मोठी बातमी! ‘राज्यपालांना कोणी स्क्रिप्ट देतं का?’, राज ठाकरे यांनी व्यक्त केली शंका

राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली.

मोठी बातमी! 'राज्यपालांना कोणी स्क्रिप्ट देतं का?', राज ठाकरे यांनी व्यक्त केली शंका
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 6:40 PM

कोल्हापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. “मी त्या माणसाबद्दल काय बोलावं ते कळतंच नाही. ते अशा एका पदावर आहे की ज्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाहीय”, असा घणाघात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला. राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली.

“राजकारणात असे अनेक लोकं आहेत जी काही पदांवर बसलेली आहेत. असे अनेक माणसं आहेत, ज्यांना पद येते पण पोहोच येत नाही. त्यातली ही माणसं आहे”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

“पदावरती बसतात पण कधी कुठली गोष्टी काय बोलावं याबद्दल कळत नाही. मागच्यावेळी ते जोतिबा फुले आणि महात्मा फुले यांच्याबद्दल बोलले होते. हे छोटे-छोटे बच्चे तब ये शादी करते, कैसे करते होगे? कैसे म्हणजे पूर्वीच्याकाळी लहान मुलांचं लग्न व्हायचं. कोश्यारींचं अजून नाही झालं”, अशी खोचक टीका राज ठाकरेंनी केली.

“मला तर असं वाटतं की अशा लोकांना म्हणजे राज्यपालांनाही कोणी स्क्रिप्ट देतं का? तुमचं सगळं लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत का? बऱ्याचदा महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे असे प्रकार केले जातात”, असं राज ठाकरे म्हणाले.

“मुर्ख माणसं आहेत. आपल्या महाराजांना याने काही फरक पडत नाही. ही कोण माणसं आहेत? या लोकांना टेलिव्हिजनवर जागा देऊ नका. पण तुम्ही थांबत नाहीत”, असं राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरही राज ठाकरेंची प्रतिक्रिया

दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरही आपली भूमिका मांडली. “मला हा मध्येच कुठून येतो ते कळलं नाही. असा सीमाप्रश्न अचानक मध्ये कसा येतोय? म्हणजे आपलं लक्ष दुसरीकडे कुणाला वळवायचा आहे का?”, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

“प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय जो निर्णय देईल ते होईल. पण मूळ बातम्या दिल्या जाऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत का?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे आणखी काय-काय म्हणाले?

“मी उद्यापासून कोकणाचा दौरा सुरु करतोय. महालक्ष्मीचं दर्शन घेऊन दौरा सुरु करावा असं मी ठरवलं. उद्या सकाळी मी दहा वाजेच्या सुमारास देवीचं दर्शन घेईन. कुठे चांगलं तांबडं-पांढरा मिळालं तर खाईन. त्यानंतर पुढे सावंतवाडीला जाईन.”

“माझा मध्यंतरी नागपूरचा दौरा झाला. माझा कोकणाचा दौरा संपला की पुढचा दौरा हा पश्चिम महाराष्ट्र असेल. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे असा दौरा असेल.”

“तुम्हाल कोणी रणनीती सांगितलीय का? मी इथे आलोय ती तयारीच समजा. आता पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. त्यांना काय सांगायचं ते सांगेन. निवडणुकीच्यादृष्टीने काय पावलं उचलायचं ते सांगेन.”

“मी नागपूरलाही ही गोष्ट बोललो असतो. आपला लढा हा प्रस्थापितांविरोधातच असतो. शेवटी यश येतो. १९९५ आणि १९९९ मध्ये पाहिलेलं आहे. बालेकिल्ला हलत नाही असं होत नाही. ते यापुढेही होईलच.”

“लक्ष देणं हे आमचं काम आहे ते मी करतोय. तुम्हाला बोलवून लक्ष देतोय असं सांगावं लागत नाही. अंतर्गत काम सुरु असतं. अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती होतात. काही ठिकाणी बदल होतात.”

“आम्ही मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार. मी जाहीर केलं होतं. तुम्ही वधवून घेताय का?”

“तुम्ही पूर्वपार बघत आलात तर राजकीय पक्षावर चिंधळे उडवले गेले आहेत पूर्वीपासून. ज्यांना आमची ताकद बोचते ते अशाप्रकारचे आरोप करत सूटतात. यांचे विरोधक दोन दिवसांपूर्वी सांगायचे की त्यांच्यासाठी काम करतात. मी कुणासाठी काम करत नाही. मी माझ्या पक्षासाठी काम करतो.”

“शिवसेना आणि वंचित एकत्र आले तर त्यांना विचारा. त्यांचे प्रश्न मला विचारु नका.”

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.