Market Committee Election| 14 बाजार समित्यांचे संचालक बिनघोर; नाशिकमध्ये कधीपर्यंत निवडणुका लांबल्या?

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमणार नाही. समितीच्या निवडणुका जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत सध्याचे संचालक मंडळच कामकाज बघेल. महाराष्ट्र शासनाने वेळापत्रकानुसार नियोजित निवडणुका पार पाडाव्यात, असे आदेश उच्च न्यायालयाने यापूर्वी एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान दिले आहेत.

Market Committee Election| 14 बाजार समित्यांचे संचालक बिनघोर; नाशिकमध्ये कधीपर्यंत निवडणुका लांबल्या?
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती.
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 10:01 AM

लासलगावः लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Agricultural Produce Market Committee) निवडणुकीला तिसऱ्यांदा 3 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समितीवरील संचालकांना आता 23 एप्रिल 2022 पर्यंत कामकाज करता येणार आहे. मात्र, त्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी शासनाची रितसर परवानगी घ्यावी लागेल, असे आदेश सहकार व पणन मंत्रालयाने काढले आहेत.

मुदतवाढ का मिळाली?

न्यायालयाने यापूर्वी एका निकालात आधी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम सहकारी निवडणूक प्राधिकरणाने रद्द केला. विभागाने प्रारूप मतदार यादी जाहीर करणे आणि त्यावर हरकती मागणविणेही पुढे ढकलले. बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी गट आहे. कोरोनामुळे सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे या गटातील सदस्यांना बाजार समिती निवडणुकीतील मतदानापासून वंचित रहावे लागले असते. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीआधी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हे पाहता जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलला आहे. त्यामुळे नाशिकसह पिंपळगाव, लासलगाव, नांदगाव, मनमाड, येवला, चांदवड, देवळा, उमराणे, घोटी, कळवण, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव व सुरगाणा आदी बाजार समित्यांची निवडणूक पुढे ढकलली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे विद्यमान संचालकांना मात्र थोडा फार दिलासा मिळाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

प्रशासक मात्र नाही

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमणार नाही. समितीच्या निवडणुका जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत सध्याचे संचालक मंडळच कामकाज बघेल. महाराष्ट्र शासनाने वेळापत्रकानुसार नियोजित निवडणुका पार पाडाव्यात, असे आदेश उच्च न्यायालयाने यापूर्वी एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान दिले आहेत. नाशिक बाजार समितीचा कार्यकाळ 19 ऑगस्ट 2021 रोजी संपला आहे. मात्र, कोरोनाच्या भयंकर लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार समितीला दोनवेळेस मुदतवाढ देण्यात आली. ही मुदवाढही प्रत्येक सहा-सहा महिन्यांची होती. त्यानंतरही सहकार व पणन विभागाने एक परिपत्रक काढून 23 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, सध्याही सोसायटींच्या निवडणुकामुळे बाजार समिती निवडणूक लांबणीवर पडली आहे.

इतर बातम्याः

Nashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया?

Nashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय?

Malegaon | 30 वर्षांपासून बंद असलेली खोली उघडली अन् मानवी कवटी, हाडे सापडली; मालेगावमध्ये खळबळ!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.