Milk Agitation LIVE: अहमदनगरमध्ये दूध दरवाढ आंदोलनात गर्दी, राम शिंदे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल

दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यभरात दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे (Milk Agitation in Maharashtra Latest Updates).

Milk Agitation LIVE: अहमदनगरमध्ये दूध दरवाढ आंदोलनात गर्दी, राम शिंदे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Aug 01, 2020 | 5:33 PM

मुंबई : दूध उत्पादक संघर्ष समिती आणि विरोधीपक्षांच्यावतीने राज्यभरात दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरु करण्यात आलं आहे (Milk Agitation in Maharashtra Latest Updates). राज्यभरात ठिकठिकाणी शेतकरी आपली दुभती जनावरं गावातील चावडीवर बांधत सरकारचा प्रतिकात्मक निषेध करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये दुधाचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीत भरच पडली आहे. दुधाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान याआधी मंत्रालयात बैठकही झाली, मात्र दुधाच्या दरावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

1. प्रति लिटर दुधाला 10 रु अनुदानाची मागणी 2. 30 रुपये दुधाला हमी भाव द्या 3. बाहेरुन आयात होणारी दूध पावडर बंद करा

LIVE Updates

  • दूध उत्पादक संघर्ष समिती आणि किसानसभेच्यावतीने दूध दरवाढीबाबत जोरदार आंदोलन करण्यात आलं. शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी यावेळी गाई चावडीवर बांधून सरकारचा प्रतिकात्मक निषेध केला.
  • वेळ गेलेली नाही, सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यकर्त्यांच्या दारात आंदोलन : अजित नवले
  • पुण्यातील मावळ येथे दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आक्रमक, चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली नायगाव येथील शासकीय दूध संकलन केंद्राबाहेर आंदोलन
  • पंढरपूरमध्येही दूध दरवाढ आंदोलनाला सुरुवात, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वात चंद्रभागा नदीच्यापात्रात विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन
  • रयतक्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पंढरपुरात नामदेव पायरीजवळ प्रतिकात्मक आंदोलन, विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून सरकारचा निषेध
  • जालन्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी रयत क्रांती संघटनेचं आंदोलन, परतूर शहरात मारुतीला दूध अभिषेक करुन एल्गार आंदोलन, दुधाला 10 रुपये दरवाढ मिळालीच पाहिजे, रयत क्रांती संघटनेचा विजय असो अशी घोषणाबाजी
  • औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या दूध आंदोलनाला भल्या सकाळी सुरुवात, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रतिकात्मक दगडांना दूध अभिषेक घालून आंदोलन, जिल्ह्यातील डोणगावातही दगडांना अभिषेक, शेतकऱ्यांकडून गावातील ग्रामदैवत गणपती बाप्पालाही दुग्धाभिषेक
  • बुलडाणामध्ये चिखलीत रयत क्रांती संघटनेचं दूध आंदोलन, चिखलीच्या मेहकर फाटावर दुधाचे टँकर अडवला, पहाटे 4 वाजल्यापासून कार्यकर्ते रस्त्यावर, दुधाची नासाडी न करता शेतकऱ्यांना शहरात जाण्यापासून अडवत माघारी पाठवले
  • रयत संघटनेची दुधाला प्रतिलिटर 10 रुपये आणि दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देण्याची मागणी, सरकारला सद्बुद्धी दे म्हणत मारोतीरायाला साकडे घातले
  • शेतकरी संपाचं नेतृत्व करणाऱ्या पुणतांबा गावात दूध दरवाढीसाठी आंदोलन, दूध उत्पादक शेतकरी, किसान क्रांती संघटना आणि मनसेचं संयुक्त आंदोलन, बळीराजाच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करत आंदोलन, सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, दुधाला प्रतिलिटर 30 रुपये देत उत्पादकांच्या खात्यात प्रतिलिटर 10 रुपये अनुदानाची मागणी
  • नाशिकमध्ये भाजपच्यावतीने मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन, दहावा मैलजवळ रास्ता रोको, दुधाला अनुदान मिळावं या मागणीसाठी भाजप आक्रमक
  • वाशिममध्ये दुधाला योग्य दर मिळावा म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचं आंदोलन, दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि खत टंचाई दूर करण्याचीही मागणी, वाशिम जिल्ह्याच्या काटा-कोंडाळा फाट्यावर दूध फेकून शासनाविरोधात घोषणाबाजी
  • नागपूर जिल्ह्यात भाजपचं दूध दरवाढीसाठी आंदोलन, अजनी गावातील दूध संकलन बंद पाडलं, भाजप महासचिव चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात आंदोलन
  • दूध दरवाढ आंदोलनाचे मनमाडमध्येही पडसाद, भाजप कार्यकर्त्यांनी शिर्डी-मालेगाव रस्ता अडवला, महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
  • दूध दरवाढीसाठी भाजप रस्त्यावर, भाजपचा रास्ता रोको आणि आसुड आंदोलन, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन, राहाता येथे नगर-मनमाड रस्त्यावर ठिय्या, विखे पाटलांकडून सरकार विरोधी घोषणा, उत्साही कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोदरम्यान दूध टँकरही अडवला, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सहकारी दूध संस्थाकडूनच दूध उत्पादकांची लूट, विखे पाटलांचा आरोप
  • निफाड तालुक्यात लासलगाव येथे दूध दरवाढीसाठी भाजपचं आंदोलन, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांच्या नेतृत्वात रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध, दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी
  • पायाला दुखापत झालेली असतानाही एकनाथ खडसेंचा मुक्ताईनगरमधील दूध आंदोलनात सहभाग, भाजप कार्यकर्त्यांचं हायवे क्रमांक 6 वर रास्ता रोको आंदोलन, आंदोलनात खडसेंसह रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे, रोहिनी खडसे, डॉक्टर राजेंद्र फडके उपस्थित
  • नाशिकमध्ये दूध आंदोलनादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, भाजप आमदार, खासदार आणि पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात, आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करणार असल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती
  • कोल्हापूरमध्ये दूधदर वाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांचं आंदोलन, प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली पुणे बंगळुरु महामार्गावर रास्ता रोको
  • अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात शेतकऱ्यांकडून दूध आंदोलनात सहभागी होत मोफत दूध वाटप शेतकरी नेते अनिल देठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, दूध दरवाढीच्या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचं ठिकठिकाणी मोफत दूध वाटप, काही ठिकाणी दगडाला दुग्धाभिषेक घालत सरकारचा निषेध
  • अमरावतीमध्ये वरुड येथे दूध आंदोलकांना पोलिसांची अटक, बस स्थानक वरुड येथे आंदोलन सुरु असताना कारवाई,अमरावती जिल्हात दूध आंदोलन पेटलं, शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर
  • नांदेड जिल्ह्यात भाजपचं जागोजागी आंदोलन, दूध दरवाढीच्या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक, कुठे दगडाला अभिषेक, तर कुठे रस्त्यावर दूध फेकलं, नांदेड जिल्हा ढवळला
  • सोलापूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शीत दूधदरवाढीसाठी आंदोलन, राज्यात आज दूध उत्पादक संघर्ष समिती आणि विरोधी पक्षांचं दूध दरवाढीसाठी आंदोलन
  • इचलकरंजी : शिरोळ तालुका भाजपच्यावतीने उदगाव येथील गोकुळ सॅटेलाईट डेअरी समोर राज्य सरकार विरोधात आंदोलन, दूध दरवाढ तसेच दूध भूकटीला अनुदान मिळावे यासाठी भाजप, रयत क्रांती संघटना, रासप, आरपीआयसह घटक पक्षांचं आंदोलन, आंदोलनस्थळी गायी नेऊन सरकारचा निषेध
  • मी खुप आंदोलनं केली आहेत, आपल्या मागण्यांसाठी आंदोलनं केली पाहिजे, मी आंदोलन करुनच मोठा झालो, आंदोलन हा कार्यकर्त्यांचा मूळ स्वभाव असला पाहिजे, या आंदोलनाला शुभेच्छा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
  • अहमदनगरमध्ये माजी मंत्री आणि भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल, दूध दरवाढीसाठी आंदोलन करताना गर्दी जमवल्याचा ठपका, कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अकोले

दूध उत्पादक संघर्ष समिती आणि किसानसभेच्यावतीने दूध दरवाढीबाबत जोरदार आंदोलन करण्यात आलं. शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडतानाही जोरदार घोषणाबाजीही केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी यावेळी गाई चावडीवर आणून बाधत सरकारचा प्रतिकात्मक निषेध केला. तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

वेळ गेलेली नाही, तात्काळ निर्णय घ्या, अन्यथा राज्यकर्त्यांच्या दारात आंदोलन : अजित नवले

यावेळी बोलताना अजित नवले म्हणाले, “दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर मिळावा यासाठी सरकारने प्रतिलिटर 10 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. केंद्र सरकारने दूध पावडरची आयात तात्काळ थांबवावी. उलट निर्यातीला अनुदान द्यावं. या मागण्यांसाठी दूध उत्पादक संघर्ष समितीच्यावतीने महाराष्ट्रभर आंदोलनाला सुरुवात झाली आहे.”

Milk Agitation LIVE : सरकारने शेतकऱ्यांचा तळतळाट आणि वेदना पाहू नये. तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा यापुढचं आंदोलन राज्यकर्त्यांच्या दारावर : अजित नवलेhttps://t.co/veJv7fH9kp#MilkAgitation #AjitNawale pic.twitter.com/tmK0blTdKs

“अकोल्यात प्रत्येक डेअरीवर शेतकरी एकत्र आले. त्यांनी दुधाचा अभिषेक घातला. जनावरं चावडीवर आणून बांधत सरकारचा निषेध केला. अजूनही वेळी गेलेली नाही, सरकारने शेतकऱ्यांचा तळतळाट आणि वेदना पाहू नये. तातडीने निर्णय घ्यावा. तसं झालं नाहीतर यापुढचं आंदोलन राज्यकर्त्यांच्या दारावर करावं लागेल,” असाही इशारा अजित नवले यांनी दिला.

हेही वाचा :

अमृतासारखं दूध ओतून देतानाचा त्रास लक्षात घ्या, मरण येणारच असेल तर सोशल डिस्टन्स कशाला : राजू शेट्टी

दूध उत्पादकांचा 1 ऑगस्टपासून राज्यव्यापी एल्गार, शेतकरी संघर्ष समितीची घोषणा

Milk Agitation | महाविकासआघाडीचा केंद्रबिंदू शेतकरी, दूध उत्पादकांना मदत करण्याची आमची भूमिका : मंत्री सुनील केदार

Milk Agitation in Maharashtra Latest Updates

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.