण देणाऱ्यांचा बदला घेऊ आणि पडणारा म्हणेल की आता आपण मागे सरू. पण तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करा. जर कोणत्याही मतदारसंघात बघून घेऊ, असं करू तसं करू असं जर केलं तर पूर्ण राज्यातले मराठे तुमच्या तिथे घेऊन येईल. मराठ्यांवर अजिबात दडपण आणायचं नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘जेव्हा मी मैदानात होतो तेव्हा…’

“आपण मैदानातच नव्हतो. ज्यावेळेस आपण मैदानात होतो त्यावेळी आपण झटका दाखवलेला आहे. कोणी म्हणत असेल जरांगे फॅक्टर फेल गेला. पण मी त्यांना सांगतो की, मी मैदानातच नव्हतो. जेव्हा मी मैदानात होतो तेव्हा पाणी पाजलेलं आहे. मी जर बाहेर पडलो असतो तर 80 ते 90 जणांना बूक्का लावला असता. काही उमेदवार फक्त 2 हजार 5 हजार दहा हजार अशा मताने निवडून आलेले आहेत.. मी जर एक राऊंड मारला असता तर सगळे उलथे पालथे केले असते”, असेही जरांगे पाटील म्हणाले

“सुपडा साफ कधी तर आम्हाला दोघेही माहीत होतं की, हे काहीच कामाचे नाही. त्यामुळे निवडणुकीत आम्हाला आमचेच उमेदवार द्यायचे होते. पण आमचं समीकरण हुकलं. मराठ्यांशिवाय या राज्यात कोणीही सत्तेवर बसू शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाची बेईमानी करायची नाही. तर तुमच्या मुंडक्यावर बसलोच समजा. सामूहिक आमरण उपोषण सुरू”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“तीनही गॅजेट्ससह कुणबी आणि मराठा एकच आहे. या मागण्या मान्य केल्याच पाहिजे. नाहीतर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहे. हे सामूहिक आमरण उपोषण असं असणार आहे की पूर्ण देशात सुद्धा झालेलं नसेल. आणि सरकारचं डोकं बंद पाडणार”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.