Nitesh Rane : उद्धव ठाकरे ‘ढ’ विद्यार्थी, नितेश राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane : "जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्याला सोडणार नाही. ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली, त्यांना समज दिली गेलीय. जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढेल यासाठी प्रयत्न आहेत" असं नितेश राणे म्हणाले.

“पाडाव्यापूर्वी एक गोड बातमी देण्यासाठी आज पत्रकार परिषद आहे. जिल्ह्यातील प्रशासनात आर्थिक शिस्त आणणार असा जिल्ह्यातील जनतेला विश्वास दिला होता. त्यानुसार 31 मार्च पर्यत मागील शिल्लक 250 कोटी निधी खर्च करुन नवीन निधीच नियोजन केलं जाईल असं मी अश्वासन दिल होतं. सोमवारी 31 मार्च आहे, 98 टक्के निधी आज पर्यंत खर्च झालाय” असं मंत्री नितेश राणे म्हणाले. “राज्य जिल्हा नियोजन निधी खर्चात आपला जिल्हा 32 वरून राज्यात पहिल्या क्रमांकवर आलाय. यासाठी जिल्हा प्रशासन व अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन व आभार. जिल्ह्यात आर्थिक शिस्त आणण्यासाठी टाकलेलं हे पाहिलं पाऊल आहे” असं नितेश राणे म्हणाले.
“आलेला निधी योग्य वेळी खर्च झाला पाहिजे. शेवटी, शेवटी निधी काढणं जिल्ह्यासाठी योग्य नाही, राणे साहेबांना देखील ते अपेक्षित नाही. पुढील काळात डिसेंबरपर्यंत निधी खर्च होईल. जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्याला सोडणार नाही. ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली, त्यांना समज दिली गेलीय. जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढेल यासाठी प्रयत्न आहेत. कुपोषित मुक्त जिल्हा व्हावा यासाठी पाऊल उचलल जातं आहे” असं नितेश राणे म्हणाले.
‘तो ढ विद्यार्थी’
“गुंतवणूकसाठी आपला जिल्हा आकर्षक केंद्र बनावा यासाठी प्रयत्न करू. नरडवे धरण प्रकल्पाचे लवकरच काम सुरु होईल आणि लोकांना देखील पैसे मिळतील” असं नितेश राणे म्हणाले. दिशा सालियन प्रकरणात म्हणाले की, “मलाड पोलीस आणि पोस्ट मॉर्टम रिपोर्टबाबत दिशा सालियनच्या वडिलांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जर आर्थिक स्थिती योग्य नव्हती तर मग ती लग्न कसं करणार होती” “उद्धव ठाकरेंचा आणि अभ्यास याचा संबंध येत नाही. तो ढ विद्यार्थी आहे” अशी टीका नितेश राणे यांनी केली.