मुंबईतील 7 डिसेंबरचा ओबीसी समाजाचा नियोजित मोर्चा रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय : प्रकाश शेंडगे

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचा नियोजित मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

मुंबईतील 7 डिसेंबरचा ओबीसी समाजाचा नियोजित मोर्चा रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय : प्रकाश शेंडगे
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 9:15 PM

मुंबई : डिसेंबर महिन्यातील सात तारखेपासून मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी समाजाचा मोर्चा मुंबईत धडकणार होता. यावेळी ओबीसी समाजकडून आरक्षण तसेच इतर अनेक मागण्या सरकार समोर मांडल्या जाणार होत्या. मात्र, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचा हा नियोजित मोर्चा रद्द करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. (march of OBC community cancelled due to corona pandemic)

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणांनी त्या अनुशंगाने तयारीदेखील सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘मोर्चाचे आयोजन करणे उचित होणार नाही. त्यामुळे सात डिसेंबरचा ओबीसी समाजाचा नियोजित मोर्चा रद्द केला आहे, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

13 डिसेंबरचा ओबीसी मेळावा होणार

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईला धडकणारा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. मात्र, ओबीसी समाजाचा 13 डिसेंबरला मराठवाड्यात होणारा मेळावा नियोजित तारखेलाच होणार, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. राज्याच्या ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या राज्य सरकारकडून ऐकल्या जातात. अगदी एका समाजासाठी नोकरभरती थांबवून इतर समाजाचं नुकसान केलं जातं. मात्र आमच्या ओबीसी मंत्र्यांचा आवाज मुख्यमंत्री आणि सरकारपर्यंत पोहोचत नाही. जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला किंवा तशी पावले उचलली गेली तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, अशी आक्रमक भूमिका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी 30  ऑक्टोबर रोजी घेतली होती. (march of OBC community cancelled due to corona pandemic)

संबंधित बातम्या :

…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, प्रकाश शेंडगे आक्रमक

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास…, प्रकाश शेंडगेंचा ठाकरे सरकारला इशारा

SEBC आणि OBC एकच, भाजपने मूर्ख बनवलं, नितीश कुमारांचा जो मुद्दा, तोच माझाही मुद्दा : हरिभाऊ राठोड

Non Stop LIVE Update
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.