‘मराठा समाजाची शाळा असेल, तर त्यात..’, क्षीरसागर यांनी विधानसभेत सांगितलं बीडमधलं जाती-पातीच भयाण वास्तव
Sandeep Kshirsagar : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज विधानसभेत चर्चा झाली. त्यावर बोलताना बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यात जाती-पातीच राजकारण किती खोलवर रुजत चाललं आहे, ते भयाण वास्तव सांगितलं

“संतोष देशमुख प्रकरणामुळे जिल्ह्यात ज्या पद्धतीच वातावरण झालं आहे. मी एक आमदार म्हणून जिल्ह्यात फिरत असताना गेल्या आठ दिवसापासून या प्रकरणाकडे एका वेगळ्या दिशेने पाहिल जात आहे. सत्तेत आपण सर्वजण आहोत. या प्रकरणात राजकारण मला आणयचं नाही. आमच्या जिल्ह्यात बीड मतदारसंघात गुन्हेगारी कशामुळे वाढली?” या मुद्याकडे आमदार संदीप क्षीरसागर यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. “बीड मतदारसंघात रस्ते आले, रेल्वे चालू होणार आहे. आमच्याकडे इंडस्ट्री नाही. त्यामुळे गुन्हेगारी वाढतेय, त्याचा उल्लेख जिल्ह्याच्या बाकीच्या आमदारांनी सुद्धा केला. वाळू असेल मटका, सट्टा, दारुची अवैध ठिकाणं याचा भरमार जिल्ह्यात आहे. यावर आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पावल उचलावी लागतील” असं आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले.
“मी जातीचा जो विषय बोललो. आता परिस्थिती अशी आहे की आमच्या जिल्ह्यात दोन समाज आमच्याकडे जास्त आहेत. मराठा आणि वंजारा समाज. जर या विषयात आपण प्रामाणिकपणे लक्ष घातलं नाही तर परिस्थिती अशी आहे की, साधेसाधे व्यापारी एखादी गोष्ट घेत असताना समाज पाहिला जातो. एखादा अधिकारी जिल्ह्यात आला, तर त्याच्या नावापेक्षा आडनाव काय हे पाहिलं जातं. आमचा जिल्हा पुरोगामी जिल्हा आहे. महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे. आमचा जिल्हा खरच चांगला आहे. जातीपातीच हे राजकारण भोवल जातं. माझा उदहराण घेतलं तर माझ्या जातीचे लोक सुईच्या टाचाणीच्या टोकाएवढे सुद्धा नाही. तरीही बीड मतदारसंघाने दुसऱ्यांदा मला आमदार म्हणून निवडून दिलं” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.
शाळेवरुन काय म्हणाले?
“शाळा एखाद्या समाजाची असली, मराठा आणि वंजारा समाज मी उल्लेख केला. मराठा समाजाच्या शाळेत वंजारी समाजाचा विद्यार्थी असला, तर प्रवेश काढून घेण्याचा प्रकार सुरु आहेत” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.
पाटोद्याच्या कुटुंबाबद्दल काय सांगितलं?
“पाटोद्याच एक कुटुंब आहे, रामकृष्ण बांगर म्हणून, त्यांच्या कुटुंबाच्या विषयात अतिशय घाणेरडा प्रकार झाला आहे. त्यांच्या मुलावरती आपण समजू शकतो त्याने काही तरी केलं म्हणून 307 आपण दाखल केला. त्याचे आई-वडिल, मुलगा यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. अजून तिसऱ्यांदा त्या कुटुंबावर आई-वडिल आणि मुलगा यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल केला. असं काय केल होतं त्यांनी, जिल्ह्यात कुणावर काय गुन्हा दाखल होईल, कोण कधी काय करलं याचा भरवसा नाही” असं संदीप क्षीरसागर सभागृहात म्हणाले.