भगवान गडाचा सप्ताहसुद्धा परळीत होत नाही…आमदार सुरेश धस यांनी परळीतील कोणा-कोणाला घेरले

आरोपींनी अमानुष पद्धतीने संतोष देशमुख यांना मारले. त्याचा व्हिडिओ काढला. दुसरीकडे आका सांगत होता आणखी मारा. संतोष देशमुख याला का मारले? तर खंडणीच्या मध्ये तो आला होता. संतोष देशमुख यांची हत्या दीड कोटी रुपयांसाठी झाली.

भगवान गडाचा सप्ताहसुद्धा परळीत होत नाही...आमदार सुरेश धस यांनी परळीतील कोणा-कोणाला घेरले
सुरेश धस
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 3:36 PM

भगवान गड आणि नारायण गड यांचा सप्ताह परळी तालुक्यात झाला नाही. शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज यांना परळीत बोलवले जात नाही. भगवान गडाचा वर्षाचा सप्ताह परळी तालुक्यात होत नाही. माझ्या आष्टीत होतो, बीडमध्ये होतो पण परळीत सप्ताह होत नाही. वामनभाऊ आणि भगवान बाबा यांचे विचार ते पाळत नाही. त्यांचे नाव का घेत आहात? माझी विनंती आहे, त्यांचे नाव घेऊ नका. परळी सोडून इतर सर्व ठिकाणी भगवान गडाचा सप्ताह होत असतो, असा हल्ला आमदार सुरेश धस यांनी परळी तालुक्यातील लोकप्रतिनिधींवर केला. त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांनाही भगवान गड आणि नारायण गडावरुन त्यांचे नाव न घेता घेरले आहे.

दीड कोटी रुपयांसाठी हत्या

आरोपींनी अमानुष पद्धतीने संतोष देशमुख यांना मारले. त्याचा व्हिडिओ काढला. दुसरीकडे आका सांगत होता आणखी मारा. संतोष देशमुख याला का मारले? तर खंडणीच्या मध्ये तो आला होता. संतोष देशमुख यांची हत्या दीड कोटी रुपयांसाठी झाली. कारण 50 लाख या लोकांनी निवडणुकीत घेतले होते. दलित व्यक्तीला वाचवण्यासाठी संतोष देशमुख आले. त्यामुळे त्याला मारले, असे आमदार सुरेश धस यांनी उस्मानाबाद येथील भाषणात सांगितले.

आकाबरोबर आकाच्या आकाही जाणार

आका बरोबर आकाच्या आका गेला असेल तर आकाच्या आकाही बिनभाड्याच्या खोलीत गेला पाहिजे. त्या बिनभाड्याच्या खोलीत गरम हवा लागते. मुख्यमंत्र्यानी आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या. या प्रकरणातील आरोपींना मकोका लावला आहे. आता आकालाही मकोका लावला पाहिजे, असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

अजितदादा माझी विनंती आहे, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा. त्याच्याऐवजी कायंदे यांना घ्या किंवा इतर कोणाला मंत्रीपद द्या. या व्यक्तीने खूप वाटोळे केले आहे. त्यांना सत्तेत ठेवले म्हणून अजून कोणाला मारले. माणसे उचलून नेतात. त्यांच्याकडून खंडणी मागितली जाते, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.