Sindhudurg : सिंधुदुर्गच्या किनारपट्टी पर्यटनाला 31 ऑगस्टपर्यंत ब्रेक, साहसी जलक्रीडा व किल्ला होडी वाहतूक बंद

मेरीटाईम बोर्डाच्या आदेश जुगारून व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देशही मेरिटाईम बोर्डाकडून देण्यात आले होते. त्यानुसार आज मालवण मधील सर्व साहसी जलक्रीडा व्यावसायिकांनी व किल्ला होडी वाहतूक सेवा वाल्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले.

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या किनारपट्टी पर्यटनाला 31 ऑगस्टपर्यंत ब्रेक, साहसी जलक्रीडा व किल्ला होडी वाहतूक बंद
किल्ला होडी वाहतूकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 6:48 PM

सिंधुदुर्ग : कोकण (Konkan) म्हटलं की उंच उंच नारळाची झाडं, उंच डोंगर, घनदाट झाडी आणि समुद्र. निसर्गानं दिलेलं हे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हजारो पर्यटक हे सुट्ट्यांमध्ये कोकणाकडे वळत असतात. त्यात त्यांना मजा लुटायची असते ती उसळणाऱ्या लाटा, फेसाळलेलं निळंशार पाण्याची. येथील किनाऱ्यावर असणाऱ्या वाळूत आणि समुद्रातील साहसी खेळ खेळण्याची. तर बोटिंग हा विषयच वेगळा. पण गेली दोन वर्ष हा आनंद अनेकांना लुटताच आला नाही. कोरोना आला आणि सगळं थांबलं. त्यात पर्यटन (Tourist) ही आलंच. पण आता सर्व नियम शिथिल झाल्याने सगळं काही सुरळीत सुरू झालं आहे. त्यात कोकणाचं पर्यटनाकडे अनेकजन वळत आहे. मात्र असं सुरू असतानाच अनेकांच्या मनोरंजनावर आणि त्यांच्या ट्रिपवर औसान आलं आहे. कारण मेरीटाईम बोर्डाने (Maritime Board)25 मे ते 31 ऑगस्टपर्यंत साहसी जलक्रीडा व किल्ला होडी वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे सिंधुदुर्ग तसंच रायगड किनारपट्टी भागातील गजबजलेली पर्यटनाला ब्रेक लागला आहे. तर याबातमीमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांना निराश होऊन परतावं लागलं आहे.

किल्ला होडी वाहतूक सेवा बंद

सिंधुदुर्गामधील किनारपट्टी भागातील साहसी जलक्रीडा प्रकार तसेच किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा 25 मे ते 31 ऑगस्टपर्यंत बंद करण्याचे आदेश मेरीटाईम बोर्डाने दिले आहेत. त्यामुळे कोकणातील सिंधुदूर्ग किनारपट्टी भागातील गजबजलेले पर्यटन आजपासून बंद होणार आहे. कोकणाला सागरी किनार्‍याचं मोठं वैभव लाभलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा, देवबाग, तारकर्ली, मालवण, चिवला, दांडी, कुणकेश्वर, देवगड समुद्र किनाऱ्यावर अनेक वॉटर स्पोर्ट्सना चालना देण्यात आली आहे. दरम्यान या समुद्रकिनारी स्कुबा डायव्हिंग सोबत बनाना राईड्स, जेट स्की, पॅरासिलिंग सारखे साहसी वॉटर स्पोर्ट्स खेळले जातात. सध्या मान्सूनही वेशीवर आल्याने समुद्रामध्ये बदल होत असतात. वार्‍याचाही वेग वाढत असल्याने काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आता पर्यटन हंगाम संपत आल्याने अनेक पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या नौका किनार्‍यावर आणण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे येथील साहसी जलक्रीडा व्यावसायिकांनी व किल्ला होडी वाहतूक सेवा बंद करावी असे बोर्डाने म्हटले होते.

कडक कारवाईचे निर्देश

दरम्यान मेरीटाईम बोर्डाच्या आदेश जुगारून व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देशही मेरिटाईम बोर्डाकडून देण्यात आले होते. त्यानुसार आज मालवण मधील सर्व साहसी जलक्रीडा व्यावसायिकांनी व किल्ला होडी वाहतूक सेवा वाल्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले. मात्र यापासून अनभिज्ञ असणाऱ्या पर्यटकांना नाउमेद व्हावं लागलं.

हे सुद्धा वाचा

शासनाच्या या निर्णयामुळे पर्यटकात नाराजी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शांत व स्वच्छ समुद्र किनारे पर्यटकांना आकर्षित करत असतातच पण विदेशात पाहायला मिळणारे साहसी जलक्रीडा प्रकार या किनाऱ्यांवर करता येत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सिंधुदुर्गात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. निसर्ग सौंदर्याबरोबरच मालवण मधील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी ही दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. मात्र आता पर्यटकांना घेऊन किल्ल्यावर जाणारी प्रवासी होडी वाहतूक ही बंद केल्यामुळे मालवण जेटी वरूनच पर्यटकांना आजपासून किल्ल्याचे दर्शन घ्यावे लागत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पर्यटकात नाराजी असून थोडी मुदतवाढ देण्याची मागणी पुढे येत आहे.

तारकर्ली येथे मोठी दुर्घटना

दरम्यान तारकर्ली येथे स्कूबा डायव्हिंगची बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दोन पर्यटकांना आपला प्राण गमवावा लागला. या बोटीत 20 जण होते. या पार्श्‍वभूमीवर मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी मालवण बंदर कार्यालयास भेट दिली.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...