Video: आमदार विनोद निकोले अर्थात डिस्को डान्सर; पाहुण्यांच्या कार्यक्रमात थिरकताना दिसले; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये आमदार विनोद निकोले आदिवासी गाण्याच्या वाद्यावर चांगलेच थिरकताना दिसत आहे. त्यांच्या या डान्सवर संमिश्र प्रतिक्रियाही बघायला मिळत आहेत.
पालघर: आपण हा व्हिडीओ बघा या व्हिडिओमध्ये मिथुन चक्रवर्तीसारखा डिस्को डान्स करत आहेत ते कोणी साधा सुधा व्यक्ती नाही, ही व्यक्ती आहे आमदार. पालघरमधील डहाणू विधानसभेचे (Dahanu Assembly) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले (MLA Vinod Nikole) यांचा सध्या एक भन्नाट डान्स सोशल मीडियावर (Dance S0cial Media Viral)चांगलाच व्हायरल होतो आहे. महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार म्हणून डहाणूचे आमदार विनोद निकोले यांची ओळख आहे.
आणि त्यामुळेच ते चांगलेच चर्चेत आहेत. मात्र सध्या ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत ते म्हणजे त्यांच्याच एका नातेवाईकाच्या साखरपुडा समारंभामध्ये डान्स करत आहेत. आणि तो डान्सही साधासुधा नाही तर अगदी अभिनेता डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तीसारखा.
सोशल मीडियावर डान्स व्हायरल
सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये आमदार विनोद निकोले आदिवासी गाण्याच्या वाद्यावर चांगलेच थिरकताना दिसत आहे. त्यांच्या या डान्सवर संमिश्र प्रतिक्रियाही बघायला मिळत आहेत.
पत्र्याच्या घरामुळे चर्चेत
सर्वसामान्यांसारखा राहणारा आमदार म्हणून विनोद निकोले यांची ओळख आहे. ते आणदार झाल्यानंतरही पत्र्याच्याच घरात राहत होते. लोकप्रतिनिधी असूनही एका आमदाराचे घर पत्र्याचे कसे काय असू शकते या गोष्टीमुळे विनोद निकोले चर्चेत आले होते.
…आता डान्समुळे पुन्हा चर्चेत
त्यानंतर आमदारांना मुंबईत घरं देण्याचा निर्णय मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला तेव्हा विनोद निकोले यांनी तेवढे पैसे देणे मला परवडणारे नाही असं स्पष्ट सांगितलं होते. त्या गोष्टीमुळेही ते चर्चेत आले होते. मात्र आता पुन्हा एकदा डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तीसारखा डान्स पाहुण्यांच्या एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात करताना आणि थिरकताना दिसल्यावर मात्र ते सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा हा डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे.