Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

लतादीदींच्या निधन वार्तेने सारा देश शोकाकुलय. त्यांच्या गाण्यांनी अनेकांना समृद्ध केलंय. तर कोणाच्या आयुष्याचा अखंड तुकडाच त्यांच्यात गुंतलाय.

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!
चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी काढलेले लता मंगेशकर यांचे चित्र आणि शेजारी कवी ग्रेसांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ.
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 1:55 PM

नाशिकः लतादीदींच्या निधन वार्तेने सारा देश शोकाकुलय. त्यांच्या गाण्यांनी अनेकांना समृद्ध केलंय. तर कोणाच्या आयुष्याचा अखंड तुकडाच त्यांच्यात गुंतलाय. लतादीदींच्या (Lata Mangeshkar) आवाजाने भल्याभल्यांना मोहिनी घातली. प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे (P.L.Deshpande) यांनी त्यांचा उल्लेख करताना म्हटले होते की, आकाशात सूर्य आहे. चंद्र आहे आणि त्यानंतर फक्त लताचा स्वर आहे. वि. स. खांडेकरांनी कितीतरी वर्षांपूर्वी ‘लता, छे कल्पलता!’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता. तर सुप्रसिद्ध कवी ग्रेसांनी ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’मध्ये लतादीदींवर एक मोहक कविता लिहिली.

शांताबाईंने केले ‘लता’ पुस्तक

लता मंगेशकर यांना पार्श्वगायनाच्या क्षेत्रात 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर शांता शेळके यांनी ‘लता’ या पुस्तकाचे संकलन केले. हे पुस्तक मंगेशकर ट्रस्टने प्रकाशित केले. त्यात नौशाद, आशा भोसले, प्र. के. अत्रे, वि. स. खांडेकर, ग. दि. माडगुळकर, वि. वा. शिरवाडकर, पंकज मलिक, भालजी पेंढारकर, दत्ता डावजेकर, सुधीर फडके, कुमार गंधर्व, सचिनदेव बर्मन, हृदयनाथ मंगेशकर, मजरुह सुलतानपुरी, रामूभैया दाते यांचे लेख आहेत. या मान्यवरांनी पुस्तकात आपल्याला माहित नसणाऱ्या लतादीदींचे किस्से, अनुभव सांगितलेत.

उषा मंगेशकर म्हणतात…

‘लता’ या पुस्तकात उषा मंगेशकर म्हणतात की, ‘लता आमच्याकडे एकटी कमावणारी होती. 14 वर्षांची आणि आम्ही आठ जण खाणारे होतो. त्यामुळे त्या काळात अगदी एक परकर पोलकं नेसून लता आठ महिने राहायची. आपल्या भावडांची म्हणजेच हृदयनाथ आणि उषा यांचे लाड करावे असं तिला वाटायचं. त्यांना चांगली कपडे घेऊन द्यावेत, पण ते शक्य नव्हतं. मग तीने एक दिवस मास्टर विनायक यांच्याकडून दोन ड्रेसेस मागून घेऊन आणली. चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या आणि अंगाने मोठे असलेले ड्रेसेस घालून हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर वावरू लागली.’

बडे गुलाम अली म्हणाले…

हृदयनाथ मंगेशकर ‘लता’ पुस्तकातील लेखात म्हणतात की, ‘जेव्हा एक खासगी मैफल चालू असताना रेडिओ लागला आणि लताचं गाणं लागलं तेव्हा बडे गुलाम अली म्हणाले की, ‘याला म्हणतात आवाज आणि आणि ती मैफल तिथेच बंद केली.’ लता मंगेशकर यांच्या सुरांनी कवी ग्रेसांनाही मोहिनी घातली होती. त्यांनी लता दीदींवर ‘लता मंगेशकर’ या नावाने एक कविता लिहिली. ती कविता त्यांच्या ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’ या कवितासंग्रहात आहे. त्या कवितेत ग्रेस म्हणतात…

माहेराहून गलबत आले मला सखीचे स्वप्न जडे हृदयामधल्या गुपितामध्ये निशिगंधाचे फूल पडे.

अंतर्ज्ञानी युगांप्रमाणे शब्द परतले घरोघरी जड बंधाच्या मिठीत रुसली चैतन्याची खुळी परी.

या वाटेवर रघुपती आहे त्या वाटेवर असे शिळा सांग साजणी कुठे ठेवू मी तुझा उमलता गळा?

डोळे पाणावणारी आठवण…

प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांनी आशाताई आणि लतादीदींच्या आठवणी लिहून ठेवल्यात. त्यात एका ठिकाणी ते म्हणतात, आशा लतासंदर्भात म्हणाली होती, ‘आम्ही दोघी दोन डोळ्यांसारख्या आहोत. जर एका डोळ्यात काही गेलं तर दुसऱ्यात पाणी येतं.’ एच. एम. व्ही.नं लताची साठी साजरी केली. आशानं मुळात भाषणासाठी नाव दिलं नव्हतं. पण ती आर. डी.सह आली व तिनं उत्स्फूर्त भाषण केलं. ती म्हणाली, ‘आजही माझ्या डोळ्यांपुढून ते चित्र हलत नाही. तिच्यापेक्षा मोठा असलेला तंबोरा घेऊन तिच्याच लांबसडक केसांवर बसून दीदी रियाज करतेय. देवळाच्या गाभाऱ्यातील घंटानादासारखा तिचा स्वर माझ्या कानात घुमतोय…’  मी लताला भारावलेलं पाहिलं.

‘लता ही एकच गायिका अशी आहे की जिचा अर्धा सूरही कमीजास्त होत नाही’ – पुण्यातील सत्कारात ओ. पी. नय्यर

‘लता मंगेशकरला एवढी मोठी गायिका का मानतात माहित्येय? माझ्यासारख्या बेसुऱ्या गायकाबरोबरही ती सुरात गाते’ – मुकेश

‘कंबख्त कभी बेसुरीही नही होती.’ – बडे गुलाम अली खाँ

इतर बातम्याः

Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली

लता मंगेशकरांचे गाणे आपल्याला कितीही आवडे, पण आपण ‘क्या कमाल कि गाती है’ असं नाही म्हणू शकत, का ते जाणून घ्या

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.