Maratha Reservation | जमाव हिंसक झाला होता, महिला अन् लहान मुले टार्गेटवर…एसपींचा दावा

Maratha Reservation | राज्यात मराठा आरक्षणासाठी सर्वत्र आंदोलन सुरु आहे. परंतु हे आंदोलन हिंसक वळणावर आले आहे. बीडमध्ये लोकप्रतिनिधींची घरे जाळली. त्यावेळी जमाव हा हिंसक झाला होता. जमावाकडून महिला आणि लहान मुले टार्गेटवर होती, असा दावा बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केला आहे.

Maratha Reservation | जमाव हिंसक झाला होता, महिला अन् लहान मुले टार्गेटवर...एसपींचा दावा
nandkumar thakur beed SPImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 12:04 PM

महेंद्र मुधोळकर, बीड | 2 नोव्हेंबर 2023 : राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाले आहे. मराठवाड्यातील आंदोलन अधिकच गंभीर बनले. त्यामुळे बीड आणि धारशीवमध्ये संचारबंदी लागू करावी लागली होती. मराठवाड्यात लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ले झाल्याच्या घटना घडली होती. मराठा आंदोलनासंदर्भात टीव्ही ९ मराठीने बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लोक प्रतिनिधींच्या घरी जाळपोळ झाली. त्यावेळी जमाव हा हिंसक झाला होता. जमावाकडून महिला अन् लहान मुलांना टार्गेट करण्यात आले होते, असा दावा केला. हल्ला करणारे तरुण हे 17 ते 22 वयोगटातील तरुण होते, असेही त्यांनी सांगितले.

जमाव हिंसक बनला होता

बीडमध्ये हिंसाचार घडला हे अत्यंत दुर्दैवी आहे. लोक प्रतिनिधींच्या घरी जाळपोळ झाली. जमाव हा हिंसक झाला होता. जमावाकडून महिला लहान मुलांना टार्गेट करण्यात आले होते. जीव मारण्याचा आंदोलकांचा उद्देश असल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणात संपूर्ण बीड जिल्ह्यात 300 जणांची चौकशी केली आहे. आतापर्यंत 101 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होईल, असे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.

अनेक तरुण राजकीय पक्षांशी निगडीत

आंदोलन करणारे तरुण हे 17 ते 22 वयोगटातील आहेत. यातील काही तरुण हिंसक झाले होते. अनेक तरुण राजकीय पक्षाशी निगडित आहेत. त्यांच्या अटकेनंतर चौकशी सुरु झाली आहे. त्यातून अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. लोक समोर येवून आम्हाला आरोपीची माहिती देत आहेत. तसेच आम्ही आणखीन सीसीटीव्ही तपासात आहोत. जाळपोळ घटना घडविणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राहण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. तसेच कोणत्याही निरपराध व्यक्तींवर कारवाई होणार नाही. ज्यांनी हिंसक घटना घडविली त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे. ज्यांनी कट रचला आणि सहभाग घेतला, त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत, असे नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

बससेवा सुरु करणार नाही

मराठा आंदोलनात झालेल्या हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 44 आरोपींना पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. आंदोलकांनी बसेला टार्गेट केले आहे. त्यामुळे आम्ही बसेस लवकर सुरू करणार नाहीत. संपूर्ण वातावरण शांत झाल्यावर बसेस आणि इतर सेवा सुरू करणार आहोत, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.