AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलिक दुबई दौऱ्यावर; अतिशय खोचक ट्वीट करून माहिती, ते का म्हणतायत सरकारी यंत्रणांनी माझ्यावर लक्ष ठेवावे?

ड्रग्ज प्रकरण असो की समीर वानखेडे आणि नवाब मलिकांमधील आरोप-प्रत्यारोप. नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील आरोप-प्रत्यारोप. या साऱ्याने अतिशय रंजक वळण घेतलेले असतानाच आता अचानक नवाब मलिक हे दुबई दौऱ्यावर आहेत.

मलिक दुबई दौऱ्यावर; अतिशय खोचक ट्वीट करून माहिती, ते का म्हणतायत सरकारी यंत्रणांनी माझ्यावर लक्ष ठेवावे?
नवाब मलिक, मंत्री.
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 2:40 PM

मुंबईः ड्रग्जप्रकरणी अतिशय आक्रमक झालेले, एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या मागे हात धुवून लागलेले, भाजप सरकारला जोरदार प्रत्युत्तर देणारे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा किल्ला या विषयातरी एकटा लढविणारे मंत्री नवाब मलिक हे दुबई दौऱ्यावर जात आहेत. मात्र, त्यांनी त्यापूर्वी एक अतिशय खोचक ट्वीट करून एक माहिती दिलीय. विशेष म्हणजे सर्व सरकारी यंत्रणांना एक सल्लाही दिलाय.

उत्सुकता शिगेला

मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात मलिक अतिशय आक्रमक झालेले आपण साऱ्यांनी पाहिले आहेत. विशेष म्हणजे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात तर त्यांनी रोज एकेक आणि कधी दोन-दोन पत्रकार परिषदा घेतल्या. आर्यन खानसाठी जणू काही सर्वस्व पणाला लावले. शेवटी हे प्रकरण समीर वानखेडे यांच्या धर्मापर्यंत गेले. त्यांची कागदपत्रे खरी की खोटी इथेपर्यंत. मलिक इतके आक्रमक होते की, काल-परवापर्यंत हिरो वाटणारे समीर वानखेडे अनेकांना व्हीलन वाटू लागले. आता हे सारे प्रकरण एका वेगळ्याच दिशेने वळले आहे. याचा निर्णय काय होतो, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.

सर्व परवानग्या घेतल्या

ड्रग्ज प्रकरण असो की समीर वानखेडे आणि नवाब मलिकांमधील आरोप-प्रत्यारोप. नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील आरोप-प्रत्यारोप. या साऱ्याने अतिशय रंजक वळण घेतलेले असतानाच आता अचानक नवाब मलिक हे दुबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे काहीही आरोप होऊ शकतात. मलिक अचानक कुठे गायब झाले, कुठे गेले याचे राजकीय भांडवल होऊ शकते. हा धोका ध्यानात घेत नवाब मलिकांनी एक अतिशय सूचक ट्वीट आज केले आहे.

काय आहे ट्वीट?

ट्वीटमध्ये मलिक म्हणतात की, सर्वांना नमस्कार, मला तुम्हा सर्वांना कळवण्यात आनंद होतो आहे की, मी आपले केंद्र आणि राज्य सरकार या दोघांच्याही आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन दुबईला जात आहे. मी 24 नोव्हेंबर 2021 रोजी भारतात परत येईन. सर्व सरकारी यंत्रणांनी माझ्यावर लक्ष ठेवावे आणि माझ्या हालचालींचा मागोवा घ्यावा ही विनंती. या ट्वीटची चर्चा न होते, तर नवलच म्हणावे लागेल. नाही का?

इतर बातम्याः

महाराष्ट्र, बंगाल अन् केरळ सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न; शरद पवारांचा गंभीर आरोप

कृषी कायदे लवकर मागे घेतले असते, तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते; भुजबळांचे मोदींवर शरसंधाण

कृषी कायदे मागे, काँग्रेसचे पंतप्रधानांवर 5 प्रहार; मोदींकडून गुन्हा कबूल, शिक्षा ठरवण्याची वेळ आल्याची जहरी टीका!

पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.