उगाच ज्ञान पाजळू नका; मनोज जरांगे पाटील यांनी थेट बड्या मंत्र्यालाच झापलं

मराठ्यांची बॅक डोअर एंट्री होणार नाही. गावागावांत दबाव आणला जात आहे, कुणबी लिहिलं जातंय. कलेक्टरला अशा सूचना नाहीत, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत, त्यांना एकटं पडू देणार नाही. 26 नोव्हेंबरला राज्यात ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे. तिथे शक्ती प्रदर्शन करणार आहोत.दिवाळी नंतर आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत, असं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं.

उगाच ज्ञान पाजळू नका; मनोज जरांगे पाटील यांनी थेट बड्या मंत्र्यालाच झापलं
manoj jarange patilImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 9:38 PM

दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, संभाजीनगर | 8 नोव्हेंबर 2023 : आम्हाला शांततेत आरक्षण हवं आहे. आम्ही कुणावरही टीका करणार नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. आमचं कुणाशी वैर नाही. मी कुणावर टीका करणार नाही, असं मनोज जरांगे पाटील वारंवार सांगत होते. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ वगळता त्यांनी गेल्या दीड दोन महिन्यात एकाही नेत्यावर टीका केली नाही. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी मंत्र्यांनाच अंगावर घेण्यास सुरुवात केली आहे. टीका करणाऱ्या मंत्र्यांना जरांगे पाटील जशास तसे उत्तर देत आहेत.

सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. जरांगे पाटील यांनी या टीकेचा समाचार घेतला आहे. त्यांना काय वादळ दिसलं मला माहिती नाही. तानाजी सावंत यांचं विधान म्हणजे निव्वळ शोकांतिका आहे. त्यांचं मराठा समाजावर प्रेम असायला हवं होतं. तुम्ही आम्हाला ज्ञान पाजळायची गरज नाही. उगाच श्रीमंतीची शायनिंग मारू नका, असं झापतानाच तानाजी सावंत तुम्ही इतके दिवस झोपलेले होते का? आता वेळ गेल्यावर का सांगत आहात? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

पैशाची मस्ती आहे

गोरगरिबांची आणि पैशांची मस्ती आहे. आम्ही उद्या येतो असं सांगितलेलं आहे. उद्या म्हणत असतील तर त्यांना येवू द्या. टीका करण्यासाठी मी बोलत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी प्रकाश शेंडगे यांनाही प्रत्युत्तर दिलं. कुठलं आरक्षण घ्यायचं हे मराठा ठरवतील. तुम्ही सांगू नका, असं ते म्हणाले.

जास्तीचं रान खायचंय

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. आम्ही आरक्षण मागतोय. पुरावे आहेत. ते 2023नंतरचे थोडीच पुरावे आहेत. 1967 पासून मराठे हे ओबीसीत आहेत. आम्ही त्यांच्या आरक्षणात वाटेकरी होतच नाहीये. उलट त्यांनाच आमचं आरक्षण मिळालेलं आहे. ते जास्तीचं रान चाललं आहे म्हणून त्यांची खटपट सुरू आहे. त्यांचा विरोध आहे. यांना जास्तीचं रान खायचं आहे, अशी टीका त्यांनी केली.

शेंडगे काय म्हणाले?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रकाश शेंडगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. जरांगे पाटील यांनी समजून घ्यावं की मराठा हे मागास नाहीत. गुज्जर समाजाचं आंदोलन झालं, ट्रेन बसेस जाळल्या पण आरक्षण मिळालं नाही, हे त्यांनी समजून घ्यावं, असा सल्ला प्रकाश शेंडगे यांनी दिला होता. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांनी सरसकट दाखले देण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचं आम्हाला स्पष्ट केल्याचा दावाही त्यांनी केला.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....